कुरकुरीत भेंडी

p-2317-kurkurit-bhendi

बारीक चिरलेल्या भेंडीमध्ये कॉर्नस्टार्च सोडून सर्व जिन्नस घालावे. दहा मिनिटे मुरल्यानंतर भेंडीचे बारीक लांब तुकडे कॉर्नस्टार्च व बेसनाच्या द्रावणात घोळवून डीप फ्राय करावे व त्यावर थोडा चाट मसाला घालावा. अशा प्रकारे तयार झालेली कुरकुरीत भेंडी स्नॅक्स म्हणून सुद्धा खाता येते.



साहित्य:- बारीक लांब चिरलेली भेंडी २ वाटय़ा, आलं लसूण पेस्ट २ चमचे, अध्र्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, तिखट, हळद चवीनुसार, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, बेसन अर्धी वाटी, तेल तळायला.

कृती:- बारीक चिरलेल्या भेंडीमध्ये कॉर्नस्टार्च सोडून सर्व जिन्नस घालावे. दहा मिनिटे मुरल्यानंतर भेंडीचे बारीक लांब तुकडे कॉर्नस्टार्च व बेसनाच्या द्रावणात घोळवून डीप फ्राय करावे व त्यावर थोडा चाट मसाला घालावा. अशा प्रकारे तयार झालेली कुरकुरीत भेंडी स्नॅक्स म्हणून सुद्धा खाता येते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author