गव्हाची ठूली

साहित्य: १ वाटी गहू, १ वाटी गूळ, ४ चमचे तूप, ३ वाट्या पाणी, वेलची, जायफळ पूड, थोडसे बदाम

कृती : २४ तास गहू भिजवावे. दुसऱ्या दिवशी गहू मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक करावे. सूपच्या गाळणीने गाळून घ्यावे. (जोपर्यंत पांढरे पाणी किंवा सत्व निघत राहील तोपर्यंत) सात ते आठ तास न हलवता ठेवून द्यावे जेणे करुन गव्हाचे सत्व तळाला बसेल, वरचेपाणी काढून सत्व, तूप चिरलेला गूळ एकत्र करून बारीक गॅसवर सारखे ठवळत रहावे. पाच ते सात मिनिटात पारदर्शक दिसायला लागले की उतरुन घ्यावे व वेलची जायफळ पूड टाकून मिक्स करावे वरुन थोडे बदामाचे पातळ काप पसरावे व गरम असताना सर्व्ह करावी. थंडं झाल्यावर थोडी दली ही भरपूर पौष्टीक व सकाळच्या न्याहारीसाठी उत्तम आहे.

- सौ. भारती अनंत राजे

५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

– सौ. भारती अनंत राजे

Author