(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • Thai red curry

    थाई स्टय़ू

    १) तेल कढईत गरम करावे. त्यात कांदा आणि आले-लसूण पेस्ट परतावी.
    २) आच एकदम मंद करून रेड करी पेस्ट घालावी. थोडे मिक्स करून टोफू आणि भाज्या घालाव्या

      February 25, 2017


  • सुरणाची भाजी

    सुरणाचे वरील साल काढून सुरणाच्या फोडी कराव्यात. तेलात मोहरीची फोडणी करून त्यावर लाल मिरच्यांचे तुकडे तडतडू द्यावेत. त्यावर फोडी टाकून झाकण ठेवावे. चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर ढवळून पाणी घालून सुरण शिजू द्यावा. फोडी शिजल्या की त्यावर मीठ, चिंचेचा कोळ, गुळ, ओल्या नारळाचा खव घालावा. भाजी ढवळावी व पुन्हा चांगली वाफ येऊ द्यावी. पुरेसे पाणी राहीले की भाजी उतरवावी आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      February 23, 2017


  • p-69-carrot-salad

    गाजराची कोशिंबीर

    साहित्य :

    गाजर, लिंबू, दाण्याचे कुट, तेल, मोहरी, हिंग, हळद, साखर आणि मीठ.

    कृती :

    सर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण एकत्र करुन अर्धा तास ठेवणे.

    त्यानंतर तेल तापवून ते तापल्यावर मोहरी घालणे. मोहरी तडतडल्यावर हिंग घालून गॅस बंद करणे. व ही फोडणी गाजरावर ओतून हवा असल्यास नारळाचा चव व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.

      April 30, 2016


  • p-1192-dinkache_ladu

    गव्हाच्या पफचे व डिंकाचे पौष्टिक लाडू

    गॅसवर एका नॉनस्टिक पॅनमध्ये साजूक तूप गरम करून घेऊन त्यांत डिंकाची पावडर तळून व फुलवून घ्या.नंतर काजू, बदाम यांची तुकडे किंवा काप आणि बेदाणे हेही साजूक तुपात तळून घ्या. गव्हाचे पफ मिक्सरमध्ये फिरवून त्याचीही रव्यासारखी पावडर करून घ्या. साखरेचा एकतारी पाक करून घ्या

      May 6, 2017


  • बाजरीचा भात

    हा भात श्रावण मासातल्या ‘संपत शनिवारी’ करतात. बाजरीचा भात व कढी हा मुख्य मेन्यू असतो.

      September 20, 2018


  • p-2287-strawberry-puranpoli

    स्ट्रॉबेरी पुरणपोळी

    २ कप रवा (बारीक), १०-१२ ताज्या स्ट्रॉबेरी (तुकडे करून) २ टेबलस्पून तूप, दीड कप साखर, २ कप दूध, २ कप पाणी, १ टेबलस्पून वेलचीपूड. साजूक तूप पोळीला वरतून लावण्यासाठी.

      March 11, 2017


  • टोमॅटोचे थंडगार सूप

    साहित्य: ४-५ पिकलेले टोमॅटो, १ छोटा चमचा लिंबाचा रस, चवीपुरते मीठ, मिरे पावडर, थोडी चिरलेली कोथिंबीर.

    कृती: वेळ: १० मिनिटे टोमॅटोच्या बारीक फोडी कराव्यात. त्यात मीठ, मिरे पावडर, लिंबाचा रस घालून मिक्सरमध्ये फिरवावे. वाटल्यास अर्धा कप पाणी घालावे. नंतर गाळून फ्रिजमध्ये ठेवावे. ग्लासमधून देताना थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी. उन्हाळ्यात हे सूप फारच छान लागते.

      September 10, 2026


  • p-1058-black-rice-bowl

    ब्लॅक राइस

    साहित्य : तांदूळ २ वाटय़ा, तेल २ चमचे, काळीमिरी १ चमचा, लवंगा- ५-६, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, मीठ, साखर चवीनुसार.

    कृती : सर्वप्रथम २ वाटी तांदूळ मंद आचेवर काळपट भाजून घ्या. तो जळायला नको, नंतर गरम पाण्यात टाकून त्याला अर्धा तास भिजवत ठेवा. एका पॅनमध्ये तेल तापवून त्यामध्ये काळीमिरी, लवंग, बारीक चिरलेली लसूण परतून घ्या. नंतर यात १/२ लिंबाचा रस, मीठ, साखर घालून ३ कप पाणी घालून उकळा. पाणी उकळल्यावर भिजवलेला तांदूळ घालून शिजवा व रायत्याबरोबर किंवा तसाही खायला छान लागतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    भंडारी भातोडे
    हा प्रकार विदर्भातल्या भंडारा जिल्ह्य़ात पाहायला मिळतो.

    साहित्य : तयार भात ४ वाटय़ा, भरडलेले धणे २ चमचे, जिरे पावडर १ चमचा, जाडसर कुटलेल्या हिरव्या मिरच्या ४ ते ५, लसूण-आलं २ चमचे, जाडसर कुटलेली सोप २ चमचे, बारीक चिरलेले कांदे ३ वाटय़ा, तांदळाचे पीठ अर्धी वाटी, आमचूर पावडर, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, तेल तळायला, हळद छोटा अर्धा चमचा,

    कृती : तांदळाचे पीठ सोडून सर्व जिन्नस एकत्र करा. यानंतर हलक्या हाताने तांदळाच्या पिठीच्या साहाय्याने वडे थापून मंद आचेवर डीप फ्राय करा व दहय़ाच्या चटणीबरोबर खायला द्या.

    टीप : वडे तळताना दोनदा तळले तर जास्त खुसखुशीत होतात. जसे वडे झाल्यावर तेलातून अर्धकच्चे काढून घ्या, सव्‍‌र्ह करतेवेळी ओल्या हाताने हलकेच दाबून परत तळा. आमचूर घरात नसेल तर त्यात दही, लिंबू, सायट्रिक अॅेसिड घातलं तरी चालू शकेल.
    भात कसा शिजवावा?

    कुकरमध्ये एकाच भांडय़ात मऊ आणि फडफडीत भात शिजवायचा असेल तर कुकरमध्ये भांडय़ाच्या खाली एक चमचा ठेवा, जेणेकरून ते भांडे कलते होऊन व ज्या भागात पाणी जास्त आहे तो भात मऊ होईल. आणि ज्या भागात पाणी कमी आहे, तो भात फडफडीत होईल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    तांदळाचे सूप(पेज)
    साहित्य : भात शिजवताना थोडे जास्त पाणी घालून त्यावरचे पाणी काढून घ्यावे. (पाणी घट्टसर असावे) तांदळाचं पाणी ५ वाटय़ा, मीठ, साखर चवीनुसार, दही २ चमचे, कोथिंबीर पाव वाटी, फ्रेश क्रीम ४ चमचे, भिजवून तळलेले तांदूळ २ चमचे.
    कृती : भातावरचे पाणी उकळायला ठेवून त्यात दही, चवीनुसार मीठ, साखर घालणे, सव्‍‌र्ह करते वेळी त्यात वरून फ्रेश क्रीम, तळलेले तांदूळ, कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करावे.
    टीप : दही घालण्याआधी घुसळून घ्यावे. तांदूळ तळल्यानंतर त्याला टीपकागदावर टिपून घ्यावे. त्यामुळे सुपावर तेलाचा तवंग दिसणार.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      April 17, 2017


  • p-2512-dates-and-dryfruits-ladoo

    खजूर-ड्रायफ्रूट लाडू

    कुस्करलेला खजूर मिक्स०रमध्ये फिरवून घ्यावा. नंतर त्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे काप टाकावेत. सर्व मिश्रण एकत्र करावे. त्याचे लहान लहान लाडू वळावेत.

      June 6, 2017


  • Karwari-fried-fish-300

    कारवारी तळलेला मासा

    प्रथम चिंच, ब्याडगी मिरची एकत्र वाटून घेऊन त्याचा गोळा करावा. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून ते तसेच ठेवावे.(पाणी घालू नये). हे चिंच-मिरचीच मिश्रण माशाच्या तुकड्यांना लावावं आणि तुकडे अर्धा तास मुरवत ठेवावे. अर्ध्या तासाने तांदळाची पिठी आणि रवा एकत्र करून घ्यावा. माशाचे तुकडे या पीठात घोळवून घ्यावे आणि जरा जास्त तेलावर परतून घ्यावे.

      January 11, 2017