महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
गेले दोन दिवस पिठलं हा विषय झाला,त्यामुळे त्या पाठोपाठ भाकरी हा विषय लगेचच आला पाहिजे. भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या हातचा मळ आहे.
March 7, 2017
प्रॉन्स सॅलेड – Recipe
September 11, 2026
साहित्य:- दोन वाट्या मऊ गूळ, अर्धी वाटी दाण्याचे व तिळाचे कूट, दोन चमचे बेसन, थोडे साजूक तूप, वेलची-जायफळ पूड एक चमचा, कणीक व तांदळाची पिठी.
कृती:- तुपावर बेसन भाजावे. गुलाबी रंग आल्यावर गॅस बंद करावा. नंतर त्यात गूळ घालावा. बेसन गरम असल्याने गूळ विरघळेल. नंतर त्यात शेंगदाण्याचे व तिळाचे कूट घालावे. जायफळ-वेलची पूड घालावी. मिश्रण गार करावे. नंतर कणीक भिजवून घ्यावी. कणकेची गोल वाटी करून त्यात सारण भरावे. कणकेची वाटी बंद करून पिठीवर पोळी लाटावी. नॉनस्टिक पॅनवर भाजावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
June 9, 2017
साहित्य- ४ वाटय़ा तांदूळाचे पीठ, एक नारळ, पाव किलो गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, जायफळ.
कृती- प्रथम पातेल्यात साडेतीन वाटय़ा पाणी घेऊन ते उकळत ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ घालावे. पाणी उकळल्यावर त्यामध्ये पीठ घालून ढवळावे. झाकण ठेवून मंद आचेवर दोन मिनिटं वाफ येऊ द्यावी. वाफवलेले पीठ चांगले मळून घ्यावे. पिठाचे मुठीएवढे गोळे करून घ्यावे. शेवग्यात (शेवयांचा लाकडी साचा) किंवा चकलीच्या साच्यात पिठाचे गोळे घालून शेवया पाडाव्यात.
नारळाचे दूध काढून त्यात गूळ, वेलची, जायफळ पावडर घालून रस तयार करावा. ताटलीत शेवया घेऊन, त्यात रस घालून त्याचा आस्वाद घ्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
March 3, 2018
आपल्याकडे अनेकदा रात्रीच्या जेवणानंतर कधी चपात्या शिल्लक रहातात तर कधी भात आणि कधीतरी भाजीसुद्धा. या उरलेल्या अन्नाला थोडं नवीन रुप दिलं तर?
May 8, 2017
साहित्य: २ मोठे टोमॅटो, २ मोठे कांदे,
१ टे. स्पून मूगडाळ, ५-६ कप पाणी, १ टे.
स्पून बटर, १ बारीक चिरलेला कांदा.
अर्धा कप बारीक चिरलेला कोबी.
अर्धा कप पालक- बारीक चिरून.
१ लहान टोमॅटो बारीक चिरून.
मीठ व मिरे पावडर चवीप्रमाणे.
थोडे किसलेले चीज.
कृती: वेळ: ३० मिनीटे टोमॅटो व कांदा यांच्या मोठ्या फोडी करा. मूगडाळ स्वच्छ धुऊन थोडे पाणी घाला व हे सर्व एकत्र करून कुकरमध्ये १० मिनिटे शिजवून घ्या. थंड झाले की मिक्सरमध्ये भाज्या एकजीव करा व पाणी घालून गाळा व पातळ मिश्रण तयार करा. नंतर एका पातेल्यात बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परता व जरा तांबूस करा. त्यावर वरील पातळ मिश्रण ओता. हे मिश्रण चांगले उकळू द्या. उकळत असताना त्यात कोबी, पालक, टोमॅटो घाला. मीठ व मिरे पावडर चवीप्रमाणे घाला. २-३ मिनिटांनी गॅस बंद करा. हे तयार गरमागरम सूप बाऊलमध्ये घालून वरून किसलेले चीज जरूर घाला.
September 10, 2026
बर्फ वगळून सर्व पदार्थ एकत्र करुन मिक्सरमध्ये घाला. रस काढा. आवश्यकतेनुसार पाणी घाला. मिश्रण गाळून घ्या. थंड करा किंवा बर्फ घालून प्यायला द्या.
November 9, 2016
हा भात श्रावण मासातल्या ‘संपत शनिवारी’ करतात. बाजरीचा भात व कढी हा मुख्य मेन्यू असतो.
September 20, 2018
खरंतर वरण म्हणजे अनेकांच्या लेखी अगदी मामुली पदार्थ. किंबहुना वरणाला वाखाणणाऱ्यांपेक्षा नाक मुरडणारेच अधिक असतील, तरीही छातीठोकपणे सांगता येईल की, गरमागरम भातावर तूप टाकून तो हिंग-जिरं-हळद घालून केलेल्या वरणाशी कालवून खाल्ला की त्याक्षणी जिभेवर जी चव रेंगाळते; तिचं वर्णन करायला शब्द नाहीत.
September 20, 2018
सर्वसाधरणपणे उपवास म्हटले की डोळ्यासमोर येतात ते पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर, बटाट्याचा किस वगैरे. मात्र उपवासाच्या पदार्थातही साठवणीचे अनेक पदार्थ आहेत. यातीलच एक म्हणजे साबुदाण्याची चकली. एकदा बनवून ठेवून जेव्हा हव्या तेव्हा तळून किंवा मायक्रोवेव्ह ओवनमध्ये भाजून घेतलेल्या या चकल्या बहारदारच.
November 19, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti