May 5, 2022
नव्हतो कधीही चित्रकार, परि छंद लागला
रंगाच्या त्या छटा पसरवितां, मौज वाटे मनाला...१,
रंग किमया बदण्या नव्हता, मार्गदर्शक कुणी
गुरुविना राहते ज्ञान अपूरे, याची खंत मनी...२
नदिकाठच्या पर्वत शिखरी, विषण्ण चित्त गेलो
मन रमविण्या कुंचली घेवून, चित्र काढू लागलो...३
निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य, रंग छटा शिकवी
गुरू सापडला चित्र कलेतील, हाच तो निवावी....४
डॉ भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 1, 2020
November 23, 2021
ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे ।
उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।।
संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले ।
समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।।
खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे ।
बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।।
विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो ।
यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ।।
संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी ।
प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ।।
वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची ।
आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ।।
एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी ।
शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ।।
हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे ।
गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ।।
ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह ।
संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ।।
मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम ।
कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण ।।
आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला ।
देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ।।
हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही ।
‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई ।।
--डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 13, 2016
एक दिवस आमचा
तीनशे चौसष्ट त्यांचे
रस्तोरस्ती अत्याचार
सामुदायिक बलात्कार
वृद्धा, प्रौढा, लहान मुली
कुणीही चाले त्यांना
दुसर्या दिवशी भरे
पेपराचा रकाना
हुंडाबळी, जळीत प्रकरणे
वाचून दगड झालीत मने
दोन ओरखाडे भितींचे
माझे ही घर मातीचे
टीव्ही शो बघताना
तोकड्या कपड्यात नाचे टिना
डोळे फाडून चवीने पाहतो
एकमेकींना टाळ्या देतो
आठ मार्च येतच राहणार
स्त्री शक्तीचे नारे ऐकणार
जोरदार टाळ्या देणार
आज ते हात आमचे
उद्या लेकी सुनांचे
परवा नाती पणतींचे
तरीही माझे घर मातीचे
माझे घर मातीचे
-- सौ. सुधा मोकाशी
March 22, 2017
May 21, 2013
समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साहित्य अकादमीने विभिन्न भारतीय भाषेतील निवडक साहित्य “चयनम “ नावाने नुकतेच प्रकाशित केले आहे. समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेचे संपादक व हिंदी साहित्यिक श्री अरुण प्रकाश यांनी “चयनम “ चे संपादन केले आहे. साहित्य अकादमीच्या सुवर्ण जयंती वर्षा निमित्त ही योजना अस्तित्वात आली आहे.
February 12, 2023
दलदल होता चिखल मातीची, पाय जाती खोलांत
प्रयत्न तुमचे व्यर्थ जाऊनी , न होई त्यावर मात...१,
सावध होवूनी प्रथम पावूली, टाळावे ते संकट
मध्यभागी तुम्ही शिरल्यानंतर, दिसत नाही वाट....२,
मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली
चुकूनी पडतां पाऊल तुमचे, खेचला जातो खाली...३,
जागृतपणाचा अभाव असतां, गुरफूटूनी जातो
मोहमायेच्या आकर्षक गुणाला, बळी तोच पडतो....४,
वेगवान त्या जीवन प्रवाही, खिळ बसे मोहाने
क्षणीक सुखाच्या मागे जातां, दु:खी होई जीवने....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 29, 2017
करू नकोस विचार त्याचा, करणे नाही जेंव्हां तुजला
मोलाचे हे जीवन असता, व्यर्थ दवडशी वेळ कशाला....१
दोन घडीचे जीवन सारे, क्षणा क्षणाने जाईल निघूनी
कुणासाठी हा काळ थांबला, उत्तर याचे घे तू शोधूनी....२
लहरी उठतील विचारांच्या, आघात होता जेंव्हां मनी
विवेक बुद्धीने शांत करावी, भाव तरंगे त्याच क्षणी....३
मर्यादेचे आयुष्य असता, वाहू नकोस विचार प्रवाही
भगवंताचे स्मरण करण्या वेळेची परि बचत करावी....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 29, 2019
रात्र सामोरी येतां,
मन कसे कोमेजते,
मावळतां दिन सारा,
काळोख घेऊनी येते,
दिवसाचे तास संपती,
असे बघतां-बघतां,
स्मृतींच्या इंगळ्या डसती,
*संधिप्रकाश* ओसरतां,
काळजाचे धागे तुटतां,
जिवां हुरहूर लागे,---
फक्त "काहूर" तेवढे,
मनांत होते जागे,--!!
अंधाराची सोबत न्यारी,
कुणां अश्रू ना दिसे,
आपुल्याच,--रात्री वाटती,--
कसे ऋण" फेडायाचे,?
सुख--दु:खांचे,हिशोब सारे,
नकळत आपुले मन मांडते,
सरशी' कुणाची होते हे,
सांगावयास न लागे,--!!
*झुंजूमुंजू*होतांना पण,
पक्षी किलबिलाट करती,
अनोखी त्यांची जिद्द पाहुनी,
जगण्याच्या 'उर्मी' उसळती,
आकाशी दिनकर उगवतां,
उर्जास्त्रोत' कसा मिळे,
तेजस्वी'"" प्रकाशापुढे मन,
झुकून अगदी,वंदन' करे,--
प्रकाश आणि अंधार हे,
सृष्टीचेच भाग असती,
अंधारातुनी *प्रकाशा*कडे,
ते कसा मार्ग दाखवती,--!!!
©️ हिमगौरी कर्वे.
March 24, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti