(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • टप टप पडती गारा (बालगीत)

    इकडून तिकडे सुसाट पळतो वारा

    धो धो येई पाऊस टप टप पडती गारा।।धृ।।

    घर,दार भिजताच रे
    सारा चिखलची

    खेळण्यास जाऊ कसा
    बरसात गारांची

    डोई,पाठी,अंगावर,
    हा गारांचाच मारा

    धो धो येई पाऊस
    टप टप पडती गारा
    ।।१।।

    पिलू बिचारे माऊचे,
    गारठले हो भारी

    खुराड्यात कोंबड्याही,
    अंग चोरती सारी

    इवली माझी चिऊताई
    आणी कसा चारा

    धो धो येई पाऊस
    टप टप पडती गारा
    ।।२।।

    कुंडीतले इवले रोप
    झोडपले की रे

    बदक माझे दिनवाणे
    भेदरले की रे

    काय करू सांग ना
    हाती वितळल्या गारा

    धो धो येई पाऊस
    टप टप पडती गारा
    ।।३।।

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      January 6, 2020


  • नातं

    रेशमाच्या लडीसारखे, नात्याचे पदर,
    प्रत्येक नात्याचा वेगळा आदर

    आईच्या गर्भात नात्याची रुजवात,
    जन्माला आल्यावर गुंफायला सुरुवात

    भावनांच्या धाग्यात गुंफली जातात नाती,
    नात्यांच्या गोफात, ऋणानुबंधाच्या गाठी

    आयुष्याच्या प्रत्येक, वळणावर एकेक
    नात नव जुळत असतं,
    जन्मभराच्या प्रवासात, ते आपली सोबत करतं

    म्हणून तळहाताच्या फोडासारख,
    जपाव लागत नात,
    अन् कळीसारख अलवार,
    फुलवाव ते लागत

    नात्यामध्ये श्रेष्ठ, माणूसकीच नातं,
    गरीब- श्रीमंत, जात-धर्म, बंधन त्याला नसतं

    सरणावरती जळतो,
    तरी जळत नसत नातं,
    नावासारख मागे उरत
    तेच खर नातं, तेच खर नातं

    -- सौ. अलका वढावकर

      January 12, 2016


  • खेचून मिळवा

    तो तर देत नसतो कांहीं,
    घ्यावे लागते खेचूनी ।
    शक्ती लावूनी खेचा सारे,
    देईल परि ढील सोडूनी ।।

    जरी असला दयेचा सागर,
    केवळ मागणें मान्य नसे ।
    तुटून तुमचे प्रयत्न होता,
    ओजळीने तो देत दिसे ।।

    व्यर्थ घालवी जीवन कांही,
    स्वार्थीपणाच्या मागणी पायी ।
    वेडे ठराल तुम्हींच परि,
    काळ मात्र कधी थांबत नाही ।।

    धडपड करा, लुटून घ्या
    सांघिकतेच्या भूमिकेतूनी ।
    जाच न होई दुजास त्याचा,
    हीच भावना उरी बाळगूनी ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      November 21, 2019


  • चल ये पटकन….

    चल ये पटकन खूप घट्ट मिठी मार,अरे बघ थोडी अजून जागा शिल्लक आहे,
    मिटवायचं आहे ना हे पण अंतर मग सांगते तसं कर ना, घट्ट घट्ट अजून घट्ट मिठी मार!

    बघ तू मी जे सांगते ते ऐकतच नाहीयेस, एका जागेवरून कणभर हलत सुद्धा नाहीयेस!
    नुसतं एक टक बघत राहतोयस माझ्याकडे, लुक्स काय देतो ? असं विचारल्यावर नेहमी सारखा खिदळत सुद्धा नाहीयेस.

    झोपताना बोलायचास भान ठेवत जा गं त्या हातांचं,
    जप जरा त्यांना,हे अंतर मिटवण्यासाठी त्यांनी खूप ऍडजस्ट केलय गं स्वतःला!
    आज निजताना ना त्या हातांची ऍडजस्टमेंट करत आहेस,
    आणि बघ तर रात्रभर थकूनही एकमेकांवर पहुडण्याचा त्यांचा हट्टी रोमान्सही संपला नाहीये!

    तू नेहमी बोलायचास कसलीही तमा न बाळगता तुला हवं तेवढं तु उड,
    परतून मात्र माझ्याच कुशीत येऊन झोप हं!
    आज माझ्या पंखात बळ नाही उरलंय बघ उडण्याचे,
    अन तुझ्यात जिगर नाहीये त्या फ्रेम भोवती अडकवलेल्या माळेला तोडण्याचे !

    मला तुझ्या सोबत जगायचं होतं, तुझ्या नावाने सजायचं होतं!
    तू दिलेल्या दागिन्यांचं सुंदर कलेक्शन करायचं होतं,
    तू जाशील तिकडे हातात हात घालून तुझ्यासोबत मिरवायचं होतं,
    आज तू निघून गेलास पुढे, माझं नाव, गाव, श्वास आणि सर्वस्व घेऊन!

    - श्वेता संकपाळ (१३/०७/२०२३) .

      July 16, 2023


  • झुला आठवांचा

    झुला तुझ्याच आठवांचा

      August 16, 2021


  • आम्ही मिडलक्लासवाले

    दिवस बदलले तरी
    'Middle Class' जात नाही
    आणि त्याचं आम्हाला
    काहीही वाटत नाही.
    दुधाची साय, तुपाची खरवड
    तिळाची वडी, पुरणाची पोळी,
    आईच्या जेवणाची सर
    पिझ्झाला येत नाही.
    हॉटेलात गेले तरी
    मेनूवर 'दर' दिसत राही
    रिक्षा केली तरी
    मीटरवरून नजर हटत नाही.
    जीन्स घातली तरी
    साडीची हौस सुटत नाही.
    घरातून निघताना आजही
    पाया पडायला विसरत नाही.
    शो रुमचे दर पाहून
    पाय ठेववत नाही.
    केली खरेदी जास्त
    तर झोप येत नाही.
    नाताळ साजरा केला,
    'विश' केले 'मदर्स डे'ला,
    तरी वाढदिवसाला आईने
    ओवाळणं सुटत नाही.
    घर कितीही मोठ्ठ असो,
    सगळे असताना, गप्पा मारत
    हॉलमध्ये, ओळीने झोपण्यासारखी
    मजा कशातच येत नाही.
    पैसा असो पैसा नसो
    स्वभाव जात नाही.
    सुंभ जळला तरी
    पीळ जळत नाही.
    आणि त्याचं आम्हाला
    काहीही वाटत नाही.

    -- WhatsApp वरुन आलेली पोस्ट. आवडली म्हणून शेअर केली.

    -- सुशांत

      July 1, 2017


  • चारोळी – साद घालती काजवे

    साद घालती काजवे
    अंधार सभोवताली
    व्यापलेला नंभ
    चाँदण्याची वेली

    -- शरद अर्जुन शहारे

      December 7, 2019


  • आपली पिल्ले

    आपली पिल्ले परदेशी शिकायला जातात, अन तिथेच स्थाईक होतात, त्यावर एक सुंदर रचना -

    (भाग - 1)

    अरे राजा ये ना
    नको ग आई

    नोकरी मला लागू दे
    डॅालर जरा कमवू दे
    कर्ज माझे फिटू दे
    मग मी येईन

    अरे राजा ये ना
    नको ग आई

    गर्दी किती तिथे
    राहू मी कुठे?
    घर मला घेऊ दे
    मग मी येईन

    अरे राजा ये ना
    नको ग आई

    रस्ते तिथे छोटे
    त्यात खड्डे मोठे मोठे
    शिस्त नाही कुठे
    हॅार्नच्या आवाजाने कानच फाटे

    नाही गुणांची कदर
    नाही बुध्दीचाआदर
    भ्रष्टाचाराचा कहर
    कसा जमायचा वावर ?

    स्वच्छतेचा अभाव
    सत्ता संपत्तीचा प्रभाव
    आरक्षणाचा दबाव
    कसा लागेल माझा निभाव?

    तुला सांगतो एक खरे
    वाटते इथेच आता बरे
    आई बाबा तुम्हीच
    इथे येता का सारे?

    आई तू ये ना
    नको रे राजा

    आई तू ये ना
    नको रे राजा

    तू म्हणतोस ते खरे
    इथे नाही आता बरे
    पण कारण याला
    आम्हीच तर सारे

    कुणी राहिले गप्प
    आळी मिळी चुप्प
    देश सोडून कुणी
    निघून गेले हुप्प

    नाही पुढाऱ्यांना टोकले
    ना भ्रष्टाचाराला रोकले
    ना न्यायासाठी झटले
    नाही एकतेला जपले

    नाही शिस्तीचे पालन
    ना संस्कृतीचे जतन
    नाही निसर्गाचे संवर्धन
    शिक्षणाचे निमूट, पाहिले पतन.

    ना सत्याचा आग्रह
    ना कर्तव्याचा निग्रह
    ना मूल्यांचा संग्रह
    केला धर्माचा दुराग्रह

    आता मात्र वाटते
    सुधारायचे हे चित्र
    देशाला बदलायचे
    येऊन साऱ्यांनी एकत्र

    मिळून आम्ही सारे
    आणू बदलाचे वारे.
    मग तरी तुम्ही सारे
    परतून याल का रे?

    (भाग - 2)

    आई मी येऊ का?
    का रे राजा?

    डॉलरचा रेट कमी झाला
    जा आपल्या घरी ट्रम्प म्हणाला

    राजा इथली धूळ सोसेल का ?
    इथली बेशिस्त पचेल का?
    आम्हाला हिणवण्यात
    दिवस जातोय तुझा
    परत साऱ्यांना
    आपलं म्हणशील का?

    आई इथे आता
    नाही कुणी कुणाचे
    सगळंच वातावरण
    झालंय खूपच संशयाचे
    माहीत नाही माझी
    नोकरी कधी जाईल
    भीती आता वाटते
    धोब्याचा कुत्रा होईल

    एखादी छान नोकरी
    तिथे मिळेल ना गं मला
    इथल्यासारखं नाही मिळालं
    तरी चालेल आता मला

    ये बाळा ये
    तुला सामावून नक्की घेणार
    परका झाला होतास
    पोरका नाही करणार।

      June 7, 2017


  • नशीब

    का असा धांवतोस तूं , नशिबाच्या मागें मागें

    यत्न होता भगिरथी, नशिब येईल संगे...१,

    प्रयत्न होतां जोमाने, दिशा दिसताती तेथें

    यशाचे ध्येय सदैव, योग्य मार्गानें मिळते.....२,

    प्रयत्न करूनी बघा, ईश्वर देखील मिळेल

    इच्छा शक्ति प्रभावानें, नशीबही बदलेल...३

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      May 21, 2019


  • गृहीणी

    ती च्या भोवती
    त्या चं अस्तित्व असतं

    अनेक नात्यांना गुंफत
    घर तीचं सावरतं असतं

    म्हणुनच ती चं नाव
    गृहीणी असं असतं

    सारं कुटुंब त्यांच्याच
    कायम ऋणात असंतं

    ज्यांचं नाव गृहीणी असतं
    त्यांच्या अंगी वास्तल्य वसतं

    गृहीणी आहे म्हणुनच कायम
    घराला घरपण असतं

    त्यांच्या अस्तित्वामुळेच
    वसुधैव कुटुंम्बकम् असतं

    -- उमेश तोडकर

      November 26, 2022