April 27, 2022
छत्रपती शिवाजी महाराज
विचारावे कोणी मला
आणि मी सांगावे
माझा आदर्श कोण ?
छत्रपती शिवाजी महाराज
आणखी कोण ?
इतिहासातील आवडती तुझी
थोर व्यक्ती कोण ?
देवतुल्य शिवराय आणखी कोण ?
इतिहास भिनलाय
माझ्या नसानसात
मराठ्यांच्या शौर्याचा
त्यांच्या चातुर्याचा आणि
धर्मावरील प्रेमाचा...
शिवराय नसते तर ?
मी ही नसतो नाही ?
हा प्रश्न नाही तर
एक विचार आहे...
महाराष्टाला ज्याने
अस्मिता दिली
हिंदुत्वाला ज्याने
संजीवनी दिली
हिंदूंना ज्याने
अभिमान दिला
ते माझे राजे
छत्रपती शिवाजी महाराज...
मी त्यांना रोज मनात स्मरावे
हृदयात जपावे आणि
वर्तनात उतरून दाखवावे
त्यांच्या जयंती दिनी
फक्त करावी याची उजळणी...
हीच आहे माझी त्यांच्या
पवित्र चरणी
पुष्पांजली...
कवी - निलेश बामणे
March 6, 2021
केली मशागत शेतीची
झाली स्वच्छता वावराची
वाट पाहतो पेरणीची
मेघराजाच्या आगमनाची
मे महीना ही गेला
जुन निम्मा हो झाला
एक थेंब ही नाही पावसाचा
कधी येईल पावसाळा
बरसावे पावसाने
शेतीला चिंब करावे
शिवारात पाणी पाणी व्हावे
शेत पेरणीसाठी सज्ज आहे
मग होईल पेरणी जोमात
बिज अंकुरेल कोंबात
तरारेल पीक शेतामधी
हीरवगार रान होईल
पण आहे प्रतिक्षा
मानसुन आगमनाची
वाट पाहतो बळीराजा
पावसाच्या एका सरीची
उमेश तोडकर
June 26, 2023
दु:खातची शिकतो सारे, उघडोनी मनाची द्वारे
दु:खा परी नसे कुणी, जो सांगे अनुभवानी
दु:ख मनावरी बिंबविते, वस्तूस्थितीची जाणीव देते
दुसऱ्या परि अस्था देई, जाणीव ठेवूनी कार्य करि
अधिकाराने माज चढतो, खालच्यांना तुच्छ लेखतो
जाता अधिकार हातातूनी, माणूसकीला राही जागूनी
कष्ट करण्याची वृति येते, सर्वांना समावून घेते
श्रीमंतिमध्ये वाहून जाती, आरामाची नशा चढती
गरिबी शिकवते मेहनत, कष्टाने राही आनंदात
अनुभवासारखा शिक्षक, नसे दुजा परि एक दु:ख
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 10, 2020
September 6, 2013
(मुखडा)
घडू नये ते घडले, स्वप्न सारे विझले,
हातातल्या रेषांनी, नशीब वेगळे लिहिले.
हसण्यामागच्या अश्रूंना, कुणीच नाही ओळखले,
घडू नये ते घडले... मन मात्र तुटून गेले.
(अंतरा १)
कालपर्यंत सोबतीला, तुझ्या शब्दांचा आधार,
आज उरल्या फक्त आठवणी, आणि विरहाचा भार.
ओठांवरच थांबले, कितीतरी अपुरे बोल,
श्वासांत अजूनही दडले, तुझ्या नावाचे मोल.
तुझ्या पावलांच्या खुणा, अजून दारी थांबल्या,
विरलेल्या त्या स्वप्नांना, आठवणींनी कवटाळल्या.
(मुखडा)
घडू नये ते घडले, स्वप्न सारे विझले,
मनाच्या मंदिरातील, दिवे सारे विझले.
आसवांच्या सरींमध्ये, आयुष्य सारे भिजले,
घडू नये ते घडले... शब्दही आता निःशब्द झाले.
(अंतरा २)
चांदण्यांनी विचारले, कुठे हरवली ती वाट,
उत्तर देताना डोळ्यांनी, लिहिली दुःखाची बात.
जखमांना वेळ म्हणे, हळूहळू भरून काढ,
पण तुझ्याविना प्रत्येक क्षण, वाटतो अख्खा पहाड.
सावल्यांशी बोलताना, तुझाच भास भेटतो,
प्रत्येक धडधडीत अजून, तुझाच श्वास ऐकू येतो.
(ब्रिज)
नशिबाशी भांडताना, शब्द सारे हरवले,
प्रेमाच्या त्या पाखराचे, पंखच कुठे तुटले.
तरीही मनाच्या कोपऱ्यात, एक दिवा जळत राहील,
तुझ्या सुखासाठी माझा, प्रत्येक श्वास प्रार्थना करील.
(शेवट)
घडू नये ते घडले, तरी प्रेम संपणार नाही,
तू नसलीस जवळ माझ्या, आठवण दूर जाणार नाही.
काळ पुढे सरकेल, जखमाही कधीतरी भरतील,
पण तुझ्या नावानेच माझ्या, भावना कायम धडधडतील.
जर पुन्हा कधीतरी भेट झाली, नजरा काही बोलतील,
घडू नये ते घडले... तरी प्रेम अमरच राहील.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 20, 2026
माझ्या शेतात बहावा,
मोहरफुलांनी सजला,
आस डोळ्यात ती दाटं,
वाट पावसाची पाही.....!
कसा फुलला बहावा,
साज सोनेरी चढवुन,
जशी हळदिची नवरी,
बसली सजुनं धजुनं ...!
फुलवा बहाव्याचा सांगे,
मेघराजाच स्पंदनं....
त्याच आगमन दमदार,
की तो बसेल रूसुनं....!
भिन्न पात्रे निसर्गाची,
पशु,पक्षी,झाडे वेली...
रंगमंच निसर्गाचा,
भुमिका जगती वेगळाली....!
©गोडाती बबनराव काळे, लातुर
9405807079
July 31, 2024
प्रभा मुळे यांची एक बालकविता…
April 29, 2015
रे हिंद बांधवा, थांब या स्थळी
अश्रू दोन ढाळी
ती पराक्रमाची ज्योत मावळे
इथे झाशीवाली । धृ ।।
तांबे कुलवीरश्री ती
नेवाळकरांची कीर्ती,
हिंदभूध्वजा जणु जळती
मर्दानी राणी लक्ष्मीबाई
मूर्त महाकाली ।।१।।
घोड्यावर खंद्या स्वार,
हातात नंगी तरवार
खणखणा करित ती वार
गोऱ्यांची कोंडी फोडित पाडित
बीर इथे आली ।।२।।
कडकडा कडाडे बिजली,
शत्रुचि लष्करे थिजली,
मग कीर्तीरुप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची
इतिश्रीच झाली ।३।।
मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर
तरु, झरे ढाळतिल नीर
या दगडा फुटतिल जिभा
कथाया कथा सकळ काळी ।!४॥।
रे हिंद बांधवा, थांब या स्थळी
अश्रू दोन ढाळी
ती पराक्रमाची ज्योत मावळे
इथे झाशीवाली ।।५।।
June 11, 2026
September 2, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti