आज सारे समजुनी चुकले
आता काहीच नकोसे वाटते
सुखदुःख ओसंडुनी वाहिले
आता काहीच नकोसे वाटते
जगणे सहजी जगुनी जाहले
भोग भोगणेही संपले वाटते
अर्थ, जगण्याचाही कळला
आता मात्र थांबावेसे वाटते
आकाशाला घातली गवसणी
मनीचे सारे सारे घडले वाटते
ऋणानुबंध ओळखुनी चुकलो
आज कुठे गुंतू नये असे वाटते
क्षणाक्षणाचाही झाला निचरा
आज काळ किती उरला वाटते
आता कशाला हव्यास करावा
तसे सारे जगणे मृगजळ वाटते
निरवतेत, स्वांतसुखाय जगावे
तोच एक परमानंद असे वाटते
जन्म, एक भ्रमंती गतजन्मांची
दयाघनाने मुक्त करावेसे वाटते
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १४५.
२ - ६ - २०२२.
June 14, 2022
पर्यावरणविषयक लघुकाव्ये….
January 7, 2018
पंख फुटता उडूनी गेला, सात समुद्रा पलीकडे
आकाशातील तारका होत्या, लक्ष्य तयाच्या नजरेपुढे
निसर्गाने साथ देवूनी, दणकट दिले पंख तयाला
झेप घेत जा दाही दिशांनी, मनी ठसविले त्या पक्षाला
आत्मविश्वास तो जागृत होता, चिंता नव्हती स्थळ काळाची
कुठेही जाईन झेपावत तो, ओढ तयाला दिव्यत्वाची
निसर्ग रंगवी चित्र मनोहर, रंग एक तो कुंचल्यामधल्या
देईन अंगच्या छटा निराळ्या, चमक दाखवित ह्या जगताला
स्वच्छंदाची नशा मनस्वी, विसरूनी गेला सर्व जगाला
कुठे तो होता कोठूनी आला, आठवण येई मध्येच त्याला
सोडूनी दिले सारे ते त्याचे, आजभोवती विश्व निराळे
नाविन्याचा शोध शोधता, जुने विसरणे आता आले
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 17, 2020
https://youtu.be/VZ1bm7L9OdE
June 7, 2018
शोभा डे या आचरट बाईच्या बरळण्यावर केलेली ही टिप्पणी सध्या इंटरनेटवर फिरतेय...
नाही मला विषयाचे वाव डे.
घालीन पायात तंग डे
असेना का रोज डे, हग डे किंवा नाग डे (नागपंचमी ला इंग्लिशमधे म्हणतात)
चोंब डे बोल माझे का वाटती तुम्हा वाक डे?
बसलीत जरी गालफ डे, अंग अजून तसेच...थोडेफार उघ डे
ही बाकी सगळी माक डे, करती सदा झग डे
काही त्यात बेव डे आणि काही दारू डे
खाती सदा कोंब डे
गुपचूप घालतात दरो डे फोडून, तुमचीच भिंता डे
ठेवलं जर घट्ट चाम डे, तर मात्र देती रोक डे
अन ते एक नेमा डे……. जर ते बोलले तर,
बंद होतील थोबा डे.
सैनिकच तेव्ह डे निध डे, पण हल्ली गाती नुसते पोवा डे
लावी डोळा झाप डे....आणि देतात काय तर पाव वडे
बसा मग तसेच……….हे असंच चालू राहील...डे बाय डे
(क्रिएटीव्हीटीला काही लिमिट नसते, पण काही लफ डे व्हायला नको म्हणून ....... या पोस्टमध्ये अश्लील आणि वादग्रस्त "डे" जाणीवपूर्वक वापरलेले नाहीयेत ------
होतकरू आणि बापू डे नवकवी - श्रीरंग चितळे
September 19, 2016
खिशांत माझ्या पडली होती,
सुटी नाणी काही,
वस्तूंची ती खरेदी करण्या,
सर्व बाजार पाही ।।१।।
सराफ्याच्या दुकानी दिसला,
एक हिऱ्याचा हार,
डोळे माझे चमकूनी गेले,
फिरती गरगर ।।२।।
दाम विक्रीचे जाणूनी घेता,
हताश मी झालो,
हातातील धनाचे मोजमाप,
करू मी न शकलो ।।३।।
दोन वेळची पूजा करूनी,
जप माळ जपती,
खूप साचले पुण्य आपले,
हे कांहीं समजती ।।४।।
कसा मिळेल ईश्वर त्यांना,
तपोबलाच्या अभावी,
जन्मोजन्मीचे पुण्य साचता,
दर्शन मिळे प्रभावी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
August 16, 2017
August 20, 2013
दृष्टांताची किमया
निराकार तो असूनी व्यापतो,
सर्व विश्व मंडळ,
सूक्ष्मपणातही दिसून येतो,
करी जगाचा प्रतिपाळ ।।१।।
दर्शन देण्यास भक्त जणांना,
धारण करितो रूप,
तसाच दिसे नयनी तुमच्या,
ध्यास लागता खूप ।।२।।
दृष्टांत होणे सत्य घटना ती,
जीवनी तुमच्या घडे,
वेड लागता प्रभू चरणाचे,
सदैव स्वप्न पडे ।।३।।
कुणामध्येही अस्तित्व दाखवी,
हीच त्याची किमया,
परि टिपून घेई खऱ्या भक्ताची,
दृष्टांताची ही माया ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 25, 2016

-- विनोद
July 19, 2010
(आमच्या झोपायच्या खोलीच्या खिडकी समोर उंबराचे झाड आहे. त्यावर चिमण्या राहतात. पहाटे साडेचार पाच वाजल्यापासून त्यांची चिवचिव चालू होते. जाग आल्यावर वाटते झाडच जणू गात आहे. हे गाणे दोन-तीन तास चालू असते.)
उंबराच्या झाडाच्या गाण्याने
पहाटे जाग येते तेव्हा वाटते
जणू कोणी नर्तक
पायात बांधून घुंगरांचा साज
करतोय सुंदर पदन्यास
उंबराच्या झाडात म्हणे असतो
सद्गुरूंचा वावर
म्हणूनच काही चिमणी पाखरं
पहाटेच सुरू करतात
मधुर मंत्रजागर?
असेलही खरे
म्हणूनच म्हणतात का बरे?
चराचर सृष्टीतच
भरला आहे ईश्वर?
पहाटेच्या मंगल वेळी
गोड किलबिल मंजुळ वाणी
गाणारे झाड
अलौकिकाचा स्पर्श!
किमयागार तो
सृष्टीचा इश
जोडूनी दोन्ही कर
त्याला करू वंदन!
-- विनायक अत्रे.
July 14, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti