इच्छा आहे प्रभू , तुझ्या नामस्मरणाची
ऐकून घे कहाणी, अडचणीची ।।
नाम घ्यावे मुखी, एकचित्ताने
सार्थक होईल तेव्हा तप:साधने ।।
संसार पाठी, लावलास तू
गुरफटून त्यात, साध्य न होई हेतू ।।
मला पाहिजे दोन्ही, संसार नि ईश्वर
एकात गुंतता मन, दुसरे न होई साकार ।।
दे प्रभू ,मनाची एक जोडी
संसारात राहून , घेईन प्रभूत गोडी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 21, 2020
सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं
सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी....१,
भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा,
काळाची ती भूक असूनी, माहीत असते सर्वांना....२,
अविरत चालू लपंडाव तो, जगण्या मरण्याचा
शेवट हा जरी निश्चीत असला, हक्क तुम्हां खेळण्याचा....३,
खेळती काही तन्मयतेने, रिझविती इतरजणां,
खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 29, 2019
सामान्यांतूनी असामान्य निर्मिती, ध्येय असावे खरे,
कोळशाच्या खाणीत सांपडती, चमचमणारे हिरे.....१,
उदार होवूनी निसर्ग देतो, समान संधी सर्वा,
परि तेच घेती खेचूनी तिजला, सोडूनी जीवन पर्वा......२,
जीवन म्हणजे अमूल्य देणगी, समज असते काहींना
व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा......३,
जीवन कोडे नाहीं उमगले, कुणास आजवरी
अर्थ आगळे अन् ध्येय निराळे, काढती आपल्या परी....४,
निर्जीव सजीव सर्वांचि मिळूनी, उभारला संसार
हर घटकाने सहभागी व्हावे, लावूनी हातभार....५,
सर्व जगापरी जगत असतां, जगे इतरांसाठी
सामान्यातील असामान्य ठरेतो, ह्याच विश्वापाठीं......६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 8, 2021
एक परिघ ते आंखले आहे
विधात्याने विश्वाभोवतीं
जीवन सारे फिरत असते
एक दिशेनें त्या वरती १
वाहण्याची क्रिया चालली
युगानुयुगें या जगतीं
कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा
एकांच परिघात सारे फिरती २
जेंव्हां कुणीतरी थकून जाई
दुजा उठोनी मदत करी
जीवन मरणाची शर्यत
जिंकण्यासाठीं तो लक्ष्य धरी ३
मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी
नियंत्रित कुणी करी जगाला
परिघ सोडूनी जाण्यासाठीं
दिसत नसे मार्ग कुणाला ४
प्रयत्न तुमचा सदा असावा
मध्यबिंदूकडे तो सरकण्याचा
शक्तिरुप तेथेंच असूनी
त्याच्यांत सामावून जाण्याचा ५
भिती तुमच्या मनीं वसते
कसे जाऊं त्या आंसाकडे
तुकडे होतील या देहाचे
जेव्हां त्या आसांत पडे ६
सोडूनी देण्या तो सारा खेळ
केंद्रस्थानी जाणे, मार्ग असे
विसरुन जाता या देहाला
प्रभू समर्पण करण्यांत असे ७
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
August 25, 2015
शब्दांविना संवादू,असंभव"" तो वाटतो,
किमया त्यांची न्यारी",
अर्थ मर्म दाखवतो,
शब्दांवाचून किती भाषा,
मानव नेमका वापरतो,
परंतु त्यांच्यासम हा ,
म्हणत म्हणत कसा,
वर्चस्व त्यांचे मानतो,--
स्पर्श बोले कधीकधी,
मात्र शब्दांसारखा,
तान्हुल्यांची खास सोय,
जाणे बाळ ममता, माय--!!!
, हाच स्पर्श जादू करे,
प्रेमभावना व्यक्त करे,--!!
आबालवृद्धां आधार वाटे ,
इतुका बोलका अगदी भासे,--
खाणा-खुणा करत लोक,
बोलती काही एकमेकांशी,
मूक सांकेतिक भाषा जणू,
मदत करे सार्थ अशी,--!!
चित्रलिपी केव्हातरी,
आंतरिक संवाद साधे,
मार्मिक प्रसंग रेखाटुनी,
हृदयांशी हृदये जुळवे,
कित्येक कलाही बोलती,
आत्मिक संवाद साधती,
खूण पटे आत्म्याला आत्मी, यथोचित अबोल भाषा साची,
नयनांची भाषा आगळी,
फक्त डोळ्यांमधुनी बोले,
कधी अनेक शब्द हारती,
असे भाव प्रदर्शित करे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
April 8, 2019
देशातील पंचतारांकित हॉटेलात हल्ली अस्सल मराठमोळे जेवण आणि नाष्टा मिळू लागला आहे याचे सर्व श्रेय तरुण तडफदार मराठी शेफना जाते ज्यांनी यासाठी खूप प्रयास केले. त्यात सोलकढी आणि खरवस यांनी तर बाजीच मारली आहे.
July 7, 2015
मनाच्या नदीने कसं
वाहतच रहावं
झाले गेले सारे
ते विसरून जावं
वाटेवरच्या वळणावर
थोड्यावेळ थांबावं
अपरिचित काही मनांना
प्रेमानं जोडावं
मनाच्या काठावर
कधी शांत बसावं
चिंता विवंचनांना
अलगद पाण्यात सोडावं
येणाऱ्या साऱ्या प्रवाहांना
आपल्या पोटात घ्यावं
जिवलगांच्या दूःखांना
कसं प्रेमाने सहावं
मनाच्या नदीने कसं
वाहतच रहावं
मनाच्या नदीने
कसं संयमाने वहावं
संतापाच्या परिणामांना
शांत प्रेमानं भरावं
मदत हवी त्यांच्याकडे
जरूर कधी वळावं
पण आपल्या ध्येयापासून
कधी नाही ढळावं
मनाच्या नदीने कसं
जास्त नाही रेंगाळावं
चंचल अशा मनाला
त्या विध्यात्यास अर्पावं
मनाच्या नदीने कसं
वाहतच रहावं
झाले गेले सारे
ते विसरून जावं.
- डॉ.सुभाष कटकदौंड
September 6, 2018
चल सये ग झणीं,
मांडू या खेळ अंगणी,
लहान वयातली भातुकली,
धांदल बाहुलीच्या लग्नाची,--!!!
लग्न करण्या त्यांचे,
घालत होतो घाट,
धावपळ करत सगळी,
मांडायचा सर्व थाट,----!!!!
इवले इवले बाहुला बाहुली,
सुंदर गोंडस खूप छोटुकली,
मुंडावळ्या बांधून त्यांना,
उभे सगे घेऊनी हाती,--!!!
सासर माहेर सगळे मिळुनी,
अंगण जायचे गजबजुनी,
ठुमकत येई वरमाई,
नाकात झोकात नथ घालुनी,--!!!
देण्याघेण्यावरून गोष्टी,---
मात्र सगळ्या फिस्कटती,
सासरकडच्या आयाबाया,
एकदम सगळ्या रुसून' बसती, --!!
मग आजोबा मोठे ,
उगा मध्यस्थी करती,--!!!
सनई चौघडा घेऊन उभे
त्यांना कशा "खुणा" करिती,--!!!
बाहुल्या'च्या घरचे सांगती,;---
सासरकडची इटुकली पिटुकली,
म्हणती मिळेल का असा जावई,-?जरा जास्तच फणकारुनी,--!!!!
मग तोडगा मधे निघे,
आई आजी म्हणतील तसे ,
पुसावया" जाती, -सगळे,
वधू-वर' पण, इकडे एकटे,--!!!!
पाहून त्यांना हळूच असे,
मोठे आजोबा युक्ती करिती, एकत्र आणून दोघांनाही,--!!!
लग्न लावून मोकळे होती,--!!!
आज आठवते सयी,"
त्या प्रसंगाची लगीन -घाई
असे लग्न लावण्या पण,---
कुणी आजोबा उरला नाही,--!!
-- हिमगौरी कर्वे
January 21, 2019
एकत्र येऊं सारेजण विसरुन जाऊ भेदभाव
जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //धृ//
-- डॉ. भगवान नागापूरकर
April 10, 2014
वेळ येता उकलन होते, साऱ्या प्रश्नांची
जाणून घ्या हो थोडे तुम्ही, रीत निसर्गाची...१,
जेंव्हां तुम्हाला यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी,
वेळ नसे योग्य आली, हेच घ्यावे जाणूनी...२,
प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे
कांहीं काळासाठी थांबवा, प्रयत्न सगळे...३,
काळ लोटतां प्रयत्न होती, पुनरपि सारे,
उकलन होवून गुंत्यांची, आख्खे निघती दोरे...४,
कुणी म्हणती ग्रह अनूकुल, ह्या घटनेला
हीच वेळेची किमयासारी, कशी कळे कुणाला....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 15, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti