असे पंचतारांकित पदार्थ मराठमोळे!

देशातील पंचतारांकित हॉटेलात हल्ली अस्सल मराठमोळे जेवण आणि नाष्टा मिळू लागला आहे याचे सर्व श्रेय तरुण तडफदार मराठी शेफना जाते ज्यांनी यासाठी खूप प्रयास केले. त्यात सोलकढी आणि खरवस यांनी तर बाजीच मारली आहे.



देशात बोलबाला पंचतारांकित हॉटेलांचा,

त्यात मेनुकार्डमध्ये भरणा

इडली, मेदुवडा, डोसा

आणि कॉन्टीनेन्टलचा !

तरुणाईतील शेफनी मराठमोळ्या पदार्थांना

पंचतारांकित हॉटेलात दिला मोठा सन्मान,

सोलकढीने निर्माण केले,

परदेशी पर्यटकांच्यात मनात पहिले स्थान !

पंचतारांकित हॉटेलच्या पार्ट्यांमध्ये

‘सोलकढी’ने पटकाविले वेलकमड्रिंकचे स्थान !

कारण, तिची चवच लय न्यारी,

शरीराला थंडावा देणारी,

भूक वाढविणारी, पाचक आणि,

अनेक पोषक द्रव्ये असलेली,

‘सोलकढी’ला स्टार्टर म्हणूनही पर्यटकांचीच पहिली पसंती !

हल्ली पंचतारांकित हॉटेलात नाष्ट्याला,

उपमा, कांदेपोहे, उसळ आणि मिसळीची चव ‘लय भारी’

हॉटेलच्या आलाकार्ट मेनूमध्ये

‘मसालेभाताची’ चव ‘लय न्यारी !

नेहमीच होते स्वीटडिशने सांगता जेवणाची,

खरवसीची डिशही देशी-विदेशी पर्यटकांच्या आवडीची !

जगदीश पटवर्धन, बोरीवली (प)

Author