February 3, 2022
ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी
आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी
माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती
हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती
जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी
नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी
परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता
टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 29, 2017
जशा संध्याछाया येती, नयन माझे भिजतात ,
आठवणींचे माणिक-मोती,
सर सर खाली ओघळतात,--!!!
हात तुझा धरुनी हाती,
प्रेमाची केली वाटचाल,
नियतीने पण चाल खेळली, प्रितीची दुधारी वाट,--!!!
निळ्याशार गहिऱ्या लोचनी, वाचली प्रीतीचीच *आंण,--
तनामनात सामावून गेली,
तव ओढीला नच वाण,--!!!
आज कितीदा स्मरली,
प्रीत फुले ती सुगंधी,
परस्परांवर सारी उधळत,
करायचो रे नजरबंदी,--!!!
वाद अबोल्यांच्या त्या क्षणी, तरुणपणाचा सगळा जोश,
शब्द जरी कठोर बोलती,
श्वासात गुंतले सदा श्वास,--!!!
ऋतू सारे सारखे बदलती,
स्मरण यात्रेचा काळ लोटत,
इकडून तिकडे वारे वाहती,
त्यात आठवांचे ओले साद,--!!
किती काळ पुढे जाई,
अजूनही उभे तिथेच आपण,
पाणी पुलाखालून जाई,
हृदयी तरी आठवणी धरून,--!!
© हिमगौरी कर्वे.
February 10, 2020
राहू केतुनो सोडून द्या तुम्ही,मगरमिठीतून चंद्राला
बघा बघा ह्या प्रथ्वीवरती,काय तो हा: हा: कार मजला
प्रेमिजानांचा प्रेमबिंदू तो,सौंदर्याचा मुकुटमणी
झाकळला सारा नभात हा,म्हणती त्यास गिळला कुणी
आत्मा जाता सोडून देहा,उरे न कांही मागे
चंद्र चांदणे नभात नसता,सौंदर्याची मिटतील अंगे
सौंदर्यातची बघतो सारे,जगण्यासाठी सौंदर्य हवे
विश्वचक्र हे फिरत रहाण्या चंद्राचे आस्तित्व सतत हवे
नष्ट होतील जीवजीवाणू,आनंद त्यांचा जाईल विरुनी
बलिदानाच्या पुण्याईने परि, सुटेल चंद्र मगरमिठीतून
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 30, 2017
ये ! प्रियकरा स्वप्नात माझ्या, स्वप्न मजला भावते
कल्पनेचे राज्य जरी असे, आनंददायी वाटते....II धृ II
तव प्रतिमा ही मनी बसवली, आठवण सदैव येवू लागली
जागेपणी जे मिळे न मजला, स्वप्नी मी सारे तेच अनुभवते.......१
स्वप्न मजला भावते,
पूर्णत्वाचे सुख आगळे, जीवन प्रवाही येती अडथळे
हवे हवेसे मनी ठरवी ते, केवळ स्वप्नची मिळवूनी देते....२
स्वप्न मजला भावते,
कल्पना भाव तरंगे उठूनी, रात्री गेल्या कित्येक रंगूनी
क्षणीक असूनी भ्रामक जरी, स्वप्न दिलासी देवून जाते....३
स्वप्न मजला भावते,
विश्वपसारा मायेचा हा, जीवन गुंता दिसतो पहा
किरण आशेचे त्यात चमकूनी, स्वप्न हे वरदान ठरते....४
स्वप्न मजला भावते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 7, 2019
मी अलवार कवटाळीतो
अंतरीच्या गतआठवांना
हॄदयस्थ, ते ध्यास भास
स्मृतींनाच, उलगडताना....
भावस्पर्ष ! मृदुल कृपाळू
जगविती माझ्या स्पंदनांना
अबोल ओंजळ भावनांची
मी, रिती कुठे करू कळेना....
दिव्यत्व,भक्तीभावप्रीतीचे
वेदनांची, क्षालनी सांत्वना
ओघळ लोचनी जाणिवांचे
स्मृतींचा, गंधाळ हुंगतांना....
माथी आभाळ सावळबाधी
सांजवेळी हुरहुर पाऊलांना
ओढ, हरिपावरीच्या सुरांची
मी नित्य आळवितो दयाघना....
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २३२
१२/९/२०२२
October 4, 2022
रुजला पाहीजे विचार मनांत
सारेच प्रभुचे असे ह्या जगांत
जो वरी आहे मी माझे येथे असे
त्या क्षणापर्यंत स्वार्थ मनीं वसे
स्वार्थयुक्त मन मुक्त होत नसे
मुक्ती येई पर्यंत पुनर्जन्म असे
बिंबता मनांत माझे नाहीं कांहीं
प्रभूचे समजता आत्मा मुक्त होई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 2, 2017
रक्तातुनी गुण-दोष उतरतो, वंश परंपरेने
व्यक्तीतील स्वभाव धर्म, जाणता येतो रक्ताने...१,
मनांतील विचार मालिका, कृत्य करण्या लाविती
सभोवतालच्या परिस्थिती रूपे, रक्ताला जागविती...२,
कर्म फळाच्या लहरींना, रक्त शोषून घेई,
ह्याच गुणमिश्रीत रक्तामधूनी, बिजे उत्पन्न होई....३,
बिजांचे मग रोपण होवूनी, नव जीवन येते
स्वभाव गुणांची मालिका, अशीच पुढे जाते...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 25, 2020
पर्वत शिखरीं जाऊन खोदून आणली माती,
हातकौशल्यने केला एक गणपती ।।१।।
मूर्ती बनली सुरेख आनंद देई मनां,
दाम मिळेल ठीक हीच आली भावना ।।२।।
घेऊन गेलो बाजारीं उल्हासाच्या भरांत,
कुणी न त्यासी पसंत करी निराश झालो मनांत ।।३।।
बहूत दिवस प्रयत्न केला कुणी न घेई विकत,
कंटाळून नेऊन दिला गणपती शाळेत ।।४।।
भरले होते भव्य प्रदर्शन हस्तकला कौशल्याचे,
नवल वाटले गणपती बघून दालनातील सुरवातीचे ।।५।।
चकीत झालो जाणूनी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार,
गणपतीच्या भव्यतेनी मिळविला हा अधिकार ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 16, 2015
येतात तुझे आठव,
डोळ्यांत काळे ढग,
उरांत फक्त पाझर,
शिवाय नुसते रौरव ,--!!!
येतात तुझे आठव ,
होते सरींची बरसात,
चित्तात उठे तूफान",
मनात चालते तांडव,--!!!
येतात तुझे आठव,
प्रीतीचे हे संजीवन ,
स्मृतींचे मोठे आवर्तन,
त्यांचे लागती न थांग,---!!!
येतात तुझे आठव,
सरींची त्या उधळण,
शब्दांचे पोकळ वाद,
कल्पनांचे नुसतेच डाव,--!!!
येतात तुझे आठव,
अश्रू असूनही शुष्क,
मन मात्र पाणथळ,
कसानुसा होई जीव,--!!!
येतात तुझे आठव,
भोवती दुःखाची पाचर,
सहवासाचे अमृतथेंब
, कधी बनती विष:कण,--!!!
येतात तुझे आठव,
प्रेमाचे निव्वळ भास,
आत्म्यात फक्त उलघाल,
काट्यांची बनते शेज,--!!!
येतात तुझे आठव,
कधी येईल राघववेळ,
कुशीत तुझ्या शिरून,
संपवेन दुर्भाग्याचा खेळ,--!!!!
©️ हिमगौरी कर्वे.
March 22, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti