उगवले होते जंगलात ते उंच माळावरी
रंग आकर्षक फुलझाडांचे मन प्रसन्न करी //
जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी
खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी //
वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे
ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें //
वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा
स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा//
कुणीतरी आला वाटसरु तो घेउन गेला त्याला
बागेमधल्या कुंडीमध्ये मान तयाचा झाला //
खतपाणी भरपूर असूनी मुंग्या किडे नव्हते
आधूनिकतेची दृष्टी ठेवूनी वाढवित त्यास होते//
डेरेदार डौलदार भरगच्च भासला तो आता
परि स्वातंत्र्याच्या जीवनाला कात्री लागून जाता //
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 16, 2017
अगदी मॉर्डन कॉलेज कुमारांचे
बसले एक टोळके गाडीत समोर
हासत होते, खिदळत होते, गप्पा मारीत होते,
ऐकण्यासारखे होते परंतु सांगण्यासारखे नव्हते.
स्टेशन येताच सारे उतरले
तेव्हा मी एकास विचारले
“आपल नाव सांगता ?”
उतरता उतरता ऐकू आले
“ मी आहे मिस निता ”
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 22, 2019
ठेवावं लांब लोका , भविष्य सांगणाऱ्या
बाळास माहिती द्या , आताच रांगणाऱ्या /
गलका कसा बरे हा ? भवताल भाटगाने
हलकेच नजर ठेवा ,लोकांस पांगणाऱ्या /
आणील आसमंता ,ठेवील या कराशी
तोडाच त्या कराला ,भिकेस मागणाऱ्या /
सारेच आनंदी वातावरण भोवताली
शोधाच कोण आहे , बाम्बस टांगणाऱ्या /
गझलेत 'कौशला ' म्हणे हा मक्ताच झाला
नाहीच आवडली ,डांबास डागणाऱ्या
-- श्रीकांत पेटकर
February 25, 2019
सुरमयी गीत गाऊ,चल आज प्रीतीत नाहू
चल प्रेममयी गाव पाहू,जाऊनी तिथेच राहू।।धृ।।
तुझ्या सवे निशा ढळे,
धुंद पहाट वात येई
तिथे माझ्या मिठीत, येशिल का?
मिठीत येऊनी, स्वप्ननगरी रत होऊ
चल प्रेममयी गाव पाहू,जाऊनी तिथेच राहू।।१।।
भाव तुझे मनातील,हलकेच वदशील का?
भावसुमांची महफिल ,तिथेच छान भरेल का?
प्रीतीचा गंध नवा,चल चौफेर उधळू
चल प्रेममयी गाव पाहू,जाऊनी तिथेच राहू।।२।।
प्रीतीत नाहूया,सुखात लोळूया
तुझ्या-माझ्या प्रीतीचा,रंग बघुया
प्रीतीच्या रंगात,रंगुनीएकरुप होऊ
चल प्रेममयी गाव पाहू,जाऊनी तिथेच राहू।।३।।
-- सौ. माणिक शुरजोशी
November 24, 2019
लुळा पांगळा बसूनी एकटा, गाई सुंदर गाणे,
आवाजातील मधूरता, शिकवी त्याला जगणे....१,
जगतो देह कशासाठी, हातपाय असता पांगळे
मरण नसता आपले हाती, जगणे हे आले.....२,
लुळा असला देह जरी, मन सुदृढ होते
जगण्यासाठी सदैव त्याला, उभारी देत होते.....३,
गीत ऐकता जमे भोवती, रसिक जन सारे
नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे ! ....४,
असमान्य ते एकचि मिळता, उणीवतेची खंत कशी
दुबळ्या देही कला श्रेष्ठ ती, वीज चमकते रात्री जशी....५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 15, 2019
नयन मनोहर, संध्येसम गं
August 24, 2021
सारे धर्म मानव निर्मीत
त्यांतच आणली जात पात ।।
सर्व धर्म महान
तत्वज्ञानाची असे खाण ।।
प्रत्येकाचा धर्म निराळा
जन्मताचि मिळाला ।।
व्यर्थ का भांडता धर्मावरुन
तो तर मिळाला जन्मापासून ।।
भेदभाव जावे विसरुन
त्यातच सर्वांचे कल्याण ।।
स्वधर्म तत्वे पाळा घरांत
बाहेर एक मानवधर्म सर्वांत ।।
मानवधर्म फक्त मानवता
त्यांतची मानवाची श्रेष्ठता ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 8, 2018
जलबिंदू
इवलासा
आवडतो
हा फारसा
नभात तो
दावतोना
इंद्रधनू
शोभतोना
थेंबातूनी
जाता तेज
दिसतसे
रंग शेज
कधी दिसे
मज मोती
कधी वाटे
हिरा किती
पहाटेस
दवबिंदू
रुप घेई
जलसिंधू
हिमालयी
हा गोठतो
क्षणार्धात
बर्फ होतो
द्रव स्थिती
वायू स्थिती
थेंबा तुझी
जलस्थिती
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
February 22, 2020
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल
जय हरि पांडुरंग विठ्ठल
कनवाळू माय ब्रह्मांडाची
सावळा जगजेठी विठ्ठल
दंगुनी आषाढ़ी कार्तिकी
नाचतो वाळवंटी विठ्ठल
पदन्यास तो वैष्णवांचा
ध्यास पाऊलांना विठ्ठल
गरजता टाळमृदंग चिपळी
नाद घुमतो विठ्ठल विठ्ठल
नेत्री पाझरते रुपड़े सावळे
श्वासाश्वासात भास विठ्ठल
नाही कुठे अंतरी भेदभाव
द्वैतअद्वैत एकरूप विठ्ठल
सुखदुःखाचेच परिमार्जन
अवघे ब्रह्म साक्षात विठ्ठल
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १५५.
२५ - ६ - २०२२.
August 4, 2022
खूप भूक लागलेली आहे.
पाऊस सुद्धा खूप पडत आहे.
तिचं घर सुद्धा दूर आहे.
नाईलाज म्हणून पावसात भिजत घरी जावं !
घरातून कांदे भजी चा वास यावा .
त्या वासात चहा चा सुद्धा वास मिसळलेला असावा.
आत मधून आपली "ती" गप्पाटप्पात रमलेले खिडकीतून दिसावी .....
आपण door bell वाजवत रहावी .......
नंतर, कड़ी वाजवत रहावी ........
नंतर, दार वाजवत रहावं .......
तरी ही "तीने" दार उघडू नये ........
पोटात आग !
अंगावर पाऊस !
"तिच्या" वागण्याने ह्रुदयlला वेदना ....!!!
अगदी अस्सचं होतं बघा ......
जेंव्हा "ती" Online असूनही Reply देत नाही तेंव्हा ...!!!!
-- विनोद डावरे, परभणी.
9765 998 999
September 3, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti