आता तरी लस घे…

नकोसा झालाय हा करोना
सहनही होत नाही आणि
सांगताही येत नाही

ह्याच्या झळा पार होरपळून टाकतात
ह्याच्या असण्याने शब्दही शब्दाला गिळून टाकतात

का हा असा छळतो
काही कळत नाही
मन सतत पळ म्हणत
पण तो काही पळत नाही

दुःखाच्या घेऊन येतो लाटा
जगण्याच्या बंद करतो वाटा
माणूस फक्त करतोय आटापिटा
पण श्वास मात्र थांबत जाई

जीवनचक्र मात्र चालू राहणार ,
उद्याचा दिवस आपणही पाहणार

विषाणूच तो आता दमलाय
त्याच्याच मैताचा खेळ मांडलाय
ठरलाय आता आपला way
येतोय 1 मे
आता तरी लस घे...

-- © मकरंद आपटे 2021



नकोसा झालाय हा करोना
सहनही होत नाही आणि
सांगताही येत नाही

ह्याच्या झळा पार होरपळून टाकतात
ह्याच्या असण्याने शब्दही शब्दाला गिळून टाकतात

का हा असा छळतो
काही कळत नाही
मन सतत पळ म्हणत
पण तो काही पळत नाही

दुःखाच्या घेऊन येतो लाटा
जगण्याच्या बंद करतो वाटा
माणूस फक्त करतोय आटापिटा
पण श्वास मात्र थांबत जाई

जीवनचक्र मात्र चालू राहणार ,
उद्याचा दिवस आपणही पाहणार

विषाणूच तो आता दमलाय
त्याच्याच मैताचा खेळ मांडलाय
ठरलाय आता आपला way
येतोय 1 मे
आता तरी लस घे…

— © मकरंद आपटे 2021

Author