संप ……!!!

संप …….!!! एक कविता……..!!!



संप संप संप……..

संपाने नाही काही संपत,उलट जनतेचे हाल मात्र जातात वाढत

संप जरी नसला धरणीकंप,संपाने होतो सगल्यांचा मात्र थरकंप

संप हि एक तलवार आहे,संप हे दुधारी हत्त्यार आहे

कधी ते संपक-यांना साथ देते,तर कधी कधी ते अंगावरहि उलटते

संपाचा घेवून

तुम्ही आडोसा,नका करू जनतेचा दिवस नकोसा

संपानेच होतील मागण्या मान्य,त्यासाठी का करावी चर्चेची बाजू अमान्य

चर्चा करा, तडजोड करा,रोजच्या कारभाराचा मात्र नका उडवू बोजवारा

सर्व सामान्य जनतेची एकच मागणी,नाहीतर सगळ्यांना मिळेल सा-या जनतेची डागणी.

— मयूर तोंडवळकर
९८६९७०४८८२

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →