चिमण्या आल्या दोन कोठूनी,
बांधून गेल्या घरटे ।
खेळूनी नाचूनी,
चिव चिव गाणे गात वाटे ।।१।।
झाडावरती उंच बसूनी,
रात्र घालवी हलके हलके ।
दाणा टिपणे पाणी पिणे,
स्वछंदाचे घेवूनी झोके ।।२।।
संसार चक्र भोवती पडता,
गेल्या दोघी त्यातच गुंतूनी ।
नव पिल्लाच्या सेवेसाठी,
घरटे केले काड्या आणूनी ।।३।।
पिल्लांना त्या पंख फुटता,
उडूनी गेल्या घरटे सोडूनी ।
अल्प काळाचे बंधन तोडीत,
जगण्या पुनरपी स्वच्छंदानी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
July 25, 2016
आयुष्य संपत जाते, पण प्रेम संपत नाही
किती करा परमार्थ, पण क्रोध आटपत नाही
आधी कष्टे स्वतःसाठी, मग कुटुंबासाठी
भरुन भांड ओसंडे, तरी लोभ सुटत नाही
पैसा-अडका, जमीन-जुमला, घराण्याचा गर्व
जववर असे दैव अनुकुल, मद हा हटत नाही
सकाळ, दुपार, संध्याकाळ - देई शिव्या अपार
एक दिवशीही मत्सर, केल्याविना दिसत नाही
कुणावरही विश्र्वास न करी, सर्व स्वतःच करी
वेळेस नातं तोडी, पण संशय सोडत नाही
श्री सुनील देसाई
१८/०७/२०२२
July 19, 2022
राम नाम ओठी जपता
रामराया हॄदयी वसतो...
करावा रामनामाचा धावा
तो सदैव श्वासात नांदतो...
राम नाम सागर मोक्षानंदी
दुःख वेदनांतुनी सावरतो...
राम अवतार विश्वात्म्याचा
साऱ्या ब्रह्मांडाला रक्षितो..
तो देवगुणी , सदविचारी
सकलांच्या मना उजळीतो..
विध्वंसक तो षडरिपूंचा
शाश्वती ब्रह्मांडी नांदतो...
जीवन रामनामी सन्मार्गी
जाणता जीवा मोक्ष लाभतो..
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २२९
८/९/२०२२
October 10, 2022
आपण प्रेमात का पडतो ?, याला जस नेमकं उत्तर देता येत नाही ,तसेच एखाद गाणं आपल्याला का आवडते ? ,याचेही उत्तर कधी कधी सापडत नाही . बस ,ऐकायला आवडत !असेच एक गाणं आहे ,जे मला आवडत . आणि हि आवड गेल्या पन्नास वर्षा पासून कायम आहे !
January 28, 2018
ठिणगी पडूनी पेटे ज्वाला, आकाशाला जावूनी भिडती
नष्ट करूनी डोंगर जंगल, हा: हा: कार तो माजविती...१
शब्दांची ही ठिणगी अशीच, क्रोधाचा तो वणवा पेटवी
मर्मघाती तो शब्द पडतां, अहंकार तो जागृत होई...२,
सूड वृत्तीचा जन्म होवूनी, वातावरण ते दुषीत होते
संघर्षाचा अग्नी पेटूनी , जीवन सारे उजाड करिते...३,
कारण जरी ते असे क्षुल्लक, विनाश व्याप्ती होई भयकंर
केवळ तुमचे प्रेमळ शब्द, दुष्ट चक्र ते थांबवी सत्वर ….४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 24, 2021
भाकरी साठी वणवण
फिरलो दाही दिशा
चंद्र -तारे चमकती डोळ्यासमोर
अशी झाली माझी दशा
-- सौ. माणिक दिलीप शूरजोशी
December 3, 2019
समुद्राला अनुभवण्यासाठी
त्याच्या कुशीत शिरावे लागते
समुद्राची खोली मोजण्यासाठी
त्याच्या तळाशी जावे लागते
समुद्राची लांबी रुंदी कळण्यासाठी
जगाची सफर करावी लागते
समुद्रांचे रंग समजण्यासाठी
त्याच्या जुनियेत जगावे लागते
समुद्राची गोडी अनुभवण्यासाठी
त्यावर प्रेम करावे लागते
समुद्रांच्या लाटांवर स्वार होण्यासाठी
अभ्यास, अनुभव आणि धाडस असावे लागते
चक्रीवादळात अडकणार्यांना
समुद्र मंथनाचा अनुभवातून
अमृत विष आणि तत्नांची ओळख पटते
वसुंधरेचा सत्तर टक्के भाग
का पाण्याने व्यापला याचा
अर्थ समजण्यास पुरेसे आहे !
जगदीश पटवर्धन
October 31, 2017
मोहरली ही लेखणी
काव्यात नित्य रमली
लेखणी माझी देखणी
काव्य सुमे स्फुरली
।।१।।
परखड बोलते ही
शब्दवार करते ही
झरझर स्त्रवते ही
जहाल वाटते ही
।।२।।
तोलून मापून भाव
योजून मोजून घाव
व्यक्त होई भरधाव
जपूनच हो राव
।।३।।
अग्रलेख नित्य लिही
कधी ललित लेख ही
भारुड,गवळण ही
रचे छान ओवी ही
।।४।।
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
January 13, 2020
निरागस भावनांची गीतांजली
निर्मली, भावफुलांची रंगोली
दीपज्योत! अंतरी संवेदनांची
निक्षुनी! सुरेल सत्य गुंफलेली
सात्विक, प्रीतभाव मनसागरी
अलवार प्रसवती शब्द ओंजळी
राशी! सुखदुःखांच्याच ललाटी
झरझरते भावगंगा ओथंबलेली
झाले मुक्तमोकळे, अव्यक्त मन
शब्दफुले! कवितेतूनी गुंफलेली
काव्यप्रतिभा! वरदान दयाघनी
प्रतिभा! जणु प्रांगणी मंतरलेली
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ३४.
३ - २ - २०२२.
February 11, 2022
जगणे असते होरपळ,
तना-मना-भावनांची,
रोज रोज प्रत्येक पळ,
जाणीव होई असुरक्षेची,
षट्रिपुंचे जगात वर्चस्व,
ते जनांवर हक्क गाजविती, माणुसकी करुणा अहिंसा,
भावना थोर मागे पडती,
सत्ता पैसा लालच,---
अधिकार फक्त ठाऊक असती, कर्तव्य खाती कशाशी,
कुंठित झालेली मती,--!!!
असते कोणाचे कोण-?
ना आई बापा विचारती,
*अंधश्रद्धेखातर केवळ,
लेकरेबाळे बळी देती*,
सत्य सुंदर शिव,
सगळ्यांना खुपसले पोटी, सैतानाचे नाव मानव,
ही शोकांतिकाच मोठी,
अशा या दुनियेत प्राण,
देवा माझे घुसमटती,
सुटका व्हावी आता यातून,
कित्येक तुला असे आळवती,
कुठे दिसेना खरे प्रेम,
मद माया मोह असती,
सूत्र जीवनाचे किती उथळ,
सर्व त्याच्या आहारी जाती, जिवाची ही अशी तडफड,
सांगा कुठे कशी लपवावी
प्राणपक्षी उडण्या उत्सुक,
मरणवेळही का तरसावी,--??
हिमगौरी कर्वे. ©
August 27, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti