(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कॉन्ट्रॅक्ट

    अठ्ठावीस युगांचं लिझ
    आता संपलेलं आहे
    विठ्ठला, तुझ्या पायाखालची
    वीट आता त्यांची आहे
    ना तुझी - ना पुंडलिकाची
    त्या धनदांडग्या बिल्डर्सची
    बेगुमान राजकारण्यांची
    ज्यांनी केव्हांच खरेदी केलेय
    येथील प्रत्येक वीट अन् वीट.

    हां! देऊ करतील
    तुला, ते एकादी सीट
    कारण तसा तू प्रसिद्ध
    मात्र मोहरांच्या गोणी
    ठेव सिद्ध.

    नेऊन ओत त्यांच्या
    कोठारामध्ये, गुपचूप
    मग आणतील ते
    तुला निवडून -
    निवडून येताच एक मात्र कर
    त्या टाळकर्‍यांच्या दिंड्या
    करुन टाक बंद एकदम
    किती किती प्रदूषण
    त्यापेक्षा बोलाव जॅक्सन
    कर सौंदर्यस्पर्धेची आखणी
    म्हणजे मंत्रीपदी नक्की

    -- सुधा मोकाशी

      June 4, 2011


  • बंधनातील चिमणी

    चिव चिव करीत, एक चिमणी आली ।
    दर्पणाच्या चौकटीवरती, येवून ती बसली ।।
    बघूनी दूजी चिमणी दर्पणी, चकीत झाली होती ।
    वाटूं लागले या चिमणीला, आंत अडकली ती ।।
    उत्सुकता नि तगमग दिसे, चेहऱ्यावरी ।
    चारी दिशेने बघत होती, आंतल्या चिमणी परी ।।
    औत्सुक्याचे भाव सारे दिसती, आतील चिमणीतही ।
    कशी करूं तिची बंधन मुक्ती, काळजी लागून राही ।।
    चोंच मारीते आवाज करिते, यत्न्य केले सारे ।
    श्रम होवूनी थकूनी गेली, हातीं न कांहीं उरे ।।
    चिंता लागली चिंता बघूनी, या चिमणीला ।
    चलबिचल ही जेवढी होती, तसेंच दिसे हिला ।।
    स्वबांधवांना मदत करणे, त्यांच्या संकटी ।
    पशू पक्षांतही दिसून येते, तत्वें ही मोठी ।।
    चालले होते प्रयत्न निष्फळ, या चिमणीचे ।
    परि जिद्द ठेवतां भान नव्हते, आपल्या देहाचे ।।
    कांच पडली फूटून खालती, तडा त्यास जावूनी ।
    एक आवाज तेथे घुमला, घाबरली चिमणी ।।
    जरी देह झाला रक्तबंबाळ, यश चमकले तेथें ।
    समजत होती चिमणी बिचारी, बंधन तोडले ते ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 6, 2016


  • ऋणानुबंध

    ठाऊक नव्हते कालपावतो

    नांव तुझे आणि गांवही

    क्षणांत जुळले अचानक परि

    नाते आपुले जीवनप्रवाही

      August 17, 2011


  • ती कशी असेल

    ती कशी असेल
    किवा तो कसा असेल
    त्याचा किवा तिचा वेळ
    आरशासमोर जाऊ लागतो
    घरचे टिंगल करू लागतात
    पण त्यांना हे कळत नाही
    त्यांनी पण त्या वेळी हेच
    केले असणार अर्थात
    पदरी काही न पडल्यामुळे
    ही टिंगल सुरु होते
    हिरवा रंग हिरवा दिसू
    लागतो तेव्हा तो किवा ती
    असेच करणार
    तेव्हा टिंगल करताना
    आपले करपलेले
    भूतकाळ तसेच ठेवा
    तुमच्या जवळ
    तो आणि ती असेच वागणार
    -- सतीश चाफेकर.

      December 15, 2021


  • कधी हसावे कधी रडावे

    कधी हसावे कधी रडावे
    जीवन गाणे गात रहावे
    आयुष्याच्या वेलीवर मग
    चार माणसे हसत जोडावे
    कोण न कुणाचा असा इथे
    दुःखाचे थेंब हास्यात बुडावे
    रडता रडता पटकन हसावे
    हसता हसता मरणं यावे
    औट घटकेचा खेळ सारा
    जमतील सगे सोयरे सारे
    मरणं येईल कधी समोर
    शब्दांतून हास्य अलगद खुलावे
    असतील आपले नाते कुठले
    काव्यांत ओळख उरेल जराशी
    हसता हसता उलगडे बंध
    मरणं यावे अलगद पाऊली
    उरतील खुणा अलगद काही
    स्मरतील चांदण शब्द अबोली
    हसत हसत दुःखात भिजतील
    तुमच्या माझ्या ओळख गाठी
    -- स्वाती ठोंबरे.

      January 30, 2022


  • पक्षी भाषा

    बराच काळ चिवचिव करीत एक दिसे चिमणीं

    काय बरे तिज लागत असावे विचार आला मनी...१,

    तगमग आणि उत्सुक दृष्टीने बघे चोंहिकडे

    परि लक्ष वेधी ती हालचालींनीं आपल्याकडे....२,

    शिकवतेस कां ? तूझी चिवचिव भाषा मजला

    मदत करिन मी शक्तीयुक्तीने दु:ख सारण्याला...३,

    बघूनी मजकडे चिमणी ओरडे मोठ्या रागानें

    समर्थ आहे मी माझ्या परि ती नको मदत घेणे...४,

    मानवप्राणी तूं एक असूनी बुद्धीमान आहे

    मधूर बोलूनी इतरावरती छाप पाडीत जाये...५

    शिकून घेशील हलके हलके माझी ती भाषा

    पक्षावरती वर्चस्व गाजविण्या येईल तुज नशा...६,

    जें जें कांहीं तुज नूतन दिसते ह्या जगाते

    धडपड करूनी सारे मिळवी प्रयत्न करूनी ते...७

    मोठेपण मिळाले तुजला आपल्या बुद्धीने

    दुरपयोग केलास त्याचा तूं आखूनी योजने...८,

    तुला वाटते यश मिळविले आपल्या परिने

    असहाय्य केलेस इतर जीवनां ह्या जगी जगणे...९,

    पक्षी भाषा अवगत करणे साह्यासाठी नसे

    भांडणे जुंपूनी आमच्यामध्ये गंमत बघत बसे....१०,

    फसवे बोलत जवळीं घेवून आम्हा बंदी करी

    विश्वासघात हा सहज स्वभाव दिसे तुझ्यापरी...११

    कसा टाकूं मी दगड स्वत: माझ्या पायावरी

    पक्षी होवूनी जर आलास तूं भाषा शिकवील सारी....१२,

    भटकते पिल्लू तिच्या जवळीं दिसले मजला

    शांत होवूनी चिमणी उडाली त्याच वेळेला....१३

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      April 13, 2020


  • स्वप्न आणि जागेपण

    एक ती झोप स्वप्न बघत राही
    शिणवून शरीर ताप जीवास सुख देई

    स्वप्न जाई विसरुन जाग येता मनां
    जागे मन स्वप्नांत भासवी वेगळेपणा

    एकाच मनाच्या दिसे ह्या दोन भुमिका
    भिन्नता त्यांत भासे जाऊन दोन टोकां

    स्वप्न आणि जागेपण देहाच्या दोन स्थिती
    नाण्याच्या बाजू दोन एकमेका न मिळती

    डॉ. भगवान नागापूरकर
    २४- १११२८३

      September 28, 2014


  • देता आणि खाता

    देणाऱ्याने देत जावे
    घेणाऱ्याने घेत जावे ॥ धृ ॥

    सत्तेवरल्या मंत्र्याकडून
    भले मोठे पोट घ्यावे
    मऊ मऊ खुर्चीसाठी
    डावपेच त्यांचेच खेळावे ॥ १ ॥

    गरीबशा लोकांकडून
    गरीबीची दु:खे घ्यावी
    पोटातल्या आगीसाठी
    हातचलाखी शिकावी ॥ २ ॥

    भडकलेल्या आगीवरुन
    तडकण्याचा गुण घ्यावा
    भरलेल्याशा 'खिशा'कडून
    आपला तेवढा 'हप्ता' खावा ॥ ३ ॥

    मेलेल्याने मरत रहावे
    खाणाऱ्याने खात जावे
    नरकातल्या जागेविषयी
    'खाऊबा'ने निश्चिंत रहावे ॥ ४ ॥

    (कवी विंदा करंदीकरांची 'देता' कविता, जी आमच्या शालेय अभ्यासक्रमात होती, ती प्रस्तुत कवितेची स्फूर्ती आहे.)

    -यतीन सामंत
    ऋणानुबंध या कविता संग्रहातून
    (१९७४)

      June 23, 2022


  • ब्लँक चेक

    नाव-तारीख घालून माझ्या सहीचा चेक तिला दिला,

    तेव्हा रकमेची मोकळी चौकट पाहून तिला झालेला

    विस्मय सारायला मी म्हंटलं , "शाई संपली,

    तू घालून घेशील रक्कम...?!"

    मान झुकवत उमललेले मंद स्मित

    लपवताना ती "हो" म्हणाली खरी , पण ते पेन

    पारदर्शक होतं आणि शाई अर्ध्याहून जरा जास्तंच....!

    आठवड्याभरात रुपयाची डेबिट एन्ट्री....तिच्या नावाने....

    माझ्या रुपयातले लाखमोलाचे सोळा सच्चे आणे वेचून गेली...

    एकाच्या उजवीकडे पाच शून्य घालताना

    बहुधा तिच्याही पेनातली शाई संपली असावी.....!!

    - रोहित

      February 15, 2023


  • जिवलगा

    जवळी येताच तू
    जग नवे भेटले
    स्वप्न जागेपणी पाहते वाटले ll

    सुखाच्या सरी
    झेलतांना खुले
    पुन्हा ते तुझे रूप भासातले ll

    का शहारा फुटेना
    मनाला अता
    पांघरुनी तुझा श्वास घेता ll

    रंग माझा तुला
    गंध माझा तुला
    जिवलगा s s s s जिवलगा ll

    भास ध्यानी मनीं
    स्वप्नी जागेपणी
    तूच तू तूच रे
    जिवलगा s s s s जिवलगा ll

    -- ...... मी मानसी

      June 14, 2019