विचारांची उठूनी वादळे
अशांत होते चित्त सदा
आवर घालण्या चंचल मना
अपयशी झालो अनेकदां
विष्णतेच्या स्थितीमध्यें
नदीकांठच्या किनारीं गेलो
वटवृक्षाच्या छायेखालच्या
चौरस आसनावरी बसलो
डोळे मिटूनी शांत बसतां
अवचित घटना ती घडली
विचारांतले दुःख जावूनी
आनंदी भावना येऊं लागली
एक साधूजन ध्यान लावीत
बसत होता त्या आसनावरी
पवित्र्याची वलये फिरती
आसन दिसले रिकामें जरी
वातावरणाची ही किमया
अनुभवते ती प्रखरतेनें
शुद्ध अशुद्ध ते विचार येती
सभोवतालच्या जाणिवेने
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail - bknagapurkar@gmail.com
January 20, 2013
देवा तुझा मी सोनार
माझे काय बरे होणार
पैजण होऊ पाहे पायी
परंतु घुंगरु वाजलं नाही
मग कैसे रुनझुणणार
माझे काय बरें होणार?
मौतीक माळा होऊ पाही
परी मौतीक गुंफत नाही
कैसी मी रुळणार
माझे काय बरें होणार?
कमरपट्टा होऊ पाही
चाप बंधनी अडकत नाही
कैसी मी कसणार
देवा काय बरे होणार?
मुकूट मस्तकी होऊ पाही
मयूरपंख ना परी त्यावरती
कैसी मी ठसणार
देवा काय बरें होणार?
पायी जडावा होऊ पाही
शिवण गुंफूनी विणली जायी
चपकल मी बसणार
देवा पायी तुझ्या असणार
बनुनी जडावा रहीन पायी
घर्षण होऊनी फाटत जायी
पाय तुझे जपणार
देवा हेच बरें होणार
माझे हेच बरें होणार |
--चंदाराणी कोंडाळकर
December 2, 2015
येता पहाट चैतन्याची
जीव अलवार जागतो
प्रसवता किरण रविचे
आत्मा, ब्रह्मांडी रमतो...
स्पर्श जाणिवांचा नित्य
मनभावनांशी खेळतो
इच्छा प्रत्येकाची वेगळी
जो तो स्वसुखा शोधतो...
कालचक्र हे पूर्वकर्माचे
जीव नित्य इथे भोगतो
क्षण सारेच अनोळखी
ओंजळीत झेलित राहतो...
जीवाजीवा उद्याची चिंता
हा बेभरोसा असह्य होतो
नियती चक्र सांजाळणारे
अंतरी अंधार दाटुनी येतो...
–वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र.२१०
२०/८/२०२२
September 22, 2022
आम्ही इंग्लिश मेडीयम करत चुका केल्या त्या चुकांवर चुका होता आहेत. त्या कधी थांबणार ? . विषय खूप गंभीर आहे. सर्वानीच गंभीर होऊन काहीतरी चांगला मार्ग काढायला हवा .
January 16, 2024
November 19, 2021
November 11, 2021
जेव्हां मजला कळत होते, निद्रेत आहे मी
जागृत स्थिती असूनी मनाची, शरीर होते निकामीं ।।१।।
निद्रेमधल्या स्थितीत जाता, जाग न राही तेथे
जागेपण आणि निद्रा दोन्हीं, एकत्र न येते ।।२।।
निद्रावस्था नि जागेपणा, याहून दुजे कोणते ?
ध्यान स्थिति ही आगळी असूनी, मध्य बिंदू साधते ।।३।।
देह मनाला विश्रांती देई, ध्यान अवस्था ही
ध्यानामधली ऊर्जा सारी, ईश्वरार्पण होई ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 5, 2018
December 13, 2013
घटना' जेव्हां घडली अघटित ।
कुणीही नव्हते शेजारी ।।
कां उगाच रुख रुख वाटते ।
दडपण येवूनी उरीं ।।
जाणून बुजून दुर्लक्ष केले ।
नैतिकतेच्या कल्पनेला ।।
एकटाच आहे समजूनी ।
स्वार्थी भाव मनी आला ।।
नीच कृत्य जे घडले हातून ।
कुणीतरी बघत होता ।।
सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे ।
हेच सारे सुचवित होता ।।
कोण असावा हा गुप्त साक्षीदार ।
नितिमत्ता शिकवी त्याला ।।
बाह्य जगातील द्रष्टा असूनी ।
अंतर्यामीही बसलेला ।।
त्या साक्षीदाराची जाणीव होता ।
कचरुनी जाते मन सदा ।।
अपप्रवृत्तींना आळा बसूनी ।
सत् कर्मे घडती अनेकदा ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 3, 2016
भाकरीच्या पाठीवर ठसे दिसती हातांचे
जातां तव्यावर भाजूनी निशाण राहते कष्टांचे
एका भाकरीच्या पाठीं हात कितीक गुंतले
कण कण देती ग्वाही मन भरुनी कसे आले
उन्हां पावसात फिरे शेतामधीं शेतकरी
टप् टप् घाम गाळी उभी करितो जवारी
पोती पोती उचलूनी वाहून नेई मजूर
दमछाक होऊनी ही मिळत नाहीं पोटभर
ओवी म्हणत मुखानें आई थापिते भाकरी
साऱ्यांच्या कष्टामध्यें तिच्या मायेची भागीदारी
धरणीच्या पोटातून जीवन रस येई वर
दुजासाठी जगा तुम्ही बघा सांगते भाकर
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 10, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti