(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • देशभक्तीची लाट

    देशभर देशभक्तीची लाट आली वाटतं
    कुणी जवान शहीद तर झाला नाही ना!

    अनोळखीचा बिल्डर नमस्कार करतोय
    येत्या इलेक्शनला उभा राहणार तर नाही ना?

    जास्तच जरा बोलणे गोड वाटले त्याचे
    उधारबिधार नाहीतर काही काम तर नाही ना?

    (कुरकुरतं .... शरीर नाही पेलवत पेग पुढचा
    एकच ब्रँड सारखा बोअर झाला तर नाही ना?)

    मंदिर प्रश्न पुन्हा येत आहेत चर्चेत पेपरात
    निवडणुका इतक्यात येत तर नाही ना?

    पोरगा मोबाईल सोडुन पुस्तकात घुसला
    परीक्षा बिरीक्षा सुरु झाल्यात तर नाही ना?

    ~ कौशल

    -- श्रीकांत पेटकर

      March 1, 2019


  • नैराश्य

    मी निराश झालो आहे ।।

    खाचखळग्यांतून, दगडधोंड्यातून
    पराभवाच्या अपमानातून
    शल्य मनातले मनातच ठेवून
    त्यातून वाट शोधत आहे ॥
    मी निराश झालो आहे ॥ १ ॥

    आत्मविश्वास तो गडबडे
    ताबा अन् मनावरचा उडे
    येथेच अडकून घोडे पडे
    दुःख चावरे त्याचे मला आहे ॥
    मी निराश झालो आहे ॥ २ ॥

    प्रवास माझा पहाटे धवल यशाच्या
    धुक्याचे पटल मध्येच नि हे वारे झोंबरे
    मन माझे थरथरणारे
    ही काजळी पुसू पाहे ॥
    मी निराश झालो आहे ॥ ३ ॥

    -- यतीन सामंत

      October 16, 2022


  • रेशीम नाती

    जगण्याचं गाणं करणारी जगावसं वाटायला लावणारी नाती आपल्याकडे साऱ्या जगाने पाठ फिरवली तरी हक्काचा कोणीतरी आहे असा खोल दिलासा देणारी नाती आई, मुलगी, सासू-सून, नणंद भावजय, बहिणी बहिणी आजी नात, अशीही भावभावनांचे अनेक पदर रचणारी नाती रक्ताच्या नात्यांबरोबरच आयुष्यभर पुरतील अशी ही नाती भेटतात.

      July 17, 2023


  • ज्ञानाग्नि पेटवा

    हातातील काडी घासतां पेटीवरी

    अग्नि त्याच्यातील ज्वाला त्या धरी

    लपलेला अग्नि घर्षणाने पेटतो

    अज्ञान झटकता ज्ञानी उजाळतो

    चितांत असतो प्रभू सदैव शांत

    ओळखण्या त्यासी लागताती संत

    संत हाच गुरु मार्गदर्शक असे

    चित्तातील प्रभूला जागवित असे

    उजळण्या मन घर्षण लागे संताचे

    पेटवा ज्ञानाग्नि सार्थक होई जीवनाचे

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      June 27, 2020


  • काय हाती सरतेशेवटी

    काय हाती सरतेशेवटी,
    जीवन पुढे पुढे जाते,
    करत रहावी पुढची बेगमी,
    पैलाची वाट बोलावते,--!!!

    या तीरावरून त्या तीरी,
    पोहोचणे असते का सोपे,
    ऐलाची हाक सतत कानी,
    मध्ये उगी खेचती भोवरे,--!!!

    ऐहिकाची ओढ राही,
    पाणी ढकलत राहते,
    लौकिकाचा छळ नशिबी,
    तनमन गटांगळ्या खाते,--!!!

    स्वर्गच जणू पैलतीरी,
    नरकातून वाहत जाणे,
    सुख- दु:खांनी श्वास कोंडती, हेलकाव्यांचेच ते जिणें,--!!!

    मरण येत नाही म्हणुनी,
    असेच जगत राहायचे,
    भगवंताचा वास ठिकाणी,
    आता त्या पोहोचायाचे,--!!!

    नको भावनांचे जाळे,
    नको जाणीव संवेदनांची,
    दुरून दत्तगुरुंना पाहणे,
    आंस राहिली फक्त हृदयाची,

    नको नात्यांचे विष पचवणे,
    हलां- हलां त्या द्यावे सोडूनी,
    अजून त्यांना किती रिचवणे,
    ताकद आता सर्व संपली,--!!!

    © हिमगौरी कर्वे.

      October 9, 2019


  • अतृप्त भूक

    चंद्रा तुझे रूप कसे रे, गोंडसवाने छान

    टक लावूनी बघता, हरपूनी जाते भान

    मधूर शुभ्र नभी चंद्र तो, जणू चांदीची थाली

    अगणीत वाट्या विखूरलेल्या, दिसे भोवताली

    टपोर चांदणे वाहूनी जाते, त्या थाली मधूनी

    स्वाद लूटता धुंद होतो, घेता ते झेलूनी

    रिक्त होते एक वाटी ती, भरूनी जाई दुजी

    प्राशन करिता सीमा नसे मग, आनंदा माजी

    अतृप्त सदा मन तरीही, त्या चांदण्यापाई

    आतूरतेने दुजा रात्रीची, सतत वाट पाही

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      December 6, 2017


  • निसर्ग स्वभावाचे दर्शन

    बहूमोल निसर्ग ठेव, निरनिराळे स्वभाव

    उमटविती भाव मनावर आमच्या ||१||

    चांदण्याची शितलता, मनाची प्रफूल्लता

    देहाची आल्हादकता लाभली चंद्राचे ठायी ||२||

    नाजूक सहवास, मधूर मिळे वास,

    कोमलतेचा भास जाणविला फूलांनी ||३||

    रंगाची विविधता, छटाची आकर्षकता,

    मनाची वेधता इंद्रधनुष्य देई || ४||

    पळण्याची चपलता, फिरण्याची चंचलता,

    वेगाची तीव्रता, भासे हरिणाच्या पायी ||५||

    प्रवाहाची संथता, पाण्याची खळखळता,

    स्वभावाची निर्मलता, समजली नदीमुळे ||६||

    शक्तीचे दर्शन, क्रूरता भयान,

    निर्दयतेची जाण, दिसली हिंस्त्र पशूत ||७||

    जीवनाची प्रेमलता, हृदयातील अक्षरता,

    भावनेची कोमलता मातेच्या रुपाने मिळाली ||८||

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 16, 2020


  • हवापाणी

    माणसाचे तेज डोके
    कसे पिकू लागले?
    निसर्गात मिळे फुकट
    तेच विकू लागले!

    हवा होती मुक्तवावर
    बंदिस्त होऊ लागली
    रस्त्यावर , दुकानात
    पैसा कमवू लागली!

    पाणी होते प्रवाही
    बाटलीबंद झाले
    जारबंद संस्कृतीला
    पैसे मोजू लागले!

    माती तर अमापच
    बघा जिथे तिथे मिळे
    विटा पाडून भट्टीवर
    बंगले बांधू लागले!

    हवा, पाणी, मातीची
    अशी चालू लूट आहे
    कुरतडे उंदीर तशी
    विनाशाची वाट आहे!

    -- विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, जि.बीड
    सं.९४२१४४२९९५

      October 23, 2019


  • शिशिर

    आहे मी ऋतू लयाचा
    शहारता शिशिर सांगतो
    हिरव्या ओल्या श्वासांना
    मातीशी जोडून पांगतो...

    सुस्तावल्या रात्रीस
    अस्ताव्यस्त पांघरतो
    आभासी धुक्याचे अस्तर
    दिवसावर अंथरतो...

    स्त्रोत चैतन्याचे सारे
    कवेत घेत..आकसतो
    भुंड्या झाडदिठ्यांना
    बोचऱ्या गारव्यात डसतो

    उत्पत्ती ला आहे इथे
    शाप लयाचा तो कोसतो
    रुक्ष देहीच्या गर्भात
    बीज वसंताचे पोसतो...!!!

    -सौ विदुला जोगळेकर

      January 5, 2024


  • ज्ञान देणारे सर्वच गुरू

    अवतीभोवती सारे तुझ्या
    आहेत गुरू बसलेले
    जाण तयांची येण्यासाठी
    प्रभूसी मी विनविले ।।

    निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी
    काही तरी असे गुण
    आपणासची ज्ञान असावे
    घेण्यास ते समजून ।।

    उघडे ठेवूनी डोळे तुम्ही
    बघाल जेंव्हां शेजारी
    काही ना काही ज्ञान मिळते
    वस्तूच्या त्या गुणापरी ।।

    सारे सजिव निर्जिव वस्तू
    गुरू सारखे वाटावे
    तेच आहेत ईश्वरमय
    तुम्हीच ते समजावे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 22, 2018