November 26, 2021
अश्रद्धेकडून श्रद्धेकडचा प्रवास’… चित्रपटाचं उपशीर्षक एक प्रकारची हमी, सकारात्मकता देऊन जातं …आमच्यासारख्या सर्व सामान्य प्रेक्षकांना ‘and they lived happily ever after’ ची इतकी सवय आहे कि सिनेमा म्हटलं कि पहिल्यांदाच ‘शेवट गोड होतोय ना ‘ या कडे लक्ष लागून राहतं. ..आणि ते , ‘गोदावरी’ हा चित्रपट पूर्ण करतो..
November 20, 2022
बागेतील फुलपाखरा, काय शोधशी फुलाफुलात,
जसा रमे जीव साऱ्यांचा,
लहानग्या मुलां - मुलांत,--!!!
अर्धोन्मीलित त्या कळ्या,
उघडून आपल्या फुलात,
फुलवून सगळ्या पाकळ्या,
तुझ्यासंगे कशा गमतात,--!!!
रेंगाळशी तू कसा,
वाऱ्यावरती गीत गात,
पंख तुझे फडफडवतांना,
रंगांची मोहक बरसात,--!!!
कुठल्या निवडशी फुलां,
काय असते अंतरात,
टिपत असंख्य परागकणां,
काय चाले हितगुजांत,--!!!
दंग होशी ना मित्रा,
कसा विसरशी भान सुगंधात,
चुकून काट्यांचा स्पर्श होतां,
कोण औषध लावे घावांत,--?
थंडगार त्या झुळुका,
अंगाला असतील झोंबत,
नाजूक, कोमल, तरल, मुलायमा, सहशी कसे हे आघात,--!!!
सापडे कसा तुला रस्ता,
कोण दाखवतो वाट,
काय करीशी मार्ग चुकता,
पुन्हा जाण्याची निसर्गात,--!!!
आपल्या सुंदर अंगकांतीला,
युक्ती कोणती स्वच्छ ठेवण्यात, निसर्गाच्या सुंदर लेकरा,
मजा वाटे तुला निरखण्यात,--!!!
© हिमगौरी कर्वे
January 20, 2020
रुजला पाहीजे विचार मनांत
सारेच प्रभुचे असे ह्या जगांत
जो वरी आहे मी माझे येथे असे
त्या क्षणापर्यंत स्वार्थ मनीं वसे
स्वार्थयुक्त मन मुक्त होत नसे
मुक्ती येई पर्यंत पुनर्जन्म असे
बिंबता मनांत माझे नाहीं कांहीं
प्रभूचे समजता आत्मा मुक्त होई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
August 1, 2013
दिंडीत वैष्णवांच्या
धावघावती पाऊले
या लोचनी एकची
परब्रह्म उभे सावळे...
नादात टाळमृदंगाच्या
सारे विठ्ठलनामी रंगले
तनमन विठ्ठल विठ्ठल
सारे वाळवंटी रमलेले...
शुन्यात सत्य ब्रह्मरूप
विटेवरी रुपडे सावळे
राऊळ, गाभारी त्राता
अंत:पुर! उद्धारलेले...
देवा नको रे येणेजाणे
मन तुझ्यात रे तृप्तले
संतत्वात तुझीच साक्ष
ब्रह्मानंदी आत्म दंगलेले...
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र.३०१
२२/११/२०२२
November 29, 2022
आज मन आनंदले,
सुखाच्याही पार गेले,
भंवसागरी तरणे खासे,
आता सोपे वाटले,--!!!
दुनियादारी निभावणे,
असते किती कठीण,
तरीही तावून-सुलाखणे,
सहजी कसे जमले,--!!!
मनमोर थुई थुई नाचे,
पदन्यासाची तऱ्हा वेगळी, डोळ्यातून दोन थेंब सुखाचे समस्यांची असून चलती,--!
खंबीर,धीरगंभीर राहणे,
तटस्थभूमिका निभावावी,
येऊ देत वारे--वादळे,
मात्र एक झुंज द्यावी,--!
तुझ्यापेक्षा मी सरस,
म्हणत त्यांन भिडावे,
संकटांचे सतत घोर,
जिवामुळी लावू न घ्यावे
एक दत्तगुरु पाठीराखे,
राहावे निर्धास्त लेकराने,
गुरुमाऊलीच्या कुशीत सगळे,
आपुले दुःख सांगावे,--!!!
ते असतां मागे,
त्यांची जाणीव ठेवावी,
एक त्यांचे स्मरण,
सारी दुनिया विसरावी,--!!!
आनंदाच्याही डोही बुडावे,
ओलेत्याने राहावे कोरडे,
पाणी जाताना नाकी तोंडी,
दत्तगुरूंनीच फक्त वाचवावे,--!!
हिमगौरी कर्वे.©
April 5, 2019
प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा ।
ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा ।।
चमत्कार दिसून आला एके दिवशी ।
राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी ।।
विज्ञानाने उकल केली या घटनेची ।
खात्री करिता सत्यता पटली याची ।।
चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे ।
त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे ।।
शब्दांचे वलय फिरती देहाभोवती ।
शरीरासाठी तेच शब्द कवच बनती ।।
जेव्हां होते नामस्मरण प्रभूंचे सतत ।
शब्द ध्वनी लहरी निघत असे अविरत ।।
हुंकार तसाची ऐकू येई देहां जवळी ।
निद्रेमध्ये जरी असला मेंदू त्या वेळी ।।
सदैव नामस्मरण चेतना देत राहतो ।
रामतिर्थांच्या अनुभवांनी हेच अनुभवतो ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 23, 2017
दाखवितोस हूबेहूब रुप आरशामध्ये मला
मीच माझे रुप बघूनी चमत्कार वाटला
सत्य स्थितीचे द्दष्य करुनी दाखविलेस सर्वाला
उणें अधिक न करितां तसाच दिसे आम्हाला
गुणदोष बघूनी देहाचे मुल्य मापन करितो आम्हीं
चांगले राहण्या शिकवी हीच युक्ती नामी
कांचेच्या आरशापरीं असे मनाचा अरसा
आत्म्याची मलीनता दाखवुनी चांगला बनवी माणसा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 18, 2021
एक परिघ आंखले , विधात्याने विश्वाभोवतीं,
जीवन फिरते , त्याचे वरती ।।१।।
वाहण्याची क्रिया चाले, युगानुयुगें ह्या जगतीं,
कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा, एकांच परिघात फिरती ।।२।।
जेंव्हां कुणीतरी थकून जाई दुजा उठोनी मदत करी,
जीवन मरणाची शर्यत जिंकण्यासाठीं लक्ष्य धरी ।।३।।
मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी नियंत्रित करी जगाला,
परिघ सोडूनी जाण्यासाठीं दिसत नसे मार्ग कुणाला ।।४।।
प्रयत्न तुमचा सदा असावा मध्यबिंदूकडे सरकण्याचा,
शक्तीरुप तेथेंच असूनी त्याच्यांत सामावून जाण्याचा ।।५।।
भीती मनीं वसते कसे जाऊं आंसाकडे,
तुकडे होतील देहाचे जेव्हां आसांत पडे ।।६।।
सोडूनी देण्या सारा खेळ केंद्रस्थानी जाणे, मार्ग असे,
विसरुन जाता देहाला प्रभू समर्पण करण्यांत असे ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 28, 2017
प्रकाश आणि अध:कार , दोन बाजू नाण्याच्या
सत्व आणि तमोगुणातील शक्ती, ठरती त्या प्रभूच्या....१
सृष्टी दिसे समोर आपल्या, नयन ठेवूनी उघडे
अध:कार वाटे आम्हां, त्याच मिटलेल्या डोळ्याकडे...२
जाण देई आंतून कुणी, प्रकाश तमाच्या आस्तित्वाची
आगळ्या नसूनी स्थिती दोन्हीं, कल्पना ती केवळ विचारांची...३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 23, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti