(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ईश्वराची बँक

    प्रभूंनी बँक काढली उघडा खाते

    ठेवा पूंजी आपली आणा सुख जीवनाते ।।१।।

    जेवढे गुंतवाल मिळेल व्याजा सहित

    दरा विषयीं तो आहे अगणित ।।२।।

    ही बँकच न्यारी तुम्हां न दिसेल कोठे

    धुंडाळूं नका संसारी होईल दुःख मोठे ।।३।।

    पाप पुण्याची ठेव जमा करिते बँक

    जसा असेल भाव तशी देईल सुख दुःख ।।४।।

    गरज पडतां धन मिळणे हे आपल्याच हातीं

    परि कामीं येणें पुण्य हें प्रभूचे इच्छांती ।।५।।

    जमता पुण्याच्या राशी चांगली कर्मे करुनी

    नाते जडतां ईश्वरासी जाल तुम्हीं उद्धरुनी ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      July 4, 2017


  • जागतिक दहशतवादविरोधी दिन

    सामाजिक असंतुलन हे दहशतवादाचे मुळ आहे. सत्तेची हाव, अधिकार नाकारणे, स्वत:च्या फायद्यासाठी दुसज्याला ओलीस ठेवणे, धर्मसत्ता लादणे, जाती भिन्नता, धर्मभेद तसेच समाजातील भिन्न संस्कृतीचे लोक एकमेकांबरोबर आणि एकाच राजकीय छत्राखाली व एकाच न्यायव्यवस्थेखाली राहायला नाखुश असतात. बरेचदा राज्यकर्ते एखाद्या भागाकडे दुर्लक्ष करतात व त्या भागाची प्रगती खुंटते त्यामुळे एकाच देशात आर्थिक भेदभाव निर्माण होतात आणि त्यातून आतंकवादाचा जन्म होतो.

      May 21, 2022


  • पक्षी – मुलातले प्रेम

    स्वैर मनानें भरारी घेई, पक्षी दिसला आकाशीं ।

    स्वछंदामध्यें विसरला , काय चालते पृथ्वीशीं ।१।

    एक शिकारी नेम धरूनी, वेध घेई पक्षाचा ।

    छेदूनी त्याचा एक पंख, मार्ग रोखी उडण्याचा ।२।

    जायबंदी होवूनी पडला, जमीनीवरी ।

    त्वरीत उचलून पक्षाचे, पाय बांधे शिकारी ।३।

    ओढ लागली त्यास घराची, भेटन्या मुलाला ।

    आजारी असूनी पुत्र त्याचा, चिडचिडा तो झाला ।४।

    चकित झाला बघूनी मुलाला, अंगणी खेळतांना ।

    बघत होता रोज त्याला रडत असतांना ।५।

    झाडा वरती दोन पक्षी, नाचुन गात होते ।

    मुलास त्याच्या आनंद देवूनी, रिझवीत होते ।६।

    गहींवरूनी गेला दृष्य बघूनी, पक्षी- मुलातले प्रेम ।

    सोडून दिला हातातला पक्षी, लावून त्यास मलम ।७।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 17, 2016


  • प्रेम – एक आठवणींची कविता पुढे चालू..

    प्रेमःएक आठवणींची कवीता चा पुढचा भाग क्रमशः

      June 3, 2011


  • सैनिक आम्ही

    सैनिक आम्ही देशाचे
    टिळा कपाळी मातीचा
    जिंकविण्या भारतास
    त्याग करी जगण्याचा

    एक नारा आम्हा प्यारा
    'जय हिंद' घोष गगनात
    पुढे चला रे पुढे चला
    रक्षण्या देश हा भारत

    एकच ठावे विजयी व्हावे
    उरी दाटले निशान तिरंगा
    पहाडी छाती अभिमानाने
    सीमा लढवू पार अभंगा

    -- विठ्ठल जाधव
    शिरूरकासार (बीड)
    सं.९४२१४४२९९५

      October 22, 2019


  • ऋणानुबंध

    ठाऊक नव्हते कालपावतो
    नांव तुझे आणि गांवही
    क्षणांत जुळले अचानक परि
    नाते आपुले जीवनप्रवाही

    उकल करितो जेंव्हां ह्याची
    ओळख पटते माझ्या मनां
    तेच रुप अन तीच मूर्ती
    पूर्व जन्मीच्या खाणाखुणा

    असेल हे जर ऋणानुबंद
    आणेल एका छायेखालीं
    साथ देऊन अनुभऊ
    सुख दुःखे ही जीवनातली

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 8, 2017


  • बागेतील्या तारका

    बागेमधला निसर्ग सारा टिपत होतो मी

    रात्र पडूनी चंद्र आकाशी बाग झाली रिकामी १

    बाकावरती बसून एकटा मोजत होतो तारे

    लुकलुकणारा प्रकाश तो अंक चुकवी सारे २

    अगणित बघुनी संख्यावरी प्रसन्न झाले मन

    किती वेळ तो निघूनी गेला राहिले नाहीं भान ३

    शितलेतेच्या वातावरणीं शांत झोप लागली

    नयन उघडतां बघितले मी पहांट ती झाली ४

    गेल्या निघूनी सर्व तारका आकाशाला सोडूनी

    शोधूं लागले नयन माझे त्यांना सर्व दिशांनी ५

    चकित झालो फुले बघुनि मी सुंदर फुललेली

    सुचवित होती मिष्कीलपणें का तारकांच खाली ? ६

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      September 12, 2016


  • कबूल

    कबूल, आम्हीच त्यांना निवडून दिलेले!
    कबूल, आम्हीच त्याबद्दलच भोगलेले!

    -- श्रीकांत पेटकर
    कौशल

      March 25, 2019


  • जीवन सांगता

    झाकोळलेले आभाळ, गतस्मृतींचेच कृष्णमेघ

      July 2, 2021


  • माझी जन्मपत्रिका

    माझ्या बाबांच्या शुक्राणूतून
    आलेली २३ गुणसूत्रं
    माझ्या आअीच्या पक्व बीजांडातून
    आलेली २३ गुणसूत्रं
    मिळून झाला ४६ गुणसूत्रांचा
    माझ्या गर्भपिंडाचा आराखडा …

    त्यानंच ठरविलं माझं
    रूपमत्व, व्यक्तीमत्व आणि बुध्दीमत्व
    त्यानंच ठरविला माझा जीवनप्रवास
    त्यानंच ठरविलं माझं जन्मनक्षत्र
    नाडी, गण, योनी आणि जन्मरास

    या गुणसूत्रांत …
    नाही शनी, नाही मंगळ,
    नाही राहू नाही केतू
    कुणी नाही वक्री ...
    कुणाची नाही दृष्टी वाकडी,
    नाही साडेसाती,
    नाही ग्रहांची पीडा किंवा कृपा
    कशासाठी जाअू ज्योतिषीकडे?
    निसर्गानंच लिहीली ...
    माझी …… जन्मपत्रिका ...

    -- गजानन वामनाचार्य, मुंबअी

      September 17, 2016