(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कुंद कळ्यात प्रीत बहरुन आहे

    कुंद कळ्यात प्रीत बहरुन आहे
    धुंद फुलांत गंध मोहरुन आहे
    मोहक स्पर्शात भाव मुग्ध आहे
    केतकीच्या बनात मोर नाचरा आहे
    आरक्त लोचनात आठवण भरुन आहे
    गंधित स्पर्शात तन बेधुंद हलकेच आहे
    अलगद अंतरात गुज अलवार आहे
    स्वर अबोल सारे लय गुफूंन आहे
    स्वातीचे शब्द रसिकांच्या मनात आहे
    स्वातीचे सर मोती रसिकांच्या हृदयात बंदिस्त आहे
    -- स्वाती ठोंबरे.

      November 8, 2021


  • सुंदर विचारांची जोपासना हीच खरी ईश्वर सेवा

    देव शोधू नकोस दूर, आकाशात वा पाषाणात,
    तो तर उगवतो हळूच, तुझ्या प्रत्येक विचारात.
    जिथे हेतू शुद्ध असतो, निःस्वार्थी प्रत्येक श्वास,
    तिथेच घडते उपासना, तिथेच ईश्वराचा वास.

    सुंदर विचार म्हणजे मौनातील प्रार्थना,
    न बोलता केलेली, पण काळजात कोरलेली भावना.
    स्वतःला हरवून जेव्हा तू दुसऱ्यासाठी उभा राहतोस,
    तेव्हाच देव तुझ्या रूपात जगाला भेटतो.

    अहंकार वितळतो जेव्हा सत्याच्या प्रकाशात,
    तेव्हा अंतरात्मा न्हाऊन निघतो निर्मळ विश्वासात.
    ना घंटानाद, ना मंत्र, ना धूप-दीपांची साथ,
    एक शुद्ध विचार पुरे, देव ठेवतो हातात हात.

    जोपासना म्हणजे लढा, स्वतःतील अंधाराशी,
    प्रकाश जन्माला घालणं प्रत्येक चांगल्या इच्छेशी.
    जिथे विचार पवित्र, तिथे जीवन पावन सेवा,
    कारण सुंदर विचारांची जोपासना, हीच खरी ईश्वर सेवा.

    * कीर्तिराज आगलावे

      July 13, 2026


  • अंतर्मनातील आवाज

    ध्यान लागतां डुबूनी जाई अंतर्यामीं
    बाह्य जगाला त्याच क्षणीं विसरतो मी ।।१।।

    चित्त सारे केंद्रित होई आत्म्याकडे
    दुर्लक्ष्य होऊनी देहाचा विसर पडे ।।२।।

    संवाद होता आत्म्याशी
    विचारा सारे आतून कांहीं ।।३।।

    आंतल्या आवाजांत सत्याचा भाव
    भविष्यातील घटणाचा त्यासी ठाव ।।४।।

    नियमीत ध्यान साधना करती
    इतर जीवांचे प्रश्न समजती ।।५।।

    ऋषीमुनींना ध्यान शक्ती अवगत
    राजाश्रय मिळूनी राज गुरु ठरत ।।६।।

    प्रश्न सोडवी ध्यान शक्तीने
    आत्म्याची मदत घेई युक्तीने ।।७।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      November 8, 2015


  • आजी

      June 7, 2011


  • लोकल

    (चाल : झुक झुक झुक रेल गाडी)

    आली नशिबी रेलगाडी
    रेल कसली जेल गाडी - झुक झुक ...
    दादर हारबर सी.टी. लोकल
    हिशेब येथे असतो पळपळ
    कुणी गुदमरे कुणी लटकते
    कुणी मारते उडी । - झुक झुक ...

    कमला, विमला, अमला आली
    कुणी नवोढा कुणी अवघडली
    वृद्ध कोणी, षोडश वर्षा
    कुणी चंचल गुड्डी । - झुक झुक ...

    गर्दी येथे गचडी तेते
    चोर शिपाई साव भामटे
    किती दुकाने किति वाहने
    जणू मुंग्यांच्या झुंडी । - झुक झुक ...

    कचेरीतही तर्‍हा वेगळी
    कुणी नेकींच्या कुणी फेकीची
    नियमित विराळा बहुतेकांची दांडी । - झुक झुक ...

      October 27, 2018


  • मृत्युंजय

    अज्ञात दिवा मी मिणमिणणारा
    संकटाचे येऊ देत वादळी वारे
    वावटळही ती येऊ दे
    आणि अंगावर येऊ देत सारे
    पण मी विझणार नाही
    मी जागृत रहाणार आहे

    पेटूनऽ....
    पेटून, पेटवून मी प्रज्वलित होणार आहे
    जरी मला ज्ञात आहे
    गेल्यावर मी, फक्त....
    दप्तरी नोंद होणार आहे
    विस्मृती मला घेरणार आहे
    पण कर्तव्य माझे मी पार पाडणार आहे
    जन्म-जीवन माझे मरण्यासाठी
    मरण माझे माझ्या देशासाठी
    खेचून विजयश्री मी आणणार आहे
    रणधुमाळीतच मी विसावणार आहे

    नसेन मी....
    नसेन मी भव्य स्मारकावर
    जागृत जनस्मृतीवर
    फळ्या-फलकांवर
    इतिहासाच्या अन्
    भव्य - सोनेरी पानांवर

    बलिदानातच मला
    मान माझा गवसणार आहे

    धडाडणाऱ्या तोफांना मी धडकणार आहे
    मातीसाठी माझ्याच, मी मरणार आहे
    या मातीची, या देशाची आणि विजयाची
    इमारत जेव्हा उभी रहाणार आहे
    लक्षात ठेवा.
    पाया तिचा तो मीच असणार आहे
    तो पाया मीच, मजबूतीही मीच
    आणि पहा
    पसरलेला तो... गडद लाल रंग
    शाईचा-इतिहासाच्या पानापानातील
    त्यातही तर मीच असणार आहे
    मातेच्या विजयाचा कणन्-कण
    मीच तर तो असणार आहे

    नाही...
    नाही मी विसरला जाणार....
    मी मरणार नाही
    मी अमर होणार आहे
    देशभक्तीचे प्रिय अमृत प्राशून
    मी मृत्युंजय होणार आहे

    -- यतीन सामंत

      October 18, 2022


  • नवरा-बायको

    नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी कविता काल वाचनात आली.

      February 1, 2017


  • प्राण ज्योत

    दिवा होता छोटासा, एक मजकडे ।
    इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे ।।

    तळांत होती योजना, तेल सांठवण्याची ।
    शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची ।।

    छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन ।
    मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी ।।

    देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे ।
    प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे ।।

    केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं ।
    व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती ।।

    ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं ।
    तीच उर्जा प्राणास मिळतां, चेतवी ज्योत ईश्वरी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 18, 2017


  • कृपा भगवंती

    मीच स्वतःला ओळखुन आहे
    मी केवळ एक माणूस आहे

    भौतिक सुखे सारीच लाभली
    आत्मिक! सुखदा सत्य आहे

    न आता मनी दुश्वास कुणाचा
    आता स्पंदनी या तुप्तता आहे

    नेत्री, आठव सारे दवबिंदू परी
    अंतरी संवेदनांची जागृती आहे

    ना आता सुखदुःखांची गणती
    भोगप्रारब्ध, सारे भोगले आहे

    हवे कशाला, कुठलेच हेवेदावे
    हरिनामी आता मोक्षमुक्ती आहे

    जे जगले, ती कृपा भगवंताची
    त्याच ऋणात सदैव रहाणे आहे

    -- वि. ग. सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २५.

    २५ - १ - २०२२.

      February 3, 2022


  • चार तळाची माडी

    माडी आमची चार तळाची,

    डगमगते ती वाऱ्यानी.

    पहिला तळ घराघराचा

    रोज कष्टाच्या कामाचा,

    वारा येतो इथे पहिला,

    झळा घेऊन जाळायला.

    कष्टकऱ्यांना जाळायला.

    .....

    चार तळ्याची माडी आमची

    डगमगते ती वाऱ्यानी.

    .......

    दुसरी माडी सेवेची ,

    आमच्या सेवेकरी पाहुण्याची.

    वारा येता पहिले जाऊ ,

    वाऱ्यावरी पहिले आम्ही.

    .....

    चार तळाची माडी आमची,

    डगमगते ती वाऱ्यानी

    ........

    तिसरा तळ रक्षेचा,

    खाऊ पहिल्या दुसऱ्याला,

    तुकड्यासाठी पैशाच्या,

    चौथ्याचे पाय चाटू ,

    .....

    चार तळाची माडी आमची

    डगमगते ती वाऱ्यानी,

    ........

    चौथा तळ राजाचा ,

    गार वाऱ्याच्या झोताचा,

    पहिला दुसरा ठेचून टाकू,

    तिसऱ्याला पाळत ठेऊ ,,,

    चार तळाची माडी आमची,

    डगमगते ती वाऱ्यानी....

    .....

    चार तळाची झाली बारी,

    पाचवा तळ आधी गाडला ,

    मग चौथा उभा ठेवला..

    चार तळाची माडी आमची,

    डगमगते ती वाऱ्यानी

    जाळूनी रोज तीन तळ ,

    चौथा तो वारा घेतो...

    तरी आपण म्हणतो

    चार तळाची माडी आमची

    डगमगते ती वाऱ्यानी

      May 15, 2026