वेलींना तो आधार होता, वृक्ष वाटला दणकट परि
बुंधा ज्याचा किडूनी गेला, कोसळणार मग कधीतरी
नष्ट करिल तो तरूवेलींना, धरणीवरती आडवा होता
सौंदर्य दिले लताफूलांनी, सारे कांहीं विसरूनी जाता
वेलींनो आणि झुडपानों, सोडूनी घ्या तो आधार पोकळ
स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या , स्वावलंबनाचे टाका पाऊल
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 20, 2018
सुखात येऊ दे स्मरण,
दुःखी विचरता, काही पळें, संकटातून मज सोडवत,
तुझा हात नित्य मिळे,,---
पाठबळ असता अविरत, कशासाठी आम्ही घाबरावे,
प्रार्थित, पूजित तुला सदैव,
त्राता म्हणुनी भाकावे,--!!!
तूच बंधू ,तूच सखा,
तूच रक्षक आमुचा,
विधाता म्हणत म्हणत,
दावा करते मी साचा,--!!!
हे गुरु, हे माय बापां,
लौकिक या सुखदुःखात,
दूर करशी अशा व्यापातापा,--
आमुचा तसा तू पाठीराखा--!!!
पाप-पुण्याचे हिशोब,
कर्म शेवट फळ देते,
जसे ज्याचे असते कर्म,
तशी मनुष्यजात भोगते,--!!!
सद्भावना, आचार-विचार, माणुसकीही कृतिशील होते, अहिंसेच्या पडद्याआड,
शाब्दिक हिंसा सारखी घडते,--!!!
वास्तू देते आशीर्वाद,
तथास्तू सारखी म्हणते,
आई बापात पहावा ईश्वर,
ती तशीच साक्ष देते,--!!!
कलहांमाजि ठेवले काय, कोणासही ना कळते,
विधात्याचे विधीलिखित,
मग कामास लागते,--!!!
सत्ता, स्वार्थ, पैसा, अहम,
जगण्याची झाली सूत्रे,
काय आहे तुमच्या हातात ,
कळून येईल क्षणमात्रे ,---!!!
पाऊस, ओला दुष्काळ, पूर, परमेश्वराची किती साधने,
जागा नाही होत माणूस,
जाणत आपुली दुष्कर्मे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
December 30, 2019
उत्साहाने आला होता, मुंबई बघण्याकरिता
रम्य स्थळांना भेट देणे, ही योजना मनी आखता
मान्य नव्हती त्याची योजना, नियतीच्या चाकोरीला
पाकीट पळवूनी त्याचे, घाला कुणीतरी घातला,
धन जाता हाता मधले, योजना ती बारगळली
अवचित त्या घटनेने, निराशा तेथे पसरली,
जात असता सरळ मार्गी, दुष्टपणाला बळी गेला
समाजाला धडा शिकवण्या, सूडाने तो पेटून गेला,
वाम मार्गी जावून त्याने, तेच धन पुन्हा कमविले
सूड घेतला असून देखील, समाधान ते नाही लाभले
दुष्ट वृत्तीची वलये ती, फिरत असती सभोवती
सूड अहंकार लोभही, त्यानाच गतीमान करती
एका वरचा राग तुम्ही, फैलविता सहजपणे
तोडून टाका ही वलये, प्रेम दया या भावनेनें
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 23, 2019
निसर्ग नियमें दया प्रभूची, सदैव बरसत असते ।
दयेचा तो सागर असता, कमतरता ही पडत नसते ।।
अज्ञानी ठरतो आम्हींच सारे, झेलून घेण्या तीच दया ।
लक्ष्य आमचे विचलित होते, बघून भोवती फसवी माया ।।
उपडे धरता पात्र अंगणीं, कसे जमवाल वर्षा जल ।
प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी, निघून जाईल वेळ ।।
भरेल भांडे काठोकाठ , केवळ धरता योग्य दिशेने ।
टिपून घ्या तुम्ही दया प्रभूची, अशीच केवळ शुद्ध मनानें ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 20, 2017
दुःख असे मानव निर्मित
जाणती हे सगळे
परि दुःखात शोक करिती
हे कुणा न कळे
आपण कर्म केलेले
आपणचि भोगतो
फळ कर्माचे आलेले
तेच आपण चाखतो
आहे तुजसी हे ज्ञान
माहीत सर्वाना
खंत द्यावी सोडून
नको दाखवूं भावना
इतरांसाठीं आहे
ती भावना उदरीं
सहानुभूती पाहे
इतर जनांचे पदरी
शोक भावना दाखवी
तुझ्या दुःखाची
नसतां तुज निर्दयी ठरवी
हीच भीति जनाची
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 20, 2016
सैनिक आम्ही या सृष्टीचे रक्षण करण्या आलो…
July 12, 2026
आई हा शब्द असतो थोर
जो सर्वांच्या ओठावरील असतो मोर
आई या शब्दाला नसतो दुजाभाव
तो सर्वांच्या मनाचा घेई ठाव
वाऱ्याचा वेग जसा अंगाला शहारतो
तसाच आईचा स्पर्श मनाला भावतो
आईचे प्रेम करते मनाला पल्लवीत
ते दृष्टीस पडता मन होते हर्षीत
काही करण्याची हिम्मत आईमुळे मिळते
म्हणूनच तर ती आत्माला ऑ
आणि इश्वरातलाइ असते
- भाग्यश्री सतीश प्रधान
अलिबाग
May 13, 2024
केंव्हातरी शब्द संवाद होतो
पडतात, बोल तेव्हडे कानी
केवळ खुशाली मात्र कळते
अव्यक्त मनीचे ओठी थबकते
हेच आता अंगवळणी पडले
सुख! जणू चाटण मधासारखे
अवीट तो आनंद देऊनी जाते
अव्यक्त मनीचे ओठी थबकते
बोलती निरपेक्ष अधीर लोचने
अंतरी झरझरते निष्पाप प्रीती
मनभावनांचे विशुद्ध गंगाजल
ओंजळीत अर्ध्य म्हणुनी येते
मौनात! अंतरीच्या प्रीतभावनां
सोज्वळ सात्विकतेच्या बंधनात
जन्म सारा, निस्वार्थी समर्पणात
तरी प्रीतभावनां अंतरी ओघळते
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. २०.
२० - १ - २०२२.
February 1, 2022
माझ्यातला चांगुलपणा
मी पुन्हा जागवला
प्रेमभाव अंतरीचा
पुन्हा मी जोपासला
मनातली वैरभावना ती
कशी कावरी-बावरी झाली
प्रेमाच्या सानिध्यात
फार काळ नाही टिकली
खूनशी वृत्ती ती
मन पोखरत राहीली
चांगुलपणाला घाबरून
प्रेमाला शरण आली
तिरस्काराचे ते पेटते बाण
होते जरी सुटलेले
आपुलकीच्या ओलाव्याने
आपसुकच ते विझलेले
रोषानेही मग आपला
रस्ता तेंव्हा बदलला
द्वेषालाही अस्तित्वाचा
जणु उबग आला
स्वार्थाला स्वतःचीच
लाज वाटू लागली
मानवतेची ओळख मनाला
नव्याने पटू लागली
अहंकारानेही आपली
मान खाली घातली
सुंदरता माझ्या मनाची
तेव्हा मला दिसली
तुटलेले दूखावलेले
जवळ आले ते सारे
जिवन जगण्याचे सूत्र
सापडले मला ते खरे.
- डॉ. सुभाष कटकदौंड
July 31, 2018
दुःख असे मानव निर्मित
जाणती हे सगळे
परि दुःखात शोक करिती
हे कुणा न कळे ।।१।।
आपण कर्म केलेले
आपणचि भोगतो
फळ कर्माचे आलेले
तेच आपण चाखतो ।।२।।
आहे तुजसी हे ज्ञान
माहीत सर्वाना
खंत द्यावी सोडून
नको दाखवूं भावना ।।३।।
इतरांसाठीं आहे
ती भावना उदरीं
सहानुभूती पाहे
इतर जनांचे पदरी ।।४।।
शोक भावना दाखवी
तुझ्या दुःखाची
नसतां तुज निर्दयी ठरवी
हीच भीति जनाची ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
October 6, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti