तुझी अबोलताही
बोलून जाते बरेच काही
तुला उगाच वाटते
मला काही कळत नाही
मी तुला कधी
तसा कळलोच नाही
तुला विसरून
मी कधी जगलोच नाही
तुझ्यापासून तसा दूर
मी कधीच गेलो नाही
माझ्या हृद्यातील तुझी जागा
कधी रिकामी झालीच नाही
आता बोलली नाहीस तू
तर जमणार नाही
तुझ्या माझ्या मिलनाची आशा
मग उरणारच नाही
©निलेश बामणे
May 31, 2017
एखाद्या प्रॉडक्टला संपवायचं असेल तर त्याच्या पेक्षा भारी प्रॉडक्ट बनवून संपवता येतं, बहिष्काराने नाही.
October 21, 2016
अपूर्व आहे आज सोहळा
चहूंदिशांनी झाले गोळा
बालवृद्ध, स्त्रीपुरुष, ऋषिमुनी, नृपती, विद्वज्जन ।। ६
मंत्रमुग्ध जनसिंधूपुढती
गिरा अमृतासम रसवंती
प्रत्ययकारी शब्दौघातुन घाली संमोहन ।। ७
नऊ रसांचा सुचारु वापर
चित्र उमटतें मन:पटावर
वीर, करुण, शृंगार, रौद्र, शतरंगांचें मीलन ।। ८
नातीगोती, राग, लोभ, भय,
मोद, क्लेश, छल, पीडा, अनुनय,
निषेध, कौतुक, निसर्ग-मोहक, यथातथ्य चित्रण ।। ९
काव्यसुधेचें करुनी पान
श्रोतेगण विसरत निजभान
जन्ममृत्युसंवेदन भीती नकळत ओलांडुन ।। १०
लुब्ध, स्तब्ध, थांबत खग, प्राणी
तरूलता डोलती रंगुनी
निर्झर, सरिता, जलौघ करती रामनामगायन ।। ११
वातावरणीं घुमतो नाद
सृष्टीतुन उठती पडसाद
कणाकणातुन क्षणाक्षणाला घडे रामदर्शन ।। १२
अखिल चराचर मोदें न्हालें
सप्तलोक राघवमय झाले
भरुन ओंजळी फुलें उधळती स्वर्गातुन सुरगण ।। १३
-- सुभाष स. नाईक
April 21, 2021
देवाचिया दारीं, मनाचा मुजरा,
झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।
जाई जेव्हां मंदिरी,
घेतां प्रभू दर्शन,
आनंदानें नाचते,
हर्षित चंचल मन,
नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।१।।
नदीनाले धबधबा,
उंच उंच वृक्ष वेली,
कोकीळ गाती, मोर नाचे,
इंद्रधनुष्याच्या खाली,
रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।२।।
दु:खी – कष्टी दुबळा,
दीनवाणा दिसे,
प्रभूच्याच आज्ञेने,
भोग भोगीत असे,
जातां हृदय भरूनी, करि आसवांचा मारा,
देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 28, 2021
December 15, 2021
November 26, 2021
वाढता हवेत हा गारवा
बाजारी चिंच,बोरे,आवळा
ऊस नी हिरवा हरबरा
खाण्या हा जीव होई बावळा
सांजवात होताच शेकोटी
पेटवू उब मिळविण्यास
फड रंगे गप्पांचा भोवती
चहा रिचवावा हाच ध्यास
पहाटे चला जाऊ शेतात
भरित मेजवानी जोमात
जोडीला हुरडा असावाच
हवेत हा गारवा झोकात
-- सौ. माणिक (रुबी)
December 5, 2019
कष्ट करुनी घाम गाळीतो,
शेतामध्यें शेतकरी,
समाधानाने मिळते तेंव्हा,
त्यास एक भाकरी ।।१।।
त्याच भाकरीसाठी धडपडे,
नोकर चाकर,
कष्टामधूनच जीवन होते,
तसेच साकार ।।२।।
कष्ट पडती साऱ्यांना,
करण्या जीवन यशदायी,
विद्यार्थी वा शिक्षक असो,
अथवा आमची आई ।।३।।
अभ्यासातील एकाग्रता,
यास लागते कष्ट महान,
त्या कष्टाचे मोल मिळूनी,
यशस्वी होईल जीवन ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 15, 2013
ठसका लागून प्राण जातो, घशांत अडकून काही तरी ।
क्षणांत सारा खेळ आटपतो, धडपड केली किती जरी ।।
हृदय जेव्हा बंद पडते, उसंत न मिळे एक क्षणाची ।
केवळ तुम्हीं चालत असतां, यात्रा संपते जीवनाची ।।
कांचेचे भांडे निसटता, तुकडे त्याचे होऊन जाती ।
देहाचा काय भरवसा, जेव्हां सांपडे अपघाती ।।
वाढ करण्या शरीराची, पडत असती बहूत कष्ट ।
क्षणभंगूर देह असूनी, केव्हांही होऊन जाईल नष्ट ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 14, 2020
मदमस्त तारुण्य बहर,
पाहून कसा मी,
जागच्या जागी थिजलो,
दया कर जराशी,
तुला पाहुनी अचानक,
बर्फासारखा विरघळलो,--!!!
सुवर्णचंपकी कांती तुझी, चाफेकळीगत नाक,
भिरभिरणारे टपोरे नेत्र,
अन लाल कपोती गाल, --!!!
भुरभुरणारे केस उडती,
कसे वाऱ्यावरती,
जसा सुगंधच होतो,
येणाऱ्या झुळकेवर स्वार,--!!!
धडधडणारे उरोज पाहून,
पुरता मी ढांसळलो,
लटपट चालीने त्या,
एकदम गांगरुन गेलो,--!!!
शब्द "मंजुळ" किती,
जशी "सुरीली" तान,
भान हरपून ऐकत राहिलो,
तुझे "यौवनी" गान,--!!!
मादक"" चाल तुझी ती,
जशी नागीण "सळसळणारी",
पृथ्वीवरती अवतरली का,
कुणी अस्मानी परी,--!!!
तुझे लडिवाळ चाळे ,
पाहून धकधक जिवांत होते,
येते कुणी पाहुनी तुला,
काळीज काढून ठेवते,--!!!
डौलदार ती यष्टी,
गोरी-- पान काया,
भलेभले जन तरसून उठती,
तुझ्यासमोरी जाया,--!!!
नयनबांण"" फेकता कसे,
गारद मी झालो,
तृषार्त चकोर बनुनी,
कशी वाट पाहत राहिलो,--!!!
हिमगौरी कर्वे.©
February 4, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti