मातृभूचा मी सेवक,
देशसेवा करत रक्षक,
सीमेवरचा मी जवान ,
तिच्यासाठी देतो पंचप्राण,--!!!
मातृभूचा मी सेवक,
एक सामान्यच शिक्षक,
घडवेन उत्तम नागरिक,
निष्ठेने पिढ्या जोपासेन,--!!!
मातृभूचा मी सेवक,
अभियंता म्हणून काम,
जीव ओतून घडवेन,
पुरते जाणून तंत्रज्ञान, --!!!
मातृभूचा मी सेवक,
धन्वंतरी असे नाव,
लेकरांना सांभाळेन,
मार्गदर्शन आरोग्यवर्धक,--!!!
मातृभूचा मी सेवक,
शेत पिकवणारा काटक,
लेकरांना पुरवेन अन्न ,
जाणून आपले कर्तव्यकर्म,--!!! मातृभूचा मी सेवक,
मला म्हणतात मजूर,
मी एक तिचा श्रमिक,
श्रमांवर वैभव उभारेन,--!!!
मातृभूचा मी सेवक,
आहे एक संशोधक,
विज्ञानाची सेवा करत,
नाव तिचे मोठे करेन, --!!!
मातृभूचा मी सेवक,
मला म्हणतात व्यावसायिक,
पाहेन तिची भरभराट,
पोचेन जगाच्या नकाशावर,--!!!
मातृभूचा मी सेवक,
एक विमानचालक,
तिच्यासाठी आभाळा भिडेंन
नाव तिचे दूर दूर पोहोचवेन,--!!!
मातृभूचा मी सेवक,
आहे एक साहित्यिक,
लेखण्यांच्या माध्यमातून,
तिचा लौकिक वाढवेन,--!!!
मातृभूचा मी सेवक,
आहे मी कलाकार ,
आपली कला करून जिवंत,
तिच्या चरणी अर्पेन,--!!!
मी मातृभूची सेविका,
स्त्री असो अथवा बालिका,
तिच्या कुशीतून वर येऊन आभाळाचा ठांव घेईन-!
मातृभूचा मी सेवक,
आहे प्रगाढ पंडित,
धर्म संस्कृती जोपासत,
करेन त्यांचे संरक्षण,---!!!!
हिमगौरी कर्वे©
February 5, 2019
गुलाबी निशा आज
मंद धुंद गारवा...
ताऱ्यांना चढला साज
सांज गाते मारवा..
रातराणीचा सुगंध
असा दरवळला दूर..
रूप चंद्रमेचे शुभ्र
लाजून झाले चूर..
प्रीत गंधीत वारा
बटांना छेडीत जातो..
धवल मेघांचां पदर
तोरणे बांधून राहतो..
कलेकलेने न्हाले
मनविभोर चांदणे..
रूणुझुणू झंकारली
ह्रदयी प्रीत पैंजणे
July 25, 2026
येतात तुझे आठव, गगनात काळे ढग,
उरांत फक्त पाझर,
शिवाय नुसते रौरव,--||१||
येतात तुझे आठव,
सयींची होते बरसात,
चित्तात उठे तूफांन,
मनात चालते तांडव,--||२||
येतात तुझे आठव,
प्रीतीचे हे संजीवन,
स्मृतींचे मोठे आवर्तन,
त्यांचे लागती न थांग,--||३||
येतात तुझे आठव,
सरींची त्या उधळण,
शब्दांचे पोकळ वाद,
कल्पनांचे नुसते डांव,--||४||
येतात तुझे आठव,
अश्रू असूनही शुष्क,
मन मात्र पांणथळ,
कसानुसा होई जीव,--||५||
येतात तुझे आठव,
भोवती दुःखाची पाचर,
सहवासाचे अमृतथेंब,
कधी बनती विष:कण,--||६||
येतात तुझे आठव,
प्रेमाचे निव्वळ भास,
आत्म्यात फक्त उलघाल, काट्यांची बनते शेज,--||७||
येतात तुझे आठव,
कधी येईल राघववेळ,
कुशीत तुझ्या शिरून,
संपवेन दुर्भाग्याचा खेळ,--||८||
© हिमगौरी कर्वे.
January 5, 2020
मराठदेशाच्या मातीचा गर्जा जयजयकार
मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
उन्नत दुर्गम सह्यकड्यांचा
निबिड वनें, बेलाग गडांचा
जलदुर्गांच्या दृढ पंक्तीचा गर्जा जयजयकार ।।
मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
चपळ, वायुसम घोडदळांचा
शूर मावळ्यांच्या टोळ्यांचा
गनिमी काव्याच्या क्लृप्तीचा गर्जा जयजयकार ।।
मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
अतूट बुरुजांच्या रांगांचा
लखलख पात्यांच्या खड्गांचा
ढालीसम निधड्या छातीचा गर्जा जयजयकार ।।
मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
पावन ईप्सित, जीनवनिष्ठा
ध्येयपूर्तता हीच प्रतिष्ठा
स्वराज्यअमृतघटप्राप्तीचा गर्जा जयजयकार ।।
मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
शक्ति-युक्ति-नीतीचा संगम
प्रजासुखा कायम अग्रक्रम
श्रीरामासम शिवनृपतीचा जर्जा जयजयकार ।।
मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
- सुभाष स. नाईक
मुंबई
M- 9869002126.
eMail : vistainfin@yahoo.co.in.
Website : www.subhashsnaik.com
www.snehalatanaik.com
February 21, 2018
कितीही देशी शीतल चांदणे
आनंदाचा ठरुनी मेरुमणी
काट्यापरि हा मध्येंच ब
डाग तुझा लक्ष्य खेचूनी
ठाऊक नाहीं कधीं कुणाला
कसा लागला डाग उरीं
पडला असेल चुकून देखील
कुणी रंग उधळतां वेड्यापरि
शुभ्रपणाचा मानबिंदू हा
डागरहित जीवन त्याचे
केवळ एका डागापायीं
सत्य झांकाळते कायमचे
मिटून जातां डागही मिटतो
उरते मागें सत्य तेवढे
परि पुसण्यासाठी डाग एक तो
मिटणे उपाय जहाल केवढे
जोवरि जीवन चंद्रा तुझे
डाग दिसेल माथ्यावरचा
दुग्धामृताच्या घटांमधला
असेल थेंब तो विरजणाचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 14, 2020
October 24, 2012
ह्या सप्त रंगातल्या
इंद्रधनुष्याच्या
कमानीखाली
मेघराजा
गालात
हसा
ना
-- सौ.माणिक शुरजोशी
December 13, 2019
रंगले माझे मन मुरारी
नाम येई मुखीं श्रीहरी //धृ//
काळा सावळा रंग
कोमल भासे अंग
हास्य खेळते वदनीं
तेज चमके नयनीं
ओढ लागतां शरिरीं //१//
रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी
कंठी माळा चमकती
मोर पिसे टोपावरती
पायीं नुपुरे घालूनी
नाचतो ताल धरुनी
हातांत त्याच्या बासरी //२//
रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी
मुरली वाजे मधूर
नृत्य ते बहरदार
खेळातील तुझ्या लीला
छबी राही मनावरी //३//
रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 11, 2012
शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी
विसरून जातो वेड्या, स्वत:तील न्यूनता खरी ....।।धृ।।
पैसे ओढती खोऱ्यानें, परि शरीर भरले रोगानें
श्रीमंतीत वाढली कांहीं, गरिबाची लाचारी पाही
विसरून देह दुर्बलता, धनाचा अहंकार धरी...१
शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी
शरीर संपदा मिळे, परि अडते पैशामुळे
देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार
विवंचना ती पैशाची, विसरे शरिर सौख्यापरि....२
शक्तीच्या जोरावरती बघतो इतरांत लाचारी
ज्ञानीजन ते असती, अगाध त्यांची मति
टीका करित राहूनी, विसरती ते अडचणी
परिस्थितीचे वलय, निराश त्यांना करी....३
शक्तीच्या जोरावरती, बघतो इतरांत लाचारी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 24, 2017
आमची *राजहंसी जोडी,
फिरते मस्त या तलावी,
डौलदार माझा राजा,
लोक आम्हा पाहत राहती,--!!
सौंदर्य आमुचे राजसबाळे,
मुखडे तर किती देखणे,
आम्हा पाहण्या होड चाले,
नेहमीच या तलावाकाठी,--!!!
डुबुक डुबुक पाण्यामध्ये,
आम्ही विहरतो शानदार,
रंग शुभ्र लोभसवाणे
आकर्षित लोक इथे फार,--!!!
पर' फैलावीत, सूर मारत,
सुळकन् पाण्यात जातो दिमाखदार जोड पाहुनी,
कुणी प्रवासी थक्क होतो,--!!!
लाटांच्या सिंहासनीकसे
झोकदार,आम्ही बसतो, वरखाली हालती त्या,
किती ऐटदार बघा दिसतो,--!!!
आम्हां न लागते रंगरंगोटी,
तुम्हा नकली माणसांगत,
नैसर्गिक सौंदर्य आमचे,
कित्येक वाखाणती अव्याहत,--!!!
अप्राप्यही लौकीकाला, स्वर्गीय आमची जात,
राजबिंडे लावण्य का,
कधी येते सामान्यात,--!!!
तेजस्वी आमची काया,
पाहण्यास खूप तरसती,
कुणास ठाऊक किती आम्हा,
कसे केव्हा पाण्यात पाहती,-!?
पाण्यातील प्रतिमा आम्हा,
उगाच पहा खुणावतसे,
वाटून खालील दोघांचा हेवा,
मन आंत डचमळतसे*,---!!!
हिमगौरी कर्वे.©
May 16, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti