(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ओढ प्रितीची

    गालावरील लाली तुझ्या आजही टिकून आहे
    धुंदी गुलाबी ओठांची अजूनही तशीच आहे ।
    पाहून मजकडे स्मीतहास्य तू आता नको करु
    गालावरची गोड खळी ती घायाळ करीत आहे ।
    माळू नकोस तू तव केसात गजरा तो सुगंधी
    नहालेल्या केसांचा सुगंध धुंद मज करीत आहे ।
    खट्याळ तव नजरेने मजकडे तू पाहू नको
    भाव तव डोळ्यातील बेहोश मज करीत आहे ।
    आजही तीच तू आणि मीही आज तोच आहे
    ओढ अजूनही एकमेकांना आजही तशीच आहे ।

    सुरेश काळे
    मो. 9860307752
    सातारा.
    दि. १० सप्टेंबर २०१८

      September 12, 2018


  • भाषा जिला गौरवते

    भाषा जिला गौरवते,त्या मातीचेच गान ,
    मातेहूनही ती मोठी,
    भाषा देत असे dअधिक वेलांटी,--!

    ती आहे सृजनांत ,
    सर्वांची काळी आई,
    तिच्या कुशीतून जन्म घेतो,
    आपण सारे, पक्षी, प्राणी, --!

    ती करते जसे संगोपन,
    जिवांचे नित्य जतन,
    म्हणूनच तिला रोज करावा,
    नेमाने आपण प्रणाम,---!

    काय तिची महती वर्णावी, कणातही आहे सत्व,
    जीवनातील संजीवनी,
    तिच्याविना सृष्टी निर्जीव,--!

    जोडीदार आभाळाची,
    विशाल त्यांचा संसार
    लेकुरे उदंड जाहली,
    गोकुळ सगळा परिवार,--!

    माती पोटी जन्मते बीज,
    आणि विशाल वृक्ष होती,
    कित्येक वर्षानंतर पुन्हा बिजे,
    हीच बिजे मातीत रुजती,--!

    फळे-फुले रसरशीत,
    कधी पिकून पडती,
    त्यातूनच पुन्हा जन्मती
    मातीतून परत वरती,--!

    मानवी शरीर पार्थिव,
    मातीतच शेवट अंत,
    तिच्यातून असे जन्म,
    तिच्यात एकरूप परत,---!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 4, 2019


  • कळेल का तुला

    कळेल का तुला
    माझी ही कथा,
    वेळ नसेल तरी
    तू समजून घे तेव्हा...
    कळेल का तुला
    माझी धडपड,
    दूर असेल मी
    तरी नजर तुझ्यावर...
    कळेल का तुला
    माझे निःशब्द प्रेम
    असेल हळवे अबोल ते
    दूर तू जातांना मन बैचेन..
    कळेल का तुला
    मला ही हवे असते
    अबोल प्रेम तुझे ते
    समजून घे तू माझे मन ते..
    कळेल का तुला माझे
    अबोल प्रेम तुझ्यावरचे,
    आयुष्यात तू अलवार येते
    हृदयात तू अबोल हलकेच..
    -- स्वाती ठोंबरे.

      December 11, 2021


  • देवकी माता !

    काय म्हणू ग तुजला देवकी भाग्यवान की अभागी

    ईश्वर तुझीया उदरी येवूनी सुख न लाभले तुजलागी //

    जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला

    तु तर असता जननी प्रभूची तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला //

    राज वैभवी वरात निघता कारागृही तुज घेवून गेले

    अवताराची चाहूल असूनी दुःखी सारे जीवन गेले //

    कंसाने तव मुले मारीली निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी

    तु गिळून घेशी दुःखे सारी आगमन प्रभूचे होण्यासाठी //

    ईश्वर येता तव उदरी भाग्यवान तू ठरलीस

    जनकल्याणा त्यागूनी त्याला सर्व श्रेष्ठपदी गेलीस //

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      March 16, 2017


  • रिक्त प्रेमाचा घट

    रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट //

    भावंडाचे संगोपन

    रमवूनी त्यांचे मन

    आईच्या कामी मदत देऊन

    आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट //१//

    रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट

    लक्ष्य संसारी

    प्रेम पतीवरी

    मुलांची जोपासना करी

    संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२//

    रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट

    होता मुले मोठी

    संसार त्यांचा थाटी

    राहुनी त्यांचे पाठी

    सुखासाठी त्यांच्या, करी देहकष्ट //३//

    रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट

    ईच्छा उरली नसे मनी

    लक्ष्य सारे प्रभू चरणी

    सर्वस्वी त्यासी अर्पुनी

    विनवी ईश्वारासी, डोळे आता मिट //४//

    रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

    ३१-१६१२८३

      March 1, 2019


  • जातीची दांडगाई आणि ज्ञानेश्वरांची मराठी

    ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात सहाव्या अध्यायात माउलींनी मराठी भाषेची महती सांगताना ” माझ्या मराठाचिया बोलू कौतुके “अशी सुरवात करून ओव्या रचल्या .ज्ञानेश्वरांनी जाणीव पूर्वक मराठीचिया या शब्दा ऐवजी मराठाचिया हा शब्द प्रयोग केला होता . या मधे मराठी बोली बोलणारा तो मराठा हा हेतू असावा .परंतु आज मराठी भाषाच जणू जातीभेदांनी झाकोळून गेली आहे.

      September 25, 2016


  • उगवत्या सूर्याला नमस्कार

    उगवता सूर्य, नमन करती त्याला,

    विसरती सारे सुर्यास्ताला ||धृ||

    ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख

    बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती

    माना डोलावती, डामडोलाला ||१||

    उगवता सूर्य. नमन करती त्याला

    प्रथम हवे दाम, तरच होई काम

    पैशाच्या भोवती, सारेच फिरती

    पैशाचे गुलाम, मानती पैशाला ||२||

    उगवता सूर्य, नमन करती त्याला

    सत्तेची नशा, दाखवी जना आशा

    स्वतःसी समजे थोर, असुनीया शिरजोर

    हांजी हांजी करती, बघता सत्तेला ।।३।।

    उगवता सुर्य, नमन करती त्याला

    अधिकाराची रीत, बघती स्वहीत

    गरजवंता अडविती, शोषण तयांचे करती

    सलाम करती, अधिकाराच्य़ा खुर्चीला ।।४।।

    उगवता सुर्य़, नमन करती त्याला

    कालचा नटसम्राट, होता अती श्रेष्ठ

    डोंगर उतरला त्यानी, आज विचारिना कुणी

    जवळ करती, उमलणाऱ्या फुलाला ।।५।।

    उगवता सुर्य, नमन करती त्याला,

    विसरती सारे सुर्यास्ताला.

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 12, 2016


  • पावसाचे गाणे

    उघड पावसा ऊन पडू दे
    उडू बागडू हसू खेळु दे ।

    कळी उमलू दे, फुला फुलू दे
    पाने वाऱ्यावरी डुलु दे
    टप टप खाली थेंब पडु दे
    तालावर त्या मला नाचू दे ॥१॥

    पाय उठवू दे वाळूवरती
    समुद्र झाला ! आली धरती,
    आभाळ पडे खोल खालती
    डोकावुनि ढग आत पाहु दे ॥२॥

    उंच चालल्या घारी वरती
    बगळे रांगा धरुनि उडती
    ढगात भरभर रंग बदलती
    पाठशिवणीचा खेळ बघू दे ।।३॥

    चिमणी ओले पंख सुकविते
    घरट्यामधुनी पिलू पहाते
    मुंगी रांगेमधे धावते
    साखर-खाऊ तिला घालु दे ।।४॥।

    बसे फुलावर फूलपाखरु
    मला सांगते मौज चल करु
    थांब पावसा ऊन पडू दे
    गाता गाता मला खेळु दे !

      June 27, 2026


  • स्फूर्ती दाता

    तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य
    समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य

    तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती
    प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती

    कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी
    मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी

    हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी
    दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही

    गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी
    स्फूर्ती देवता हवी तयाला येण्या उचंबळूनी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      August 7, 2019


  • जीवन आनंद

    ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे

    उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे १

    संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले

    समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले २

    खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे

    बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ३

    विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो

    यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ४

    संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी

    प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ५

    वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची

    आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ६

    एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी

    शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ७

    हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे

    गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ८

    ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह

    संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ९

    मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम

    कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण १०

    आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला

    देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ११

    हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही

    ‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई १२

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      September 4, 2019