अध्यात्म ही भारतीयांची शक्ती, मानसिक स्वास्थ्य व आत्मिक बळ प्राप्त करून देणारं माध्यम ! जगात वैज्ञानिक क्रांती झाली, तरी भारतीयांनी आपली अध्यात्माची परंपरा सोडलेली नाही. कॅनडात आलेल्या बहूसंख़्य लोकांमध्ये पदवीधर त्यातही तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांची संख्या अधिक…. नोकरीच्या निमित्तांने त्यांनी देश सोडला; परंतु आपली आध्यात्माची परंपरा कायम जतन केली.
September 18, 2020
शब्द जरी जाहले अबोल
मौनी मन, मनाशी बोलते
द्वंद्व! ते सत्य, असत्याचे
जीवाला सदा खात असते
कर्म! मनी बिलोरी आरसा
स्वचे, खरे प्रतिबिंब दिसते
जरी प्रतारणा जगाशी केली
सत्यता उरीची जीवा छळते
सर्वांती नोंदणी ती चंद्रगुप्ती
लेखाजोखा, सामोरी मांडते
जन्म! कर्म विवेकी, संचिती
अर्थ! मुक्ती, मोक्षाचा सांगते
प्रीती, सद्भावना सदा सांगाती
सत्य! सूर्यप्रकाशी समोर येते
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ३९.
८ - २ - २०२२.
February 24, 2022
दु:खाचे तूं देवूनी चटके, सत्वपरिक्षा ही बघतोस
प्रतिकूल ती स्थिती करूनी, झगडत आम्हां ठेवतोस
खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा
खेळातूनि अंग काढतां, जगण्याच्या मिटतील खुणा...२,
खेळगडी तो असूनी तुम्हीं, मैदानासम विश्व भासते
तन्मयतेनें खेळत असतां, खचितच यश तुम्हा येते...३,
विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा
बसू नका हतबल होवूनी, गमवाल त्या अमूल्य वेळा....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 9, 2017
मार्ग निसर्गाचे सदा, निश्चीत आणि अढळ ।
चालतो त्याच दिशेने, जसजशी येते वेळ....१
चालत आसता थांबे, भटके वाट सोडूनी ।
करूया काही आगळे ठरवी विचारांनी....२
आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे ।
नियतीची वाट मात्र, त्या दिशेने जात नसे....३
परिस्थितीचे कुंपण, टाकले जाते भोवती ।
कळत वा नकळत, मार्गी त्यास खेचती....४
करून घेतो निसर्ग, वाटते त्याला हवे जे ।
अकारण तुम्हा वाटते, हे तर आहे माझे....५
जीवनाच्या सांजवेळी, बघता मागे वळूनी ।
प्रवास केला वेगळा, हेच येते समजूनी....६
मिळूनी काही आगळे, समाधानी वृत्ती येते ।
आनंदाने निरोप घ्या, नियती तुम्हा सांगते....७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 12, 2017
आई - मुलीचं नातं
ममतेचं आपुलकीचं
ओढ असते दोघींनाही
प्रेमात वास्तल्याचं
प्रेमाच्या जाणिवेचा
आई अथांग सागर
माया ममतेने तिचा
करूया जागर
मुलगी म्हणजे
ईश्वराची गोड भेट
लावूनी माया जिव्हाळा
कवटाळून हृदयाशी थेट
'आई' एक आठवण
प्रेमाची साठवण
आई एक नाव
जगावेगळा भाव
आई म्हणजे एक गोड नातं
जिवनाचं बहरतं पातं
आई म्हणजे घराचा आधार
आईविना घर भासे निराधार
आई म्हणजे
आनंदाचा सागर
आई म्हणजे
मायेचा पाझर
मुलगी म्हणजे जणू
आनंदाचा निखळ झरा
ममतेचा जिव्हाळ्याच्या
प्रेमात हिरवाईचा मळा
-- सचिन विश्वास
“आम्ही साहित्यिक” फेसबुक ग्रुपवरुन
November 23, 2018
अविरत भक्त करत वारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम्
अथक जन ज़ात विठूदारीं, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
ऊन नि पाउस यांची नाहीं एकाला पर्वा
ध्यास एकची लागे सर्वां - तो विठ्ठल बरवा
भारले सारे वारकरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
कठिण शेकडो मैल तुडवती मराठदेशातले
अखंड नाचत भक्त शेकडो, कुणिही नच दमले
देइ चैतन्य मनां पंढरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
समान असती विठुमार्गावर सारे वारकरी
कुणांशी न कोणांस करावी लागे बरोबरी
सर्वच हर्षद-शेज़ारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
वारकर्यांच्या वसतो हृदयीं पांडुरंग सांवळा
उभा विटेवर, हात कटीवर, तुलसीमाळ गळा
विठूमय झाले नरनारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
ज़ातिपातिचें ना बंधन, ना लहानथोर इथें
शतकांपासुन अशीच वारी पंढरिला निघते
पाहुनी म्हणतो स्वत: हरी – ‘हॅटस् ऑऽऽफ् टु देम्’ ।।
- - -
हॅटस् ऑऽऽफ् टु देम् : Hats Off To Them
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
July 6, 2016
November 5, 2021
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे असे....
तेच सदैव नेटबिझी असे.....
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे नसे....
तेच सदैव अनेक कामात बिझी असे....
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे असे....
सदैव खाली मान घालुन बसे....
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे नसे....
तेच ताठ मानेने जगासमोर बसे....
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे असे....
रात्रभर Whatts Appas व फेसबुकवर असे...
"स्मार्टफोन" ज्याच्याकडे नसे...
तो प्रातःकाळी ऊठुन दिनचर्येस प्रारंभ करे...
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे असे....
कामात त्यांचे सतत लक्ष नसे....
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे नसे...
तेच प्रमोशन घेण्यास पात्र असे....
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे असे....
ते परिवारापासुन लांब वसे....
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे नसे....
ते परिवारात सदैव मग्न असे....
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे असे....
ते सुखदुःखात लांबुन सहभागी होत असे...
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे नसे...
ते वैयक्तिक भेटुन धीर देत असे....
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे असे...
सणावारांचे भावपुर्ण मेसेज सेंन्ड करण्यात व्यस्त असे.....
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे नसे....
ते पारंपारिक पध्दतीने एकत्रितपणे सणवार परिवारासोबत साजरे करण्यात व्यस्त असे..
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे असे...
तो सदैव एकांतात असे..
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे नसे....
तो सदैव मित्रपरिवारात असे....
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे असे....
तो सदैव अस्थिर व चंचल असे..
"स्मार्टफोन" ज्याच्यांकडे नसे...
तो सदैव स्थिर.. एकाग्र..एकचित्तच असे....
-- विवेक जोशी
March 9, 2016
नियोजनाच्या लागून मागें, भविष्याची आखतो चौकट
कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट....१,
अनेक वाटा दिसूनी येती, भविष्यामधळ्या कल्पकतेला
वर्तमान त्या काळाकरिता, जावे लागते एकाच दिशेला...२,
उठूनी करा त्याच क्षणीं ते, वृत्ति असावी अशीच सदा
उद्यांवरती कार्य टाकतां, मनीं उमटती विचार द्विधा...३,
वर्तमान हा निश्चीत असता, यश लाभते अनेकदा
केवळ तुमची बघुनी धडपड, साथ देईल ईश्वर सदा....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 5, 2017
संतुलन करूनी चालवी, निसर्गाचा खेळ सतत ।
जन्ममृत्यूची चाके फिरवी, एकाच वेगाने अविरत ।।१।।
जन्म घटना ही शांत होता, मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी ।
नष्ट होतो जेव्हां मानव, विचार लाटा उठती मनी ।।२।।
मरणामध्यें निसर्ग असतां, हताश होऊनी दु:ख करी ।
मानवनिर्मित नाश बघूनी, घृणायुक्त येई शिसारी ।।३।।
पूर वादळे धरणी कंप, पचवितो आम्ही ही संकटे ।
मानव निर्मित युद्ध दंगली, सूड भावना तेथे पेटे ।।४।।
विनाश असता दोन्हीमध्ये, मान तुकवी निसर्गापुढे ।
बिघडले घर देईल बांधूनी, विश्वास बाळगी ईश्वराकडे ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 15, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti