July 13, 2012
राजकारण्यांना झटका देणारी एक हिंदी कविता
April 10, 2013
हातातील काडी घासतां पेटीवरी
अग्नि त्याच्यातील ज्वाला त्या धरी
लपलेला अग्नि घर्षणाने पेटतो
अज्ञान झटकता ज्ञानी उजाळतो
चितांत असतो प्रभू सदैव शांत
ओळखण्या त्यासी लागताती संत
संत हाच गुरु मार्गदर्शक असे
चित्तातील प्रभूला जागवित असे
उजळण्या मन घर्षण लागे संताचे
पेटवा ज्ञानाग्नि सार्थक होई जीवनाचे
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 3, 2019
उंच चढूनी हिमालयी, झेंडा तो रोविला
गीरीराजाचे शिरावरी, विजय संपादिला
उंचाऊनी बघे मानव, अथांग जगताला
विज्ञानाच्या जोरावरती, अंतराळात गेला
युगा युगाचा चंद्रमा, केला अंकित त्याने
त्याच्या देही ठेवी पाऊल, मोठ्या अभिमानाने
अगणित दिसती गृहगोल, त्याचा दृष्टीला
सीमा न उरली आता मग, चौकस बुद्धीला
चकित होतो प्रथम दर्शनी, विज्ञाना बघता
दिसून येती अनेक गुढे, एक एक उकलता
किती घेशी झेप मानवा, उंच उंच गगनी
वाढत जातील क्षितिजे, तितक्याच पटींनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 26, 2020
रंग गुलाबी शराबी,गाली तुझ्या फुलले,
मदनबाण नयनातुनी, पाहता-पाहता निसटले,--!!!
जाई जुई कोमलांगी,
नाजूक तन साचे,
अंगकाठी शेलाटी,
सोनचाफ्याचे फूल नाचे,--!!!
वर्ण तुझा केतकी,
मिठास शब्द बोले,
कुंदकळ्यां नाजूकही,
दंतपंक्ती जणू भासे,--!!!
वाटे चालते-बोलते,
फूल तू सायली,
गेंद टपोरे झेंडूचे,
केशरवर्खी उरोजही,--!!!
जाता तू जवळुनी,
मनमोगरा फुलतसे,
उमलत हरेक पाकळी,
जिवाचे कमळ बहरतसे,--!!!
मंजुळ स्वर ऐकुनी,
भोवती सडा प्राजक्ती,
फुलांचा सुगंध येई,
सुंदरी तुझ्या सहवासें,--!!!
हिरवा चाफा दडुनी,
लज्जेत तुझ्या बसे,
प्रीत फुले मात्र फुलती,
काळजांची पर्वा नसे ,--!!!
सौंदर्याचा मी पुजारी,
विनवतो तुला प्रेमे,
प्रसन्न हो ग देवी,
भक्तकल्याणा कारणें,--!!!!
© हिमगौरी कर्वे
February 20, 2020
झोका जाई वरखाली
मन होई परागंदा
धरणी वर नसे पाय
पाखरू उडे कितींदा..!!१!!
घट्ट धरुन मन धागा
लांब झोका चालला...
सावर सावर उंचावर
तोल मनाचा चुकला..!!२!!
खाली आला हिंदोळा
पाय मातीत ठेवला
क्षणात उन पावसाचा
रंग उधळीत आला.!!३!!
जपून चालतो खेळ
झुले झुलती वाऱ्याने..
श्रावणधारा रिमझिम
गाते ओलेत्या स्वराने..!!४!!
July 12, 2026
आसक्ती सोडून सारी
पार्वती पूजिते शिवाला..
माथ्यावर चंद्र शीतल
नृत्य तांडव शिव लीला..
उपेक्षा नसावी म्हणून
पार्वती स्थापिले शिवलिंग..
लिंपण त्यास फुल पत्रीचे
स्विकारावे तिला अर्धांग..
ललाटी त्रिनेत्र स्थान
गळ्यात डोले भुजंग..
थंडी पाऊस वारा जरी
सतीचे व्रत अभंग
पार्वतीचे एक मागणे
शिव हाच लाभावा वर..
वैराग्याचा शेला सुंदर
शिवशक्तीचे मिटावे अंतर
July 23, 2026
छोट्या छोट्या अशा क्षणांतील
मजा चाखता जगता यावे
पार नसलेल्या आनंदालाही मग
इवल्याशा मुठीत मावता यावे
थकून सायंकाळी घरी आल्यावर
प्रसन्न वदनी दीप उजळावे
दाराआड लपलेल्या गंमतीने
चिमुकल्या पावलांचे रुप घ्यावे
हेतूक-अहेतूक नाजूक कटाक्षांनी
मोहरत्या कळ्यांचे गंध व्हावे
जीवन उरवणाऱ्या क्षणांना
धडकत्या स्पंदनांनी साक्ष रहावे
दाटून येणाऱ्या स्निग्धतेतून
पोक्तशा मायेचे स्पर्श जाणवावे
जीवनाशी नाळ अजून अबाधित
विश्वासाने या, मग वात्सल्य ल्यावे
चिमखड्या गोड गोड बोलांना
भाबडे बोबडे प्रश्न पडावे
निरर्थक अशा हावभावांनीही
हसून हसून बेजार व्हावे
पक्ष्यांचा ऐकत मंजूळ किलबिलाट
हिरव्याकंच साजाने नाचनाचावे
क्षितीजावर करुन सोनेरी उधळण
निसर्गाच्या कुंचल्याने परीस व्हावे
महाल गाड्या नि शेतीवाड्या
कशास याचे अप्रूप वाटावे
फुलाया मळे आनंदाचे अंगणी
वणवण फिरण्या ते का लागावे
आनंदाचा असा पारिजातक
सदैव दरवळतो मनामनात
शोधावा तेव्हा तो सापडतो
आपला आपल्याच प्रांगणात
-यतीन सामंत
ऋणानुबंध या कविता संग्रहातून
(१९९९)
June 9, 2022
“ती बेफामपणे पुढे जात होती तो फरफटत होता…. त्याला फरफट असह्य होत होती… शेवटी तो शांत झाला झोपला तो झोपलाच”
September 12, 2021
सारेच आहेत दुबळे
कुणाते नसे शक्ति
वेळ येतां दुर्बल ठरे
जे सबळ समजती ।।१।।
विचार मनी येतां
दुसरा शक्तिशाली
समजोनी जावे तेव्हां
हार तुमची झाली ।।२।।
मनाची सबलता
हेच शक्तीचे मापन
काय कामाचा देह
दुर्बल असतां मन ।।३।।
सुदृढ देह व मन
यांची मिळून जोडी
जीवनातील यश
तुमच्या पदरीं पाडी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 2, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti