(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अश्याने पुढारलेले बनू का?

    || हरी ॐ ||

    आपल्या देशाला थोर परंपरा ऋषींची,
    संतांची आणि देशभक्तांची !
    विज्ञान आणि तंत्रज्ञानात नाही ताबेदारी कुणाची,
    उकल करू पाहतो न समजलेल्या ग्रहांची !

    अश्या थोर इतिहासाला आणि प्रयासाला,
    बट्टा लागला देश हिताला समलिंगी संबंधाचा !
    नाही पटत मनाला, कीव येते बुद्धीची
    समलैंगिक संबंधींची !

    घटनेप्रमाणे लोकशाहीत मतस्वातंत्र सर्वांना,
    तरी समलिंगी स्वैराचार नाही पसंत कायद्याला !
    अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली,
    माणूसच स्वत:चा बुद्धिभेद करू लागला !

    काय त्या पुढारलेल्या चारपाच राष्ट्रांनी
    समलिंगींसाठी कायद्यात केले बदल !
    पण माहित नाही त्यांना
    भविष्यात काय वाढून ठेवले आहेत बदल !

    नुकसान आहे स्वत:चे,
    राष्ट्राचे, मानवतेचे,
    भविष्यात राष्ट्राला
    कारण नाही कुटुंबनियोजनाचे !

    असे कसे काही शहाणे सुरते,
    वागतात बुद्धीभेदाने पछाडल्यासारखे?
    हेच का देशप्रेम आणि भक्ती?

    जगदीश पटवर्धन, दादर

      March 2, 2015


  • असाच पाऊस झिम्माड

    असाच पाऊस झिम्माड
    वाहते रस्ते गळकी झाडं
    पक्षी घरट्यात
    माणसं बिऱ्हाडात
    सगळं शांत निवांत ...
    अंतरात.. आसमंतात
    तू म्हणालास...
    एक आठवण जगावी कोसळणाऱ्या पावसाची
    चिमटीत धरून सोडावी तशीच बोट कागदाची
    हातावर थेंब झेलत गोल गोल राणी म्हणावं
    तसंच लहान होऊन गोधडी गुरफटून झोपावं
    पाऊस तुझ्या मनात
    पाऊस माझ्या डोळ्यात
    झरत होता झरझर
    उलगडत अंतर
    अचानक तू थांबलास
    ओल्या पापण्यांनी हसलास
    म्हणालास....
    संपला इथला सहवास
    पुढचा पाऊस नसेल खास
    बदलली चौकट कि बदलेल सगळं
    मनाच्या पाटीवर चित्र असेल वेगळं
    फुटतील ढग कोसळतील सरी
    सगळं असेल तसंच तरी
    सूर होतील बेसूर गातील राग अनवट
    पावसाच्या चित्रातले रंग दिसतील फिक्कट
    उखडलेली घरटी उजाडलेली घरं
    येईल नजरेत सगळं खरंखरं
    तू म्हणालास…तसंच झालाय रे !
    सुरु झालाय अनवट राग
    घेतोय कसला कसला माग
    मी अस्वस्थ त्रयस्थ वैराग
    सजीव चित्रातला निर्जीव भाग
    दिसतंय सगळं उदास भकास फिक्कट
    कारण....
    मोडून गेलास तू चित्राची चौकट...
    मोडून गेलास तू चित्राची चौकट!!!

    . ..... मी मानसी

      August 14, 2019


  • सिकंदरची शांतता

    दिग्वीजयाच्या स्वारीवरती, निघे सिकंदर सैन्य घेवूनी

    जग जिंकण्या ध्येय मनाशीं, महान आशा उरी बाळगूनी

    आश्वा रुढ ते सैनिक सारे, सिकंदराच्या मागें धावती

    लगाम खेचूनी वृक्षा पाशीं, एक साधू तो बघूनी थांवती

    पृच्छां करितां साधू म्हणाला, शांत चित्त तो बसला असे

    मिळविण्यास ते कांहीं नसतां, शोध प्रभूचा घेत दिसे

    सिकंदर वदे देश जिंकूनी, संपत्ती घेई लुटून सारी

    जगत् जेता नांव कमवूनी, जाईन माझ्या देश दरबारी,

    काय करशील नंतर तू गे? प्रश्न विचारी तो साधू जन

    "शांत राहण्या प्रयत्न करित, अखेरचा मी काळ घालविन”

    मिस्कीलतेने साधू विचारी, मी तर आजच शांत आहे

    धडपड सारी करूनी एवढी, माझ्याच मार्गे तुम्ही जाए

    ध्येय विसरूनी सारे आपण, धावत असतो वेड्या परी

    प्रभू मिलनाचे कार्य खरे, ते मनास जागविते केंव्हां तरी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      May 23, 2016


  • मनापासून जगण्याची शिक्षा

    स्वप्नांच्या वाटेवर मी चालत होतो,
    मनात आशेचे दिवे पेटले होते.
    निरागस शब्दांनी नाती जोडली,“मनापासून जगण्याची शिक्षा”
    भावनांचे धागे अलगद विणले होते.

    मनातल्या भावना जपून ठेवल्या,
    शब्दांतून त्यांना अर्थ दिला.
    नात्यांच्या त्या कोमल धाग्यांना
    मी प्रामाणिकपणाचा स्पर्श दिला.

    कुणाला दुखवायचा हेतू नव्हता,
    मनात फक्त प्रेमच जपले होते.
    पण काळाच्या या कठोर वळणावर,
    का नियतीनेच माझी साथ सोडली?

    नजरेत प्रश्नांचे सावट दाटले,
    उत्तर मात्र कुठेच दिसेना.
    मनाला समजावत राहिलो तरी,
    दुखणे काही कमी होईना.

    जगाच्या हिशेबात कदाचित
    भावनांना किंमत नसते कधी.
    मनापासून जगण्याची शिक्षा
    बहुतेक अशीच मिळते कधी.

    नजरेत अनेक प्रश्न दाटले,
    उत्तर मात्र शांत राहिले.
    हृदयाने जे काही दिलं होतं,
    तेच का जगाला खटकलं असेल?

    आणि मग मनात एकच प्रश्न घुमतो...

    *अपराध माझा असा काय झाला?*

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 13, 2026


  • हर घडी मिळो सहवास

    मानव देह देवूनी ईश्वरा, उपकार केले मजवरती
    सेवा करण्या तव चरणाची, संधी लाभली भाग्याने ती...१,

    कर्म दिले तू मानव योनीसी, श्रेष्ठत्व येई ते त्याचमुळे
    उद्धरून हे जीवन नेण्या, कामी येतील प्रयत्न सगळे...२,

    मुक्त होणे जन्म मरणातूनी, साध्य होई ते प्रभूसेवेने
    परि तीच मुक्ती वंचित करते, आनंदमयी प्रभू दर्शने...३,

    एक मागणे प्रभू चरणी, मुक्ती न देयी तू मजला
    संधी देवूनी तव सेवेची, सहवास मिळवा हर घडीला...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      November 16, 2017


  • सुक्ष्मात अनंत

    एकटाच मी बसलो होतो, शांत खोलीमध्यें

    दुरदर्शन ते करीत होते, करमणूक आनंदे......१,

    दूरीवरील व्यक्ती बघूनी, शब्द त्याचे ऐके

    केवळ चावी फिरवितां क्षणी, दृष्य दुजे देखे...२,

    जगामधली सर्व ठिकाणें, खोलीत अदृष्य तीं

    साधनांचा उपयोग करिता, जाण त्याची येती....३,

    वातावरण प्रभूमय सारे, व्यापले सर्व जगी

    सुक्ष्मापासूनी अनंतेचे, गुण एकाचे अंगी....४,

    तेथे आहे जे येथे तेच आहे, व्यापूनी सर्व स्थळी

    व्यापकता दिसे ब्रह्माडांची, बिंदूत एका सगळी....५

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 28, 2018


  • सहचारीणी

    दिपूनी गेले नयन त्या क्षणी

    बघता तिची सोज्वळ मुर्ती ।

    हाक निघाली अंतःकरणीं

    तुझ्याचसाठी निर्मीली कृती ।।

    जरी बघीतल्या अनेक सुंदरी

    ठाव मनाचे हिने जींकले ।

    सहचारीणी ही होईल तुझी

    अंतरमनी शब्द उमटले ।।

    अनामिक जे होते पूर्वी

    साद प्रेमाची ऐकू आली ।

    योग्य वेळ ती येता क्षणी

    ह्रदये त्यांची जुळुनी गेली ।।

    शंका भिती आणि तगमग

    असंख्य भाव उमटती मनी ।

    विजयी झाले ऋणानूबंधन

    बांधले होते भावबंधनी ।।

    उचंबळूनी दाटूनी आला

    ह्रदयामधला ओलावा ।

    स्नेह मिळता प्रेम मिळाले

    जगण्यासाठी दुवा ठरावा ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 3, 2019


  • विश्वगाभारा

    तूं स्त्री, रूप तुझेच चराचरी
    स्वरूप तुझेच, विश्वगाभारा
    सत्य! वास्तवी तूच गे ईश्वर
    सृष्टीतील तूंच वात्सल्यधारा।।
    तू जननी, तूच गे आदिमाया
    तुझा सन्मान, तुझेच चारित्र्य
    दान ईश्वरी ऐश्वर्य सुखशांतीचे
    तूच सात्विक, ईश्वरीय सुंदरा।।
    तुझ्याच गे रूपात शब्दगंगोत्री
    अंतरातुनी, भाव अमृती सारा
    भरताच अलवार या ओंजळी
    स्पर्षतो तृप्तलेला विंझणवारा।।
    भाव गंधलेले तव रूप आगळे
    भुलवुनी जाता तनमनांतराला
    साक्षात ओघळतेस काव्यरुपी
    तव रुपात रंगतो ब्रह्मांड सारा।।
    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. ७४.
    दिनांक : ८ / ३ / २०२२.

      March 23, 2022


  • थवा राव्यांचा

    सकाळच्या या प्रसन्न प्रहरी
    सूर्यकिरण पसरले अंबरी ।।

    उदर भरण करण्यासाठी
    लगबग उडाली ही पक्ष्यांची ।।

    कावळे, घारी, साळुंखी ही
    पारवे, चिमण्या, बुलबुल संगती ।।

    प्रत्येकाचा सूर निराळा
    गाऊन सवंगड्या साद घालती ।।

    पटकन आला थवा राव्यांचा
    मंदिर शिखरी क्षणभर विसावला ।।

    घाणेरीच्या झुडुपांमध्ये
    क्षणात हा थवा मिसळून गेला ।।

    मोबाईल हा गप्प बसेना
    मग नजारा हा राव्यांचा ।।

    छायाचित्रण करुनी तयांचा
    आनंदाचा क्षण साठविला ।।

    (रावा =पोपट)

    -- मी सदाफुली
    संध्या प्रकाश बापट
    03/10/2019

      October 4, 2019


  • ये विचारू पावसाला

    https://youtu.be/oOvXBVb5DAQ

      June 11, 2018