(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हर घडी मिळो सहवास

    मानव देह देऊनी ईश्वरा,
    उपकार केले मजवरती,
    सेवा करण्या तव चरणाची,
    संधी लाभली भाग्याने ती ।।१।।

    कर्म दिले मानव योनीसी,
    श्रेष्ठत्व येई त्याचमुळे,
    उद्धरून हे जीवन नेण्या,
    कामी येतील प्रयत्न सगळे ।।२।।

    मुक्त होणे जन्म मरणातूनी,
    साध्य होई प्रभूसेवेने,
    परि तीच मुक्ती वंचित करते,
    आनंदमयी प्रभू दर्शने ।।३।।

    एक मागणे प्रभू चरणी,
    मुक्ती न देई मजला,
    संधी देऊनी तव सेवेची,
    सहवास मिळवा हर घडीला ।।४।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      June 13, 2016


  • कष्टाचे मोल

    कष्ट करुनी घाम गाळीतो, शेतामध्यें शेतकरी

    समाधानाची मिळते तेंव्हा, त्यास एक भाकरी

    त्याच भाकरीसाठी धडपडे, नोकर चाकर

    कष्टामधूनच जीवन होते, तसेच साकार

    कष्ट पडती साऱ्याना, करण्या जीवन यशदायी

    विद्यार्थी वा शिक्षक असो, अथवा आमची आई

    अभ्यासातील एकाग्रता, यास लागते कष्ट महान

    त्या कष्टाचे मोल मिळूनी, यशस्वी होईल जीवन

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 12, 2020


  • मुलीचा पाळणा (गौरी)

    तीन तपे गेली गौरी घरी नव्हती आली
    चिमुकल्या पावलांनी दारी प्रकटली
    गौरी आली गौरी कसे करू मी स्वागत
    हृदयाच्या पाळण्यात झेलते अलगद ।।
    गौरी आली गौरी आनंदले घरदार
    आगमने तिच्या परिपूर्ण हा संसार ।।
    गौरी आली गौरी सानथोर पुलकित
    कुठे ठेवू कुठे नको झाले कवतिक ।।
    गौरी आली गौरी झूला फुलांनी सजवा
    सोनुल्या ह्या अपर्णेला पाळणी मिरवा ।।
    गौरी आली गौरी सोन्या मोत्यांनी नटवा
    रेशमाच्या गादीवर हलके जोजवा ।।
    गौरी आली गौरी वाटा बाई गोड धोड
    आजी काकी मामी मावशी पुरवती कोड ।।
    गौरी आली गौरी नांव ........... ठेवियले
    ....... च्या कुळी लाख दिवे उजळले ।।
    (आडनांव)

      October 26, 2018


  • लेखणीवरील तीन चारोळ्या

    *चारोळी क्रमांक १*
    लेखणीतील शाई
    कागद करी काळा
    अर्थप्रवाही वाक्य
    वाच सगळी बाळा

    *चारोळी क्रमांक २*
    लेखणीतून झरे
    कागदावरी ज्ञान
    तिथे अज्ञान सरे
    लोका करी सज्ञान

    *चारोळी क्रमांक ३*
    ज्ञानगंगा वाहते
    ही स्त्रवता लेखणी
    सरस्वती रमते
    साहित्यात देखणी

    सौ.माणिक शुरजोशी

      January 11, 2020


  • पुरेसं

    कालपर्यंत
    पावसाच्या एका सरीसाठी
    डोळे आभाळाकडे लागले होते.
    आज मात्र त्याच सरींच्या रौद्र रूपाने
    मनात भीतीचं वादळ उठलं आहे.

    आयुष्य इतकंच शिकवतं
    अभाव दुःख देतो,
    पण अतिरेकही सुख हिरावून घेतो.

    जिथे "पुरेसं" थांबतं,
    तिथेच समाधान फुलतं.
    जिथे हव्यास वाढतो,
    तिथे आनंद हरवत जातो.

    भाकरी पुरेशी असेल,
    तर ती अमृताहून गोड लागते.
    छप्पर पुरेसं असेल,
    तर पावसाचं गाणंसुद्धा मधुर वाटतं.

    श्रीमंती म्हणजे
    अफाट संपत्ती नव्हे.
    "आहे ते पुरेसं आहे,"
    असं मनापासून म्हणता येणं
    हीच माणसाची खरी श्रीमंती आहे.

    कारण...

    अति पाऊस पूर आणतो,
    अति ऊन दुष्काळ घडवतो.
    निसर्ग असो वा आयुष्य
    "पुरेसं" हाच सुखाचा खरा समतोल असतो.

    ज्याला पुरेसं कळलं,
    त्याला समाधान लाभलं.
    आणि ज्याला समाधान लाभलं,
    त्याच्यापेक्षा श्रीमंत या जगात दुसरं कोणी नाही.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 14, 2026


  • पुर्णविराम

    एक वाक्य लिहिलं की पुर्णविराम देतो.
    दुसरं तिसरं वाक्य लिहून झालं की

    पुन्हा पूर्णविराम.

    अजून काही वाक्ये लिहत राहतो.
    पुर्णविराम देत देत.
    सगळं लिखाण संपतं पुर्णविरामानं.

    तरीही काही आठवलं की
    ताजाकलम म्हणून अजून वाढवत राहतो लिखाण.
    पुर्णविराम देवुन पुन्हा.

    या अपुर्णविरामांना दुसरं नाव शोधतोय मी.

    मधल्या सगळ्या पुर्णविरामाच्या टिंबाला वेगळं अन

    शेवटच्या खरोखरच्या पुर्णविरामाच्या चिन्हाचा
    आकारच वाढवावा म्हणतो मी ॰

    -- श्रीकांत पेटकर

      March 7, 2019


  • चित्त मंदीरी हवे

    लोटांगण घालूनी शरण गेला, देव मंदीरीं तो ।

    आदर दाखविण्या ईश्वरठायीं, प्रयत्न करीतो ।।

    समर्पणाचे भाव दाखविण्या, देहाला वाकवी ।

    मन जोपर्यंत विनम्र नसे, प्रयत्न व्यर्थ जाई ।।

    मंदीरी तुमचे शरीर असूनी, मन असे इतरीं ।

    श्रम तुमचे निरर्थक बनता, मिळेल कसा श्रीहरी ।।

    इतरत्र राहूनी चित्त तुमचे, असतां मंदीराकडे ।

    खरे पुण्य पदरीं पडते, हेंच जाणा कोडे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४९७९८५०

      July 8, 2020


  • विश्रांती

    धावपळीचे जीवन सारे, मिळे न कुणा थोडी उसंत
    विश्रांतीच्या मागे जाता, दिसून येतो त्यातील अंत.....१

    चैतन्यमयी जीवन असूनी, चक्रापरी ते गतीत राही
    चक्र थांबता क्षणभर देखील, मृत्यूची ते चाहूल पाही....२

    थांबत नसते कधीही जीवन, अंत ना होई केंव्हां त्याचा
    निद्रा असो वा चिर निद्रा, विश्रांती ही भास मनीचा....३

    थकून जाई शरिर जेंव्हां, प्रयत्न करि ते विश्रांतीचा
    चैत्यन्य आत्मा देह सोडूनी, घेई आसरा पुन्हा दुजाचा....४

    आत्मा देखील थकून जाता, परमात्म्याशी विलीन इच्छीतो
    चैतन्यातूनी विश्रांतीचा ‘मुक्ती’ मार्ग अखेरचा तो....५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 18, 2019


  • फ्लॅटचे ध्येय (१९९५ साल)

    त्याच्या आणि माझ्या जीवनांत

    खूप तफावत होती.

    तो कसा जगतो ? - - -

    ह्याची मलाच काळजी होती.

    बिनधास्त, बेफिकीर, मनमानी

    त्याचे जीवन

    खाओ, पिओ, और मौज करो,

    हे त्याचे समिकरण.

    अनअधिकृत झोपडपट्या मधल्या

    दोन झोपड्या शेजारी

    मागील वर्षीच अधीकृत होऊन

    नोंद झाली सरकारी.

    तूर्तास तरी पाडून टाकण्याची भिती गेली

    ह्यामुळे छताची तरी सोय झाली.

    आम्ही दोघेही एकाच कंपनीत कामाला.

    पगार मिळकत तेवढीच,

    तरी निराळी दिशा विचाराला.

    कसा छोटासा - - -

    भले वन रुम किचन कां असेना

    परंतु पक्या बांधणीचा आपला फ्लॅट असावा,

    ही माझी धारणा आणि माणूस म्हणून

    जगावे ही त्यातील कल्पना

    - - - जीवन म्हणजे काव्य नव्हे .

    शब्दावर बुद्धी जगते.

    पण पोट मात्र पैशावर राहते.

    तत्वज्ञान, वाचन, विचारांचा

    माझ्यावर प्रभाव होता.

    आणि जगण्यासाठी लागणाऱ्या

    सर्व गोष्टी विषयी माझा कंम्पुटर

    सदैव हिशोब करीत होता.

    नॅशनल सेव्हींग सर्टीफिकीटस, युनीट ट्रस्ट,

    फिक्स डिपॉजीटस आणि सेव्हींग

    आकाऊन्टस ह्या बाबतीत मला रस होता

    व पैशाचे पाठबळ हा विषय आवडता होता.

    दहा वीस लाखांचा फ्लॅट बचतीच्या

    माध्यमातून घेणे

    ह्यासाठी गरज होती काटकसरीने जगणे.

    हे तत्व अनुसरले आणि पैशाचे प्लॅनिंग

    त्या प्रमाणे आखले.

    - - - मला मोठी गम्मत वाटते त्याची

    आणि त्याच्या जगण्याचा पद्धतीची.

    नो प्लॅनिंग नो Aim. जो चल रही है,

    गाडी उसका नाम

    खर्च करेंगे हातसे , जो मिले दाम.

    कलका सोचा किसने

    आज मिला उसको पहचाने

    रोज रोजच्या जेवणांत फळे हवीत त्याला

    चटक मटक माल मसाला.

    रत्नागिरीचा आंबा आणि मोठे नागपूरी संत्र

    फळबाजारांत जाऊन उत्कृष्ट फळे

    आणण्याचे त्याचे तंत्र

    मी म्हणतो रेल्वेतून येतांना डब्यांत

    फळे विकणारे येतातच की.घ्यावी तीच फळे.

    पण ह्याला हवे नेहमी निराळे.

    क्वॉलिटीच्या गप्पा मारतो

    आणि पैसा उडवतो.

    अरे कांही तरी पोटांत जाण्यास कारण.

    कशाला खरा खर्च जादा.

    मिळेल थोडक्यांत तर समाधान सदा.

    रेशनचेही धान्य जगण्यास हमी देते

    परंतु त्याला बासमतीचे जेवण लागते.

    अन्नाचा म्हणे सुगंध हवा.

    मी म्हणतो ज्याला भूक

    त्याला सर्वच मेवा.

    अरे झोपेला धोंडा आणि जेवण्यासाठी कोंडा.

    परंतु त्याला पाहिजे मटन मच्छी आणि अंडा.

    त्याला हवा रंगीत टी. व्ही.

    आणि कंप्युटर आयपॅड नवा,

    चैनिच्या इलेक्ट्रॉनिक संचाचा ठेवा.

    झोपण्यासाठी हवी स्पंजची गादी

    आणि मऊ मऊ उशी.

    अरे आम्हाला तर सतरंजी पुरते कशी.

    १० x १२ ची झोपडी फडतूस काय ती

    पण सदा करतो त्यांत रंग रंगोटी.

    फुलांचे कुंडे काय आणि माशांचा टॅंक

    पडदे लाऊन ठेवतो चकाचक

    सगळाच खर्च करुन टाकला त्याने झोपडीत

    तर कसा काय ब्लॉक होईल ह्या जन्मात.

    मी म्हणतो आज कळ सोसून साधे रहा

    आणि उद्याच्या फ्लॅटची स्वप्ने पहा.

    चालला होता काळ हलके पावलांनी

    आणि कित्येक वर्षे गेली उलटूनी

    एका चांगल्या फ्लॅटमध्ये केली

    होती नांव नोंदणी.

    प्राव्हीडंट पंड आणि हाऊसिंग लोनच्या

    साह्याने केली अर्थ उभारणी

    दारावरची पाटी हसत आहे दिमाखाने

    सांगत होती इतिहास, कसे घडविले जीवन

    तारुण्य आणि प्रौढत्व प्लॅनिंग मध्ये खर्चिले.

    जीवनाचे आयुष्य बंदीवासांत घालविले.

    काटकसरीची ती चौकट मर्यादा

    टाकीत गेली. आयुषामधले रंग फिकट

    करीत गेली

    जीवनाचे उदिष्ट पहाडा एवढे केले

    साध्य करण्या तेच सारे आयुष्य खर्चिले.

    क्षीण झाली होती दृष्टी

    ब्लॉकची आकर्षकता टिपू शकत नव्हती.

    बधीर झालेले कान डोअर बेलचा आवाज

    ऐकण्यास सांगण्यास असमर्थ होते.

    दात आहेत तर चणे नाहीत

    ही झाली होती अवस्था

    पण सांगा कुणाला ही व्यथा.

    खर्चिले सारे आयुष्य ज्याचे साठी

    नकोसा वाटू लागला तोंच फ्लॅट

    आता वृद्धत्वाच्या काठी

    - - - आणि तो माझा शेजारी,

    आजही राहतो तसाच त्याच्या घरी.

    तीच टिप टॉप झोपडी, तीच रंगरंगोटी.

    सारे सारे तसेच, वयाची संपता साठी.

    नागपूरी संत्र आणि उत्कृष्ट फळे,

    बासमतीचा वास आजही दरवळे.

    तसाच बिनधास्त, तसाच बेफिकीर,

    हासत खेळत जीवनाचे रंग चाखणारा.

    अन् प्लॅन्ड, तरीही विचारी.

    त्याला ठाऊक होता तो वर्तमान काळ - - -

    एक सत्य, परंतु निश्चित.

    सदा बहरलेला व कधीही न संपणारा.

    मी मात्र चाचपडत राहिलो,

    भविष्य काळासाठी.

    जो अनिश्चित होता. कधीही न येणारा

    आणि व्यर्थ घालविला तो भूतकाळ

    पुन्हा कधीही न मिळणारा.

    दोन्ही काळांनी शिकवले

    भूत आणि भविष्य काळावर हात ठेव

    परंतु

    पाय मात्र सदैव वर्तमान काळातच राहू देत

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      June 9, 2016


  • जरा धीर ठेव

    ज्या ज्या वेळी धीर ठेवशी
    मिळेल कांहीतरी
    गडबड मनां होऊन जातां
    निराशाच पदरीं ।।१।।

    शांत चित्त आपुले
    तूं ठेव प्रत्येक समयी
    मिळेल यश पदरी तुझ्या
    खात्री याची घेई ।।२।।

    आत्मविकास तूं सोडूं नको
    आपल्या कामाचा
    मोबदला मिळेल तुजला
    योग्य प्रयत्नाचा ।।३।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      November 22, 2019