बरे सत्य बोला यथातथ्य चाला ।
बहू मानिती लोक येणे तुम्हाला ।।
धरा बुद्धी पोटी विवेके मुले हो ।
बरा गुण तो अंतरामाजी राहो ।1१।।
सदा दात घासोनि तोंडा धुवावे ।
कळाहीन घाणेरडे बा नसावे ।
सदा सर्वदा यत्न सांडू नये रे ।
बहुसाळ हा खेळ कामा नये रे ।।२॥।
दिसामाजी काही तरी ते लिहावे ।
प्रसंगी अखंडित वाचित जावे ।
गुणम्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे ।
बरे बोलणे सत्य जीवी धरावे ।।३ ।।
बहु खेळ खोटा सदालस्य खोटा ।
समस्तासि भांडेल तोचि करंटा ।
बहुतां जनालागी जीवी भजावे ।
भल्यासंगती न्याय तेथे रिझावे ।।४ ।।
प्रचितीविणे बोलणे व्यर्थ वाया ।
विवेकेविणे सर्वही दंभ झाला ।
बहु सज्जला नेटका साज केला ।
विचाराविणे सर्वही व्यर्थ गेला ।।५ ।।
भला रे भला बोलती ते करावे ।
बहुता जनांचे मुखे येश घ्यावे ।
परी शेवटी सर्व सोडोनि द्यावे ।
मरावे परी कीर्तिरुपे उसवे ।।६।।
June 11, 2026
बागेतील तारका –
May 20, 2013
शोभिवंत घर केले, आधुनिक बनलो मी,
विविध वस्तू संग्रहिले, शोभा देण्या आले कामी ।।१।।
शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी,
झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी ।।२।।
काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला,
रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यांनी प्रकाशिला ।।३।।
रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती,
नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती ।।४।।
खेळून भूक लागली, हा विचार मनी आला,
जीवंत किडे सोडले जली, खाण्यासाठी माशांना ।।५।।
शर्यत किडे माशांची, बघून वाटली गम्मत,
भक्ष्ये पकडूनी किड्यांची, मासे असती जिंकत ।।६।।
मनी निराशा आली अवचित, विचार येता ध्यानीं,
जीवन मरणाची ही शर्यत, जगे एक दुसऱ्यास मारुनी ।।७।।
परि निसर्गाची रीत निराळी, संधी देई जगण्याते,
बंदीत टाकूनी किडे सगळी, वंचित केले त्या संधीते ।।८।।
निराश होऊनी जातां, काढून घेतले माशांना,
जलाशांत सोडूनी देतां, आनंद झाला मनां ।।९।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 17, 2015
मराठी मना माझ्या नको अंत पाहू
पेटलेल्या युगी या नको मृत राहू ॥ धृ ॥
मराठी मना काय तुझी ही अवस्था
कशी अस्मितेची तुला ही अनास्था
मना-माझ्या मित्रा, ही कोणती रे निद्रा
जिवंतपणाला ही का आली सुस्तमुद्रा
मनोस्फुल्लिंगांना ही टाकतो मी ठिणगी
होण्यासाठी पुन्हा जिवंत, जाग पाहू ॥ १ ॥
कुणी आणावा राजा शिवाजी राणा
मराठी मनाचा ताठ बुलंदी कणा
तुम्हा का न स्मराव्या मराठी मर्दकहाण्या
का न आठवावा तुम्हा लोकमान्यांचा बाणा
आठवणींना उजाळा, का न स्फुरावेत बाहू ॥ २ ॥
कधी जीव जातो उसासून माझा
कधी जिजाई पुन्हा प्रसवेल शिवबा
तगमग जीवनाची भिडे काळजाला
आक्रंदे मन मी, किती वाट पाहू ॥ ३ ॥
मराठीस माझ्या न साहवे कोंडमारा
आवर्तनांची मनास सले वेदना ही
फुटावे काळीज उठावा धुमारा
पिसाटे मन, मी कसा मूक राहू ॥ ४ ॥
दुर्दैव; माते तुझी वेदना ही
तुझ्या अंतरीची, पूतां का न रुतावी
व्यर्थ जन्म त्यांचा क्षुद्र दुर्दैवी ते
कुठे न कळे कशी आग ही चेतवू ॥ ५ ॥
तुझ्यास्तव का न ते उरी फुटावे
तुझ्यास्तव का न मने बंडाने पेटावी
का न प्रतिज्ञा त्यांची रक्ताने सजावी
नको रे नको, असा निर्जीव होऊ
नको मराठी मना अस्मिता गहाण राखू ॥ ६ ॥
महद्भाग्य माझे, मातृभाषा ही माझी
फडकवीन ध्वजा अटकेपार जयाची
मराठी मना, घे हा तुझा पुढारी
उभारा हे बाहू, नका मागे राहू ॥ ७ ॥
-- यतीन सामंत
October 23, 2022
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 24, 2012
आत्म्याला ओढ असते
ईश्वराच्या मिलनाची
जाण सदैव राहते
प्रभुमय स्वरुपाची ।।१।।
अंशात्मक भाग असे
आत्मा हा परमात्म्याचा
उत्कंठ ते आकर्षण
गुणस्वभाव तो त्याचा ।।२।।
आत्म्यास पडले असे
बंधन ते शरीराचे
जीवन कार्ये करुनी
प्रयत्न करी मुक्तीचे ।।३।।
मुक्त होई त्या क्षणीं
अनंतात समावतो
परमेश्वरि रुपांत
विलीन होऊन जातो ।।४।।
आत्मा मुक्त होत असे
देहकर्म फळावर
चांगले कर्म नसता
नविन देह घेणार ।।५।।
दोन प्रकारांनी आत्मा
प्रभू समर्पण होतो
देह मृत वा सजीव
असतांना हे साधतो ।।६।।
ध्यान साधना करणारे
उतरती समाधीत
त्याच क्षणी शरिराला
आत्मा असे सोडीत ।।७।।
देह सोडूनी भुवरी
आत्मा येई बाहेरी
क्षणिक काळा करितां
मिलन होई ईश्वरी ।।८।।
समाधी असे साधन
प्रभू मिलन होण्याचे
देह समाधीत जाणें
सार असते जिवनाचे ।।९।।
जिवंतपणीच तुम्हीं
प्रभूमय होत असे
आनंदी नितांत क्षण
खराखुरा तोच असे ।।१०।।
आत्म चिंतन करुनी
आत्म ज्ञान प्राप्त होई
तोच ईश्वर असूनी
दुजा ठिकाणीं तो नाहीं ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 9, 2015
गळे अवसान सारे
फुटे कणसाला तुरे
चुलीत घाला तुमचे
वांझ दौऱ्यावर दौरे!
कापसाच्या होई वाती
विम्याचं रिकामे पोते
निवडून दिलेले घोडं
कंपन्याची पेंड खाते !
खतात लूट,बियांत लूट
आडत्याचीही दलाली
खरेदीखताला बघा
महागाई लावी लाली !
कोपतो प्रत्येक ऋतू
तशी काळी अवकाळी
पीठ मीठ भाकरीचं
शिक्षण धरी काजळी!
बनिया येती घरा तेव्हा
बटनी मतदान करा
निवडून गेले आता
शेतकरी फासाने मारा!
-- विठ्ठल जाधव
संपर्क: ९४२१४४२९९५
शिरूरकासार, जि.बीड
November 22, 2021
ठेवावं लांब लोका , भविष्य सांगणाऱ्या
बाळास माहिती द्या , आताच रांगणाऱ्या /
गलका कसा बरे हा ? भवताल भाटगाने
हलकेच नजर ठेवा ,लोकांस पांगणाऱ्या /
आणील आसमंता ,ठेवील या कराशी
तोडाच त्या कराला ,भिकेस मागणाऱ्या /
सारेच आनंदी वातावरण भोवताली
शोधाच कोण आहे , बाम्बस टांगणाऱ्या /
गझलेत 'कौशला ' म्हणे हा मक्ताच झाला
नाहीच आवडली ,डांबास डागणाऱ्या
-- श्रीकांत पेटकर
February 25, 2019
विचारांची उठती वादळे ।
अशांत होते चित्त सदा ।।
आवर घालण्या चंचल मना ।
अपयशी झालो अनेकदां ।।
विषण्णतेच्या स्थितीमध्यें ।
नदीकांठच्या किनारीं गेलो ।।
वटवृक्षाचे छायेखाली ।
चौरस आसनावरी बसलो ।।
डोळे मिटूनी शांत बसतां ।
अवचित घटना घडली ।।
विचारांतले दुःख जाऊनी ।
आनंदी भावना येऊं लागली ।।
एक साधूजन ध्यान लावीत ।
बसत होता त्या आसनावरी ।।
पावित्र्याची वलये फिरती ।
आसन दिसले रिकामें जरी ।।
वातावरणाची ही किमया ।
अनुभवते प्रखरतेनें ।।
शुद्ध अशुद्ध विचार येती ।
सभोवतालच्या जाणिवेने ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 6, 2020
November 28, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti