(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • यश येईल मागे मागे

    नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे ।

    येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे ।। १

    निराशूनी जावू नकोस रागें रागें ।

    हिंमत बांधूनी जावेस आगे आगे ।। २

    विणाविस यशाची शाल धागे धागे ।

    सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे ।। ३

    सतत रहावे जीवनी जागे जागे ।

    तेव्हाच यश येत असते भागे भागे ।। ४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      August 7, 2020


  • शारीरिक जखम बरी होते

    शारीरिक जखम बरी होते
    पण मनाचं दुखणं गहिर असतं
    भावना खेळणं सहज होतं
    पण मनाचं तुटण जिव्हारी घडतं..
    मनातल सगळंच बोलता आलं असत
    तर मोकळं आभाळ भरलं नसतं
    सगळंच जर हृदयातलं कळलं असतं
    तर मनालाही रडावं वाटलं नसतं..
    भावनेत ओलं हळवं होणं
    सहज अलवार होत असतं
    मनाच्या तारा छेडल्या हलकेच
    तर दुःख सहज मोकळं होतं..
    कुणी खूप छान कुणी दुःखी
    कुणी मस्त कुणी कष्टी
    हेच तर आयुष्यात माणसांचं
    राहणं मग कळतं असतं..
    वेदना देतात मनाला शब्द
    तरी शब्दांचं बोलणं चालू असत
    कवितेच्या प्रेमात भावना रडल्या
    काव्य शब्दांनी अलवार रडवून नेलं..
    मनाच्या तळात साचलं निर्माल्य
    कोणी भावना त्यात मोडून गेलं
    माणसांना माणसं नकोशी आता
    हेच सगळीकडे अंतिम सत्य दिसतं..
    प्राजक्त मोहरते अलवार पहाटे
    चाफ्याला तिचा न गंध कळतो
    नाजूक तिच्या अंतरीचा गंध
    मनात हलकेच मिटून जातो..

    -- स्वाती ठोंबरे.

      December 3, 2021


  • माणसात भेटला

    दगडात देव, माणसात भेटला
    नाशवंत देह, आत्मा कुणी पाहिला ---(!)
    सत्कर्म जगतचं राहते
    तस्विरी टांगल्या भिंतीवर
    नर्क काय अन स्वर्ग काय?
    ठायी माणूस भूलोकी
    आस वैकुंठाची
    गिनती कशाला पाप पुण्याची
    आयुष्य पुरे कर्माचे भोग भोगायला
    दोर तुटता आयुष्याची
    तडपला आत्मा, देहा वाचुनी
    दगडात देव, माणसात भेटला
    आत्मा अमर, देह मातीत मिसळला ---(!!)
    वारीत शोधती हरी
    सावळ्या विठू -रुक्मिणी परी
    आई बाप घरी
    पंढरीचा पांडुरंग, चंद्रभागी तीरी
    राहुटी राहूळी
    कधी बांधावर पाहिला
    भजनात ऐकला
    कणाकणात वसला
    भगवी पताका खांद्यावर
    वारीचा वारकरी दिसला
    दगडात देव, माणसात भेटला
    देही मानवी, देवपण अवतरला ---(!!!)

      December 14, 2019


  • माझ्या चारोळ्या

      November 19, 2022


  • देहातील शक्ती

    नासिकेसमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा,

    थंड हवा आंत जाते, गरम होऊन बाहेर येते ।।१।।

    अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून,

    आत्म्यापरि फुगते छाती, हवा आंत खेचूनी घेती ।।२।।

    आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते,

    भावना जेंव्हा जागृत होती, रोम रोम ते पुलकित होती ।।३।।

    अवयवे सारी स्फुरुन जाती, देहामधूनी वीजा चमकती,

    धनको ऋणको विद्युतसाठे, अलग अलग दिसती मोठे ।।४।।

    विजातीय लिंग येतां जवळी, परिणाम दिसे विजेचा त्यावेळी,

    प्रकाश आहे आपल्या देही, ज्ञानीजन तो सहज पाही ।।५।।

    स्थीर करुन चंचल मना, प्रकाश दिसेल ह्रदयी सर्वांना,

    उष्णता वीज प्रकाश शक्ती, हींच ईश्वरी रुपें असती ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      May 12, 2016


  • कर्ममुक्ती

    न राही तुमचे ते कर्म,
    ज्यात प्रभू इच्छा अंतीम....१,
    प्रत्येक घटनेचे अंग,
    त्यात मुख्य ईश्वरी भाग....२
    तुमच्या मार्फतच होई
    त्याचा इशारा कोण पाही....३,
    सर्व समजे मीच केले
    अहंकाराने मन भरले....४,
    षडरिपू असे साधन
    खेळविता यावे म्हणून...५,
    राग,लोभ, मोह मायादी
    ठेवती वाटते आनंदी....६,
    परि याच्याच शक्तीने
    प्रभू खेळ चाले युक्तीने....७,
    षडरिपू सारे टाळून
    मुक्ती मिळेल खेळातून.....८
    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 9, 2018


  • घराचं स्वप्नं साकारताना…..

    आपल्या घराचं स्वरूप आणि रूप आपल्या अंतर्मनांचा आरसा असतो. आपल्या निवडलेल्या घरामुळे आपलं व्यक्तिमत्व देखील खुलून येत असतं. सौदर्याचा साक्षात्कार केवळ घरातच होतो असं नाही, तर अंतर्मनातही होत असतो. त्यासाठी घराची निवड करताना वरील सर्वच बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करणं जरुरीचं असतं.

      February 3, 2022


  • ईश्वरी इच्छेनेच

    वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन ।
    घटना घडल्या जीवनामध्यें, राही त्यांची आठवण ।।

    चालत असतां पाऊल वाट, जीवन रेषे वरची ।
    स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा, भावी आयुष्याची ।।

    परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें, पुरता गुरफटलो ।
    फिरणाऱ्या त्या वर्तुळातूनी, बाहेर येवूं न शकलो ।।

    कल्पिले होते नियतीनें, तेच घडविले तिनें ।
    भंग पावले स्वप्नचि सारे, तिच्याच लहरीनें ।।

    असेच घडते जीवनीं सदा, अघटीत-अवचित ।
    समजूनी त्यासी ईश्वरी इच्छा, स्वीकारी आनंदात ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 13, 2017


  • जखमी होऊन पिल्लू पडले

    जखमी होऊन पिल्लू पडले, घायाळ, केविलवाणे, करुण आवाजी साद घाले,
    आईस बोलावे सारखे,

    पक्षीण भोवती घिरट्या घाले, चोचीने त्यास गोंजारी,
    कळेना तिला काय जाहले,
    कसे पडले ते खाली ,--?

    करूण साद ती ऐकून कोणी,
    धावत आला दयावंत,
    अती गरीब असूनही,
    पक्षिणीस भासे देवदूत,

    हळुवार हाते पिल्लाला,
    जवळ घेऊन कुरवाळी,
    साशंक मनाने पक्षीण मात्र,
    सारखी हिंडे भोवताली,

    नाजुकशा स्पर्शाने जाणवे,
    ‌इवल्या पिल्लाच्या शरीरी,
    दिसे,-- कांटा रुतलेला,
    बघून कोवळ्या पिल्लाला,
    त्यांतील होई देव जागा,--!!

    पिल्लू सारखे वेदनेने,
    तडफडून रडत असे,
    पक्षीण घायाळ जखमेवाचून,
    तो असहाय्य जीव असे,--!!!

    प्राण तिच्या डोळ्यात सारे,
    डोळ्यातूनच बोलत असे,
    येई कींव दयावंता,
    बाजूस करे तो काटा,
    वर लावी औषध त्याला,
    विचार केवढा मोठा,--!!!

    घेऊन जाई घरी पिलास,
    पक्षीण येत असे पाठी,
    पिल्लू ठेवले कापसात,
    उपचार करण्यासाठी,

    पक्षीण येई रोज तेथे,
    करत मुक्त संचार,--!!!
    घास पिल्लाला भरवे ,
    आता भरोसा तिला फार,

    खूप काळ मध्ये जाई,
    पिल्लू तिथल्या तिथे हिंडे,
    आईस बघून तेवढे ,
    उडण्यास सज्ज होई,--!!!

    एक दिवस आला असा,
    पिल्लू घरातल्या घरात उडे,
    पक्षीण घेऊन जाई त्याला, मानवतेचे देणे केवढे,--!!!

    © हिमगौरी कर्वे.

      March 4, 2020


  • १२ – गणराया, आनंदाचें धाम

    हे गणराया, गौरीतनया, आनंदाचें धाम

    हे लंबोदर, करुणाकर, माझा स्वीकरी प्रणाम ।।

    संपते न वाट, होई न पहाट ; मज जाणें पैलथडी

    आलोक तूंच, तम रोख तूंच, मम ज्ञानचक्षु उघडी

    मिळतात सुखें, मिटती दु:खें, घेतांच तुझें शुभनाम ।।

    आदि ना अंत तुज, एकदंत, तूं विश्वाची शक्ती

    नाशतोस खल, तूं सुजनां देतोस सकल, मुक्ती

    स्वानंऽद हे, आनंऽद दे, चरणीं करुं दे मुक्काम ।।

    - - -

    - सुभाष स. नाईक

      August 23, 2017