(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नाते

    तुझे नी माझे कसले नाते
    अजून मला ते कळले नाही
    एकदा तरी तुज पाहिल्यावीना
    मजला काही करमत नाही ।
    ऊजाडताच दिवस नवीन
    रोज नव्याने तुला पाहतो
    रम्य त्या गत आठवणीने
    का पुन्हा रोमांचित होतो ।
    आता तरी तू सांग मजला
    काय आहे आपुले नाते
    का आजही तव आठवणीने
    मन माझे ग मोहीत होते ।

    सुरेश काळे
    मो. 9860307752
    सातारा.
    दि. ३ आक्टोंबर २०१८

      October 5, 2018


  • कुठून आलो, कुठे निघालो

    कुठून आलो, कुठे निघालो,--
    कळिकाळाचे पांथस्थ,--
    मार्ग दिसो न उमजो,
    राहावे लागे तटस्थ,--!!!

    जन्मप्रसंगी बाळाच्या,
    आईला होती प्रसववेदना,
    कोणास ठाऊक म्हणे त्या,
    कोणाच्यातरी मरणयातना,---!!! सुखाच्या लागता मागे,
    मोहमयी खेळ चाले,
    ठरती बघतां बघतां ते,
    मायेचे किमयागार सारे,---!!!

    आभास दिसती सुखाचे,
    जो तो त्यासाठी तडफडे,
    हव्यास ठेवून असे,
    पदरात शेवटी काय पडे,---!!!

    सौंदर्य पाहुनी वरवरचे,
    जो तो त्यास भुले,--!!!
    अंतराचे नाते कसले,
    हे तर आकर्षण देहाचे,---!!!

    सत्ता पैसा प्रतिष्ठेमागे,
    प्रत्येक जण कसा धावे,
    असे धावून धावून सारखे,
    देहालाही ठेवायचे मागे,---!!!

    हिमगौरी कर्वे.©

      February 16, 2019


  • संशयाचे भूत

    हे भूत संशयाचे छळते कसे मनाला ।

    करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला ।।

    एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे ।

    डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते ।।

    गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा ।

    कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा ।।

    येता मनी संशय आपलाच ज्या घडीला ।

    शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 19, 2020


  • प्रभू दर्शन

    महिमा कसा प्रभू तुझा आगळा,

    पावन करसी तूं भक्ताला,

    नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला ।।धृ।।

    पुंडलीकाची महान भक्ती,

    माता पित्याचे चरणी होती,

    त्याची सेवा तुजसी खेचती,

    कसा उकलू मी ह्या कोड्याला, ।।१।।

    नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला

    पातिव्रत्य हे दैवत समजूनी,

    पतिसेवेला घेई वाहुनी,

    सावित्रीने दिले दाखवूनी,

    प्रभू वाकती सती शब्दाला, ।।२।।

    नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला

    कांहीं करीती सेवा गुरुची,

    मानव सेवा हीच कुणाची,

    शक्ती वाढवूनी सत्कर्माची,

    पात्र ठरती प्रभू दर्शनाला, ।।३।।

    नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 26, 2020


  • सांज रेंगाळलेली

    असा एकटाच
    जीव श्रमलेलेला
    असह्य वेदनां
    श्वास कोंडलेला
    अंतरी कोलाहल
    अश्रु ओघळलेला
    उद्वेग भावनांचा
    विचार बावरलेला
    मन दिशाहीन
    आव्हान विवेकाला
    कसे सावरावे
    अशांत मनाला
    भौतिक सुखाचीच
    आसक्ती जीवाला
    निर्मळ सुखसौख्यदा
    त्यजीता षडरिपुला
    सांज रेंगाळलेली
    माहोल गहिवरलेला
    अंती लोचनी
    सारा गोतावळा....

    --वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १९९

    १४/८/२०२२

      September 16, 2022


  • ध्यास पाऊलांना

    चिरंजीवी स्मरण तुझे

      July 8, 2021


  • दुजातील ईश्वर

    दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर ।
    ‘अहंब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार ।।

    देह समजून मंदिर कुणी, आत्मा समजे देव ।
    त्या आत्म्याचे ठायी वाहती, मनीचे प्रेमळ भाव ।।

    आम्हा दिसे देह मंदिर, दिसून येईना गाभारा ।
    ज्या देहाची जाणीव अविरत, फुलवी तेथे मन पिसारा ।।

    लक्ष केंद्रीतो देहा करीता, स्वार्थ दिसे मग पदोपदी ।
    विसरून जातो सहजपणे, अंतर्मनातील देव कधी ।।

    माझ्यातील देवही विसरणे, स्वभाव असेल जर माझा ।
    कशी दिसेल दुजामधली, मग ती ईश्वरी ऊर्जा ।।

    जाणून घे तू अस्तित्व त्याचे, सर्व जीवांच्या अंतर्यामी ।
    म्हणशील त्याला ईश्वर तू , अन् ईश्वर आहे मी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      July 30, 2019


  • भक्तांसाठी कष्ट भोगतो श्रीहरी

    युगानू युगें उभा राही, एका विटेवरी
    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी ।।धृ।।

    आई वडिलांची सेवा
    पुंडलीक भक्तीचा ठेवा
    भक्तित होई तल्लीन
    जगास गेला विसरुन
    उभा करुनी तुजला, गेला निघूनी चंद्रभागेतीरी ।।१।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
    विषाचा पेला
    मीरेनें प्राशन केला
    भजनांत गेली दंग होऊनी
    पचविले विष तूं घेऊनी
    दुधामधले विष शोषूनी, दाह त्याचा सहन करी ।।२।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
    भक्तीत गुंगली राधा
    तुमचा होता ध्यास सदा
    कष्ट पडता संसारी
    विसरुन गेली ती सारी
    झेललेस तूंच ते वार पडले तिच्या पाठीवरीं ।।३।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
    राहीला नाथाघरीं
    आनंदाने पाणी भरी
    श्रीखंड्या समजे तुजला
    कुणी न जाणी भक्तीला
    सुगंधी चंदन घासूनी, सेवा नाथाची करी ।।४।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
    सखूसाठीं धावला
    देह झिझविला
    निवडणे केले, कांडणे केले
    राशीभर धान्य दळले
    उभा राहूनी पाठीं, सखूचे कामी मदत करी ।।५।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 6, 2016


  • मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी

    मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे
    खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।।

    लुटालूट करुनी देह वाढविला
    राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।।

    प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला
    वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला ।।३।।

    वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत
    धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत ।।४।।

    वाईट घटना घडते त्यास भोग म्हणावे
    उद्धरुनी त्यांत जाणे ह्यास योग समजावे ।।५।।

    जर होत असेल माझा वाल्मिकी ऋषि
    मान्य मजला सजा जी प्रभूं तूं देशी ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmai.com

      January 25, 2019


  • खोटा शिक्का

    कसे आले कुणास ठाऊक नाणे माझे हाती
    गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी खोटा शिक्का येती
    प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी कुणी घेईना त्यातें
    कसा आला नशिबी निराशा मनी येते
    अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी तिकीट एक घेतले
    लॉटरीसाठी घातला रुपया अंधाचे हाती दिले
    मनी चरकलो शब्द ऐकूनी त्या अंध व्यक्तीचे
    नशीब तुमचे थोर असूनी यश येईल तिकीटाचे
    केवळ त्याने स्पर्श करुनी जाणले माझे नशिब
    भाग्यवान ठरवूनी सांगे मिळेल धनलाभ
    खोटा शिक्का घेऊन देखील शब्द बोलला प्रेमाने
    नीच मनाचा असून मी पचविले ते हसण्याने
    टिपून ठेवला नंबर त्याचा एका कागदावरी
    कोटाच्या खिशांत ठेवले तिकीट जपून भारी
    निकाल वाचूनी नाचू लागतो आनंदाने पुरता
    लाखाचे ते बक्षिस लागूनी लाखोपती बनता
    धावत गेलो ऑफिसातूनी तिकीट घेण्या घरी
    कोट नव्हता दिसत तेथे रोजच्या जागेवरी
    इतर कपड्यामध्ये टाकला धूण्या परीटाकडे
    धावत सुटलो नदीवरती शोधण्या तो तिकडे
    सुकवलेल्या कपड्यातूनी कोट काढला
    तुकडे बघूनी त्या तिकीटाचे मुर्च्छा आली मला
    खरय़ा शिक्क्यासम चालले नशिबही वेगाने
    खोटेपणाची जाण येता थांबून गेले त्वरेने

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 30, 2016