(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आधुनिकता

    नवलाईचे विश्व सारे, नवलाईतच जगते
    आगळ्याच्या शोधामध्यें, नव-नवीन इच्छीते

    ताजे वाटते आज जें, शिळे होई उद्यांच ते
    प्रवाही असूनी जीवन, बदल घडवीत जाते

    मुल्यमापन बदलांचे, संस्कारावरी अवलंबूनी
    परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें, विचार फिरे क्षणोंक्षणीं

    मुळतत्व ते राही कायम, आकार घेई जसा विचार
    ताजा शिळा भाव मग तो, ठरविला जाई वेळेनुसार

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      August 24, 2015


  • दारूबंदी शब्द ऐकुनी भिऊ लागली दारू

    प्रदीप निफाडकरांची गझल

      April 17, 2010


  • देवत्व

    एकदा त्याला वाटले, आज जाऊन पहावे त्याच्याकडे
    पहावे त्याला समजते का,
    की का पाऊले वळली तिकडे?

    थेट 'त्या'च्या समोर गेला 'बघ कळतंय का तुला !'
    आव्हानाची भाषा ऐकून,
    'तो' फक्त मनोमन हसला

    'त्याने' चक्क विचारले, 'सुखी आहेस ना बाळा ?'
    आश्चर्य वाटून याला वाटले,
    'त्याला' आला आपला कळवळा

    'काय सांगू देवा तुला.....' सर्व दुःख त्याने मोकळे केले
    अगदी ढसाढसा रडल्यावरच
    चरण त्याचे सोडले

    नजर चेहऱ्याकडे, मग सर्व देहाकडे वळली
    आताची 'सजीव मूर्ती' दगड कशी झाली?

    इतक्यात आकाशवाणी झाली....
    'मी समोर असतांनाही
    तुम्ही दुःखाचेच पाढे वाचता
    आता तरी दुःख विसरावित
    हेच कसं विसरता ?
    विश्वास नसतो माझ्यावर
    की, उगाचच दुःखाचा बाऊ करुन
    का मलाच दोष देत बसता ?
    अरे असं गाऱ्हाणे गाऊन कधी,
    कोणत्या परीक्षेत पास होता येतं का ?
    कष्ट केल्याशिवाय, यश चाखता येतं का ?
    भ्याडासारखे आत्महत्या करता

    खऱ्या परीक्षेतच, सहज हार पत्करता
    मीच दिलेल्या आयुष्याची
    क्षणात माती करुन टाकता
    म्हणूनच मी दगड होणे पसंत करतो
    पुन्हा एक संधी नव्याने देऊ पाहतो
    पहा तिचे सोने करता येते का ?
    आयुष्याचे मोल ओळखता येते का ?
    तो तडक उठला, अश्रु कधीच थांबले होते
    त्याचं देवत्व मानून
    त्याने आत्मविश्वासाने लढायचे ठरवले होते.

    सौ. मृणाल महागांवकर, महाड

      May 17, 2024


  • गोकुळीच्या आम्ही गोपिका

    गोकुळीच्या आम्ही गोपिका,
    निघालो विकण्या दूध, लोण्या कितीदा विनवावे तुज श्रीरंगा, उशीर होई मथुरेच्या बाजारां,--!!

    करून सगळी आवरां -आवरी, निघालो आम्ही सगळ्या सत्वरी कामे सारी भराभरा आटोपुनी, डोईवर घेऊनी भरलेला घडा,--!!

    ठुमक ठुमक चालीची
    नक्कल करीत थांबशी, ‌‌ उगी आम्हां विलंब करीशी काय केला आम्ही गुन्हा,-!!

    नको नको रे मारुस खडा,
    ओघळ दह्यादुधाचे पहा, दंगेखोर किती तुमचा जथा,
    मिळून घालता ना डांका--!

    गोंडस तव रूपाला देखण्या,
    नुसते आम्ही बघत राहतां,
    अल्लद हे घडेही पळवतां, नवनीत सारेफस्त करतां, सांगा काय समजवावे तुम्हां,
    दया कर आम्हांवर कान्हा,-!

    भांडू कातुझ्याश गोविंदा* पाहता तुला,कासाविशीजीवां
    सोड, वाट मनमोहना ,
    कसे सांगावे नंद -यशोदा,--!

    हिमगौरी कर्वे.©

      May 31, 2019


  • वेळेचे मूल्य

    मूल्य नाही कुणा,
    तूं दिल्या वेळेचे,
    गमावून टाकी,
    जाणूनी फुकाचे ।।१।।

    लागत नसते,
    दाम वेळेसाठीं,
    म्हणून दवडे,
    अकारणा पोटीं ।।२।।

    वस्तूचे मूल्य ते,
    पैशांनीच ठरते,
    परी वेळेची किंमत,
    कुणा न समजते ।।३।।

    वेडे आहोत सारे,
    कसे होई मूल्य
    वेळ जातां मग,
    आयुष्य जाईल ।।४।।

    आयुष्य खर्चणे,
    हेच वेळेचे मुल्य ठरते,
    जीवनांतील यश,
    त्यावरुन कळते ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 17, 2015


  • भक्तांसाठी कष्ट भोगतो श्रीहरी

    युगानू युगें उभा राही, एका विटेवरी

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी ।।धृ।।

    आई वडिलांची सेवा

    पुंडलीक भक्तीचा ठेवा

    भक्तित होई तल्लीन

    जगास गेला विसरुन

    उभा करुनी तुजला, गेला निघूनी चंद्रभागेतीरी ।।१।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी

    विषाचा पेला

    मीरेनें प्राशन केला

    भजनांत गेली दंग होऊनी

    पचविले विष तूं घेऊनी

    दुधामधले विष शोषूनी, दाह त्याचा सहन करी ।।२।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी

    भक्तीत गुंगली राधा

    तुमचा होता ध्यास सदा

    कष्ट पडता संसारी

    विसरुन गेली ती सारी

    झेललेस तूंच ते वार पडले तिच्या पाठीवरीं ।।३।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी

    राहीला नाथाघरीं

    आनंदाने पाणी भरी

    श्रीखंड्या समजे तुजला

    कुणी न जाणी भक्तीला

    सुगंधी चंदन घासूनी, सेवा नाथाची करी ।।४।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी

    सखूसाठीं धावला

    देह झिझविला

    निवडणे केले, कांडणे केले

    राशीभर धान्य दळले

    उभा राहूनी पाठीं, सखूचे कामी मदत करी ।।५।।

    कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      June 30, 2020


  • जीवन एक “जाते”

    जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा ।

    दोन चाकांत येईल, मोडेल त्याचा कणा ।।

    जीवन मृत्यूची चाके, सतत फिरत राही ।

    येई जो मध्ये त्याच्या, मागे न उरेल काही ।।

    मध्यभागी राही स्थिर, आंस त्यास म्हणती ।

    वरचे चाक फिरे, त्याच्या भोवती ।।

    आंसाजवळील दाणा, दूर तो चाकापासूनी ।

    परिणाम चाकाचा तो होईल, मग कोठूनी ।।

    जन्म मृत्यूची चाके, ईश्वर हा फिरवतो ।

    जवळीक त्याची मिळता, दु:खातून मुक्त होतो ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      December 13, 2016


  • मित्रराज उगवताना

    मित्रराज उगवताना,
    सृष्टीवर घडे करामत,
    आभाळ उतरे जळात,
    त्याचे रूप दिसे पाण्यात,

    आरस्पानी निळे सौंदर्य,
    नजरा खिळवून ठेवी,
    हलते डोलते आभाळ,
    पाण्यात प्रतिबिंबित होई,

    वृक्षांचे समूह किती,
    धरतीवर कोण पेरती,
    निळाईत उठून दिसती, पहा,हिरवाईने नटती ,--!!

    तमाची शामत नसे, हळूहळू तो नाहीसा होई,
    प्रकाशाचे किरण घेऊनी,
    दिनकराचा प्रवेश होई,-!

    अंधारी बुडालेली सृष्टी,
    रंग तिचा बदलून जाई,
    कडेकडेने सोनेरी सोनेरी,
    पिवळसर उजेडाची घाई-!!

    प्रकाशाचा रांजण भरुनी,
    सूर्यराज दिमाखात येई,
    तांबड्या सोनसळी किरणांची,
    आता भाऊगर्दी होई,-!!

    डोंगर आपल्या डुलक्या सोडुनी,
    हात जोडुनी उभे राहती,
    सूर्यसम्राटाचे स्वागत करण्यां,
    भालदार चोपदार खडे होती,--!!!

    भास्कर जसा उगवतसे,,-
    पिवळसर प्रकाश सांडी, धरणीवरचे किरण ते,
    करत, दिवसाची नांदी ---!!!

    ©️ हिमगौरी कर्वे.

      March 30, 2020


  • गतकाळ विसर

    विसरून जा भूतकाळ तो,

    नजर ठेवूनी भविष्यावरी,

    वर्तमानी राहून प्रवाही,

    जीवन सारे यशस्वी करी ।।१।।

    व्यर्थ होतील प्रयत्न तुझे,

    उगाळता गत आठवणी,

    खीळ पडेल उत्साहाते,

    अपयश आले हे जाणूनी ।।२।।

    ज्ञान जगाचे मिळूनी तुला,

    जन्म जहाला आजच खरा,

    अनुभवी नव बालक तूं,

    वाहून नेई जीवन धुरा ।।३।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      March 25, 2016


  • चैतन्यात्मा

    नयनमनोहर सृष्टी वैभव
    निरवताच ही शांत सुंदर

    जीव! जिथे जातो गुंतुन
    ओघळतो, लोचनी ईश्वर

    सभोवताली रम्य परिसर
    साक्षी गगन सरीतासागर

    लोभस अलौकिक नजारा
    हृदयी सुखद अमृती पाझर

    अगम्य हा ब्रह्मांड रचियता
    चैतन्यात्मा चराचरी निरंतर

    वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ९५.

    २७ - ३ - २०२२.

      April 6, 2022