रंगला अभंगी, संतसखा पांडुरंग
वाळवंटी वैकुंठीचा राणा पांडुरंग ।।धृ।।
आले ज्ञानोबा, आले हो तुकोबा
घेऊनी दिंडीसंगे सकल संतजना
नाचतो आसमंती , विठ्ठल पांडुरंग ।।१।।
बोलती टाळ मृदंग अन दिंड्यापताका
वैष्णवांच्या पाऊली, नाचे विठू सावळा
मुक्तीच्या सागरी, ब्रह्मरूप पांडुरंग ।।२।।
उरले न आता इथे कुठे, द्वैत, अद्वैत
एका जनार्दनी, जाहले सारे एकरूप
श्वास नि:श्वासाचा धनी, एक पांडुरंग ।।३।।
वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ७६.
१५ - ६ - २०२१.
June 26, 2021
सौख्य, समृद्धीच्या पंखाखाली
जरी निश्चिंती, मी सदैव जगलो...
तरीही अव्यक्त हुरहुर अनामिक
स्मरणगंध सारे उसवित राहिलो...
उसवीणे ते, आनंदी आत्मरंगले
धागे सारे शब्दात गुंफित राहिलो...
प्रीतभावनांचे पदर ते दवभरलेले
गीतात, नित्य आळवित राहिलो...
तरीही अजुनही हुरहुर अनामिक
आत्मारामा अंतरी शोधित राहिलो...
हुरहुर जरी ती, तरीही शांती सुंदर
मनास माझ्या समजावित राहिलो...
साक्षी, उभी अंगणी प्रसन्न बकुळी
तीलाच स्मरत मी गंधाळत राहिलो...
--वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. १८५
२/८/२०२२
September 3, 2022
पाठ राख घन:शामा,मी तर तुझी प्रियतमा,--||१||
साथीने तुझ्या गोकुळ सोडले,
अनया सोडून तुज वरले,
संसार सारा मोडून आले,
पोहोचले आता निजधामां,||२||
प्रीती भक्तीने झपाटले,
माझ्यात मी नच राहिले,
कृष्णा तुज सर्वस्व वाहिले, लौकिकाची केली न तमा,-||३||
अलौकिक नाते आपले,
एकरूप दोन जीव जाहले,
तनामनांचे धागे जुळले,
कृतार्थ होताना अशा संगमा,-||४||
ढगही सारे भोवती जमले, आजूबाजूस फुलली कमळे,
रंग गुलाबी त्यावर चढले,
यमुना उधाणली पाहून चंद्रमा,-||५||
मंजुळ स्वर बासरीतले,
ऐकून जीव तृप्त जाहले,
अस्तित्व माझे सारे निमाले, आठवले जेव्हा त्या समागमा,-||६||
कृष्ण कृष्ण नाम ओठातले,
नाद करत ध्वनी आत्म्यातले, इहलोकातही पुरते गुंजले,
अजरामर करत कृष्ण प्रेमा,-||७||
© हिमगौरी कर्वे
February 8, 2020
November 7, 2021
राज्यातील सर्व गृहनिर्माण संस्थांचे प्रतिवर्ष लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे. तरीही अनेक गृहनिर्माण संस्था लेखापरीक्षण करण्यास टाळाटाळ करतात. ३१ जुलै आधी संस्थेचे पदाधिकारी यांनी गृहनिर्माण संस्थेचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. सदर पूर्तता करण्यात निष्काळजीपणा केल्यास अन्यथा ठोस कारण नसल्यास संस्थेचे नोंदणी सुद्धा रद्द होऊ शकते. तसेच लेखापरीक्षण झालेल्या संस्थांनी, दुरुस्त अहवाल ३ महिन्यात दोष पूर्तता करून वैधानिक लेखापारीक्षाकाकडे न पाठविल्यास तसेच लेखापरीक्षण अहवाल सहकार विभागाच्या वेबसाईटवर न टाकल्यास कलम १४६, १४७ आणि १४८ अन्वये कारवाई करण्याची तरतूद अधिनियमात दिली आहे.
August 22, 2021
तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
माझ्या मेंदूला कंप सुटतात
हृदयात वेदना रोज होतात...
तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
माझे डोळे अश्रूंनी ओलावतात
माझी स्वप्ने सारी भंगतात...
तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
माझे दिवस वाया जातात
माझे विचार स्वैर होतात...
तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
माझ्या क्षणांचे तास होतात
माझ्या जगण्याचे बारा वाजतात
कवी - निलेश बामणे ( एन. डी.)
June 2, 2017
चंद्रा तुझे रूप कसे रे, गोंडसवाने छान
टक लावूनी बघता, हरपूनी जाते भान
मधूर शुभ्र नभी चंद्र तो, जणू चांदीची थाली
अगणीत वाट्या विखूरलेल्या, दिसे भोवताली
टपोर चांदणे वाहूनी जाते, त्या थाली मधूनी
स्वाद लूटता धुंद होतो, घेता ते झेलूनी
रिक्त होते एक वाटी ती, भरूनी जाई दुजी
प्राशन करिता सीमा नसे मग, आनंदा माजी
अतृप्त सदा मन तरीही, त्या चांदण्यापाई
आतूरतेने दुजा रात्रीची, सतत वाट पाही
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 5, 2020
-- स्वाती ठोंबरे.
November 27, 2021
पहाटे जाग येते तेव्हा
खिडकीतून चंद्रप्रकाश
अंगभर पसरलेला असतो
जणू आईच्या मायेची
अंगभर चादर पसरतो
शीतल शांत निराकार
आईची कुशी उबदार
जावेसे वाटते फार चंद्रा
तिच्या मायेच्या मांडीवर
चंद्रा तुझ्या शितल
चांदण्याचा स्पर्श
जणू मायेने तोंडावर
फिरतोय आईचा हस्त
आहे ना रे आई माझी
तुझ्या संगे देवापाशी?
तिच्या मायेचा हात
असेच येऊ दे तुझ्या किरणात!
-- विनायक अत्रे.
July 15, 2022
या वाट वाटणीसाठी
घालती बापाचे वाटे
असे कोणते ठेवले
पुरून धनाचे साठे?
राख भरती डोक्यात
कुणी फुकती कानात
भाऊ भावाचा वैरी रे
असं औषध क्षणात
जमिन तुकड्यापायी
माणूस विसरे धर्म
एका आईची लेकरं
कसे करती कुकर्म
जागा बांधाच्या वांध्यान
देश, माणूस तोडला
मळा पडीक पाडला
जीवा जुगार मांडला
बघ साडेतीन फुट
जागा तुला रे जाळाया
लोकं मयता शेवटी
लावी कर्दुडा तोडाया
-- विठ्ठल जाधव.
vitthalj5@gmail.com
शिरूरकासार,बीड
November 28, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti