
-- विनोद
July 19, 2010
भजनांत पांडुरंग , नयनांत पांडुरंग
शर बनुन खोल रुतला प्राणांत पांडुरंग ।।
आसक्ति जीवनीं ना, तरि श्वास हवा वाटे
प्रत्येक क्षणिं मिसळतो श्वासांत पांडुरंग ।।
ना ठावकी कुणाला, ना कल्पना मनाही
पाप्याचिया कसा या हृदयात पांडुरंग ?
खाऊन मत्त लाथा, जरि विसर्जिला गाथा
देतो पुनश्च गाथा हातांत पांडुरंग ।।
प्रतिमा बघे विटेवर, गहिवर गळ्यात दाटे
नि:शब्द शब्द उमटे ओठांत ‘पांडुरंग’ ।।
वेदान्त अन् पुराणें पोथ्या हव्या कशाला ?
अवघेंच ब्रह्म एका शब्दात ‘पांडुरंग’ ।।
कां धाडलें विमाना वैकुंठिं न्यावयाला ?
देहूत भेटतो की देहांत पांडुरंग ।।
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
July 15, 2016
असतिल तेथे जिकडे तिकडे
विखरुनि पडली फुले
असतिल पक्षी झाडावरती
गोड गात बेसले
असेल तेथे वहात सुंदर
दुधासारखी नदी
असतिल डोलत हिरवी पिवळी
कमळे पाण्यामधी
घरे तेथली सुरेख असतिल
चमकत सोन्यापरी
आत लाविल्या असतिल
रंगी बेरंगी तसबिरी
झगमग झगमग करीत असतिल
तिथले सुंदर दिवे
विझतहि नसतिल ते वाऱ्याने,
जणु दुसरे काजवे
रोजच जत्रा भरत असावी
तिथे नदीच्या तटी
असतिल खाऊ देत घेऊनि
पैसे दाटुमुटी
पंख लावुनि हिंडत असतिल
वरती तिथली मुले
असतिल चालत ढगावरुनहि
टाकित हळु पावले
असतिल भारी रंगित कपडे
बाळांचे तेथल्या
शिवले असतिल शेवंतीच्या
गुंफुनिया पाकळ्या
खूप दागिने असतिल त्यांनी
अंगावर घातले
पुन्हा काढुनि नसतिल कधीही
पेटीमधि ठेवले
मनास माने तितुके भटकत
असतिल मेघांवर
स्वर्ग असा हा बघावयाला
मिळेल का लोकर
June 11, 2026
कळते आहे सारेच मजला
वाच्यतेस मात्र बंदीच आहे
मूक गिळुनी सारेच पहावे
अंगवळणी पडलेलेच आहे
जे जे घडते ते घडूनी द्यावे
डोळेच झाकुनी घेणे आहे
कोण तुम्हास इथे विचारतो
ही इथली नग्न सत्यता आहे
न पाजावे ते दोष उपदेशाचे
सर्वांनाच स्वातंत्र्य हवे आहे
कसली संस्कारी नीतीमूल्ये
आज ते सारेच थोतांड आहे
आता जगावेही स्वतःपुरतेच
सांगा तुमची कुणा गरज आहे
जन्मतः सारेच सर्वज्ञ , समर्थ
कलियुगाचीच ही साक्ष आहे.
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ८३.
१६ - ३ - २०२२.
March 28, 2022
( कृष्णजन्माष्टमी व गोपालकाला यानिमित्त)
आतुर होउन, शोधित मोहन, फिरते राधा धुंडित मधुवन
पडतां कानीं वेणूवादन, भान हरपलें, मोहरलें मन ।।
केशकलापीं पुष्पें गंधित
धुंद नाचते वेणी मंडित
पदिचें नूपुर कटी मेखला करिंचे कंकण करती गायन ।।
चंद्रकोर उजळिते ललाटा
नथ ऐटीनें चुंबी ओठां
हलतें हलकें, हलतां झळके, कानीं झुलणारे आभूषण ।।
काजळ खुलवी नयन टपोरे
बनले रक्तिम कपोल गोरे
शुभ्र दंतपाकळ्या उमलती हास्यफुलोरा मुखास देउन ।।
गळा कवळती मोहनमाळा
पदरावर खेळत हिंदोळा
डौल मिरविती बाहू कोमल, बाजुबंद चंदेरी बांधुन ।।
शोभिवंत, अंगुलीत एका
नील कोंदणीं ज़पत मुद्रिका
मृदुल गुलाबी तळहातांवर विलसे मेंदी नक्षी होउन ।।
कनकाहुन दीप्तिमान कांती
प्रभा खुलविती माणिकमोती
वस्त्र रेशमी, हेमकंचुकी, उटी चंदनी खुलवत यौवन ।।
ऊर धडधडे, वाढे हुरहुर
मधुर भावना करती काहुर
दिसतां कान्हा, आवेगानें मिठित झेपवे विश्वा विसरुन ।।
- सुभाष स. नाईक Subhash S. Naik
August 14, 2017
एक भिकारी लीन-दीन तो, भीक मागतो रस्त्यावरी
फिरत राही एकसारखा, या टोकाहून त्या टोकावरी, ।।१
दिवस भराचे श्रम करूनी, चारच पैसे मिळती त्याला
पोटाची खळगी भरण्या, पुरून जाती दोन वेळेला ।।२
मिठाई भांडारा पुढती, उभा ठाकूनी खाई भाकरी
केवळ मिठाईचा आस्वाद, त्याच्या मनास तृप्त करी ।।३
देहाखेरीज कांहीं नव्हते, त्याचे 'आपले' म्हणण्यासाठी
परि समाधानी वृत्ती असूनी, कल्पनेतील आनंद लूटी ।।४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 12, 2020
काही तरी अद्भुत घडलंय अस वाटत होतं. कदाचित माझ्या ह्या भावना आईपर्यंत त्या आजू बाजूच्या तरल वातावरणाने पोहचवला असतील. आईला पहाटे पडलेल्या एका स्वप्नाने जाग आली.
December 24, 2021
आई होवून कळले मजला, कष्ट आईचे आज खरे
स्वानुभवे जे जाणूनी घेई, तुलना त्याची कोण करे....१
नवूमास तू जपला उदरी, क्षणाक्षणाला देवूनी शक्ती
बाह्य जगातून शोषून सारे, सत्व निवडूनी गर्भा देती....२
देहावरी अघांत पडता, झेलूनी घेई सारे कांहीं
बाळ जीवाला बसे न धोका, हीच काळजी सदैव राही....३
संगोपन ते करिता करिता, हासत होती अर्धपोटी तू
सूखी ठेवण्या सोशीली दु:खे, कधी न कळला उद्दात हेतू....४
कसे फेडू मी ऋण मातेचे, ज्योत पेटवी जी जीवनाची
अर्पियले जरी जीवन सारे, उणीव राहील उपकाराची....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 5, 2020
उपकार करुन त्याने मन माझे जिंकिले
परि वेळ गेला निघूनी आभार ना मानले
केली नाही परतफेड उपकाराची मी
कामाचे होते वेड सतत मग्न कामी
कामाच्या मार्गांत चालता पाऊल वाट
प्रयत्न करुन कार्यांत यश साधले अर्धवट
खंत वाटली मनां आठवोनी उपकार
पश्चाताप सांगु कुणा उशीर झाला फार
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 11, 2020
लाभले , भोगले सारेच वैभव..
उगाच कशाला हव्यास आता..
येता जाता , बंद रिकाम्या मुठी..
दृष्टांत हा जगी जगता जगता..।।..१
जीवन , खेळ कठपुतळीचा..
नाचवितो सर्वां तो अनामिक..
दोर सारेच फक्त त्याच्या हाती..
स्मरावे , त्याला जगता जगता..।।..२
जन्मा सोबती सावलीच मृत्यू..
अंती , हेच अटळ सत्य सृष्टीचे..
जगी येणे मोकळे जाणे मोकळे..
आसक्ती , जीवा कशाला आता..।।..३
क्षणक्षण आनंदाने झेलीत जावे..
सद्विवेकाचे , भान अंतरी जपुनी..
मना मनाला नित्य सांधित जावे..
प्रीतभावनांना उधळता उधळता..।।..४
लडिवाळ वेल्हाळ हास्य लाघवी..
स्पर्श रेशमी अलवार कुरवळणारे..
दाहक , दुःख वेदनांना शमविणारे..
लाभावे या जगती जगता जगता..।।..५
©️वि.ग.सातपुते ( भावकवी)
? *9766544908*
रचना क्र. ७४ / १० - ६ - २०२१
June 15, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti