ध्यास पाऊलांना

चिरंजीवी स्मरण तुझे



चिरंजीवी स्मरण तुझे
अधीर ती ओढ अनावर
ध्यास पाऊलांना तुझा
मीही चालतोच निरंतर ।।१।।

वाटेवरच्या वळणांवरती
तुझ्या आठवांच्या खुणा
ओली मृदगंधलेली प्रिती
मनांतरी हिरवळ चिरंतर ।।२।।

भाळीचे सुखदुःख लोचनी
जणू , पावित्र्य गंगाजलाचे
सोहळा ! भावतो हा जीवा
निश्चीन्त मी चालतो निरंतर ।।३।।

– वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र. ८९.

३ – ६ – २०२१.

Author