चंचल केलंस मन, स्थिर करण्यासांगे ।
दिलेल्या गुणाची मग, बदलेल कशी अंगे ?
निसर्ग नियमाच्या, कोण विरूद्ध जाईल ।
फायद्याचे ते का त्याचे परि होईल ?
चपळता जसा गुण, स्थिरपणा असे दुजा ।
आगळ्यातील आनंद, हिच त्यातील मजा ।।
देहा ठेवून चंचल, सांगे स्थिरावण्या मन ।
हा उलटा खेळ कसा, खेळण्या भासे कठीण ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 31, 2019
पर्वत शिखरीं जाऊन खोदून आणली माती,
हातकौशल्यने केला एक गणपती ।।१।।
मूर्ती बनली सुरेख आनंद देई मनां,
दाम मिळेल ठीक हीच आली भावना ।।२।।
घेऊन गेलो बाजारीं उल्हासाच्या भरांत,
कुणी न त्यासी पसंत करी निराश झालो मनांत ।।३।।
बहूत दिवस प्रयत्न केला कुणी न घेई विकत,
कंटाळून नेऊन दिला गणपती शाळेत ।।४।।
भरले होते भव्य प्रदर्शन हस्तकला कौशल्याचे,
नवल वाटले गणपती बघून दालनातील सुरवातीचे ।।५।।
चकीत झालो जाणूनी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार,
गणपतीच्या भव्यतेनी मिळविला हा अधिकार ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 16, 2015
राहुनीया माणसांच्यातही साऱ्या
August 20, 2021
बाळ चिमुकले,गोड हासले,
रांगत आले ,
पायाला धरुनी,
उभे राहिले,
बाळकृष्ण ते,
मला भासले, --
वदनांतून कोवळे,
ध्वनि उमटले,
बोबड्या स्वरांनी,
मज जिंकीयले,
उचलून घेता ,
कसे आनंदले,
हात हलवून ,
मज कुरवाळले,
कोण लहान,
मग वाटले,
कुशीत त्याच्या,
मीच शिरले ,
हलके हलके,
त्याने थोपटले,
गा,---गा कर ,
मज म्हणाले,
निश्चिंत जीव,---!!!
निश्चिंत मन ,-----!!!
मज विश्वरूपदर्शन,
अलगद घडले,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
May 1, 2019
ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी
आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी
माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती
हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती
जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी
नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी
परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता
टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 29, 2017
चिव चिव करीत, एक चिमणी आली ।
दर्पणाच्या चौकटीवरती, येवून ती बसली ।।
बघूनी दूजी चिमणी दर्पणी, चकीत झाली होती ।
वाटूं लागले या चिमणीला, आंत अडकली ती ।।
उत्सुकता नि तगमग दिसे, चेहऱ्यावरी ।
चारी दिशेने बघत होती, आंतल्या चिमणी परी ।।
औत्सुक्याचे भाव सारे दिसती, आतील चिमणीतही ।
कशी करूं तिची बंधन मुक्ती, काळजी लागून राही ।।
चोंच मारीते आवाज करिते, यत्न्य केले सारे ।
श्रम होवूनी थकूनी गेली, हातीं न कांहीं उरे ।।
चिंता लागली चिंता बघूनी, या चिमणीला ।
चलबिचल ही जेवढी होती, तसेंच दिसे हिला ।।
स्वबांधवांना मदत करणे, त्यांच्या संकटी ।
पशू पक्षांतही दिसून येते, तत्वें ही मोठी ।।
चालले होते प्रयत्न निष्फळ, या चिमणीचे ।
परि जिद्द ठेवतां भान नव्हते, आपल्या देहाचे ।।
कांच पडली फूटून खालती, तडा त्यास जावूनी ।
एक आवाज तेथे घुमला, घाबरली चिमणी ।।
जरी देह झाला रक्तबंबाळ, यश चमकले तेथें ।
समजत होती चिमणी बिचारी, बंधन तोडले ते ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 6, 2016
ज्योतिष्याची चढूनी पायरी, जन्म कुंडली दाखवी त्याला ।
अडले घोडे नशिबाचे, कोणते अनिष्ट ग्रह राशीला ।।१।।
नशिबाची चौकट जाणूनी, आशा त्याची द्विगुणित झाली ।
मनांत येतां खात्रीं यशाची, जीव तोडूनी प्रयत्ने केली ।।२।।
प्रयत्नांती असतो ईश्वर, म्हणूनी मिळाले यश त्याला ।
आत्मविश्वास जागृत करण्या, 'भविष्य' शब्द कामी आला ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 28, 2018
निसर्गाचा अप्रतिम ठेवा, नदीकाठच्या पर्वत शिखरीं ।
बाह्य जगाचे वातावरण, धुंदी आणिते मनास भारी ।।
त्याच वनी एकटे असतां, परि न लाभे एकांत तुम्हांला ।
चित्तामध्यें वादळ उठतां, महत्त्व नव्हते बाह्यांगाला ।।
खडखडाट सारा होता, दैनंदिनीच्या नित्य जीवनी ।
समाधानी जर तुम्हीं असतां, शांतता दिसते त्याच मनीं ।।
एकांततेची खरी कल्पना, मनावरती अवलंबूनी ।
अंतर्मन शांत असतां, बाह्य एकांत बघेना कुणी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 25, 2020
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।धृ।।
बालपणाची रम्यता मजा केली खेळ खेळता
निरोप देता बालपणाला नाद गेला खेळण्याचा ।।१।।
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा
तारुण्याचे सुख आगळे मादकतेने शरिर भारले
बहर ओसरु लागला दूर सारतां घट प्रेमाचा ।।२।।
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा
प्रौढत्वाची शानच न्यारी श्रेष्ठतेची ठरे भरारी
येतां दुबळेपणा शरिराला उबग येई संसाराचा ।।३।।
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा
जीवनातील प्रत्येक पायरी मजलागी आनंदी करी
परी त्या क्षणिक सुखाला संबंध होता देहाचा ।।४।।
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा
आहे सारे प्रभूचे भाव अर्पा मनाचे
समर्पण करा देहाचे त्याग करा सर्वस्वाचा ।।५।।
तेव्हांच मिळेल खरा आनंद जीवनाचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
January 1, 2015
माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत
पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं- घरादाराला कधीही ’लॉक' नव्हतं..
तरीही माझ जीवन सुखाच होत ||१||
आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होत- स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत,
पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होत- आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हत..
तरीही माझ जीवन सुखाच होत ||२||
घरासमोर छोटंसं अंगण होत- तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होत,
दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होत- विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ३ ||
आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,
दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा- दगडाने अंग घासण फ़ारस सुसह्य नव्हतं
तरीही माझ जीवन सुखाच होत || ४ ॥
पायात चप्पल असण सक्तीच नव्हतं- अंडरपॅट बनियनवर फ़िरण जगन्मान्य होतं
शाळेसाठी मैलभर चालण्याच अप्रूप नव्हतं- मोठ्यांना सायकलशिवाय दुसर वाहन नव्हत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ५ ॥
शाळेत गुरुजनांप्रती आदर होता- घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,
पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता- छडी हे शिक्षकाचं लाडक शस्त्र होतं..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ६ ॥
शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता, --नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,
अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता - कलांना "भिकेचे डोहाळे" असच नाव होते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ७ ॥
नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा - पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा,
शाळेचा युनिफोर्म थोरल्याकडूनच मिळायचा - तिन्हीसांजेला घरी परतणे सक्तीच होते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ८ ||
वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या - पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,
कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा - उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्या राज्य होत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || ९ ||
पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे - घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,
उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे - नौनवेज खाण हे तर माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १० ||
शाळेत अभ्यासाला खूप महत्व होते- नंबरावर बक्षीस/छड्या यांचे प्रमाण ठरत असत,
कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हत - वशिल्याने पास होण माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || ११ ||
गावची जत्रा हीच एक करमणूक असायची - चक्र - पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची,
बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची - विमानातला फोटो काढण चमत्कारिक होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १२ ||
गावाबाहेरच जग हिरवागार असायचं - सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचे,
पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं - प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १३ ||
हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा - क्रिकेटच्या मैचेस चाळीत व्हायच्या,
बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या - डे-नाईट, ट्वेंटी- २० चे नावही नव्हते,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १४ ||
प्रवास झालाच तर एस्टीनेच व्हायचा - गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
ह्ँनडल सोबत फिरकीचा तांब्याही लागायचा - लक्झरी, फर्स्टक्लास एसीच नावही नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १५ ||
दिवाळी खर्या अर्थाने दिवाळी होती - चमन चिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात होती,
रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती - लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होत..
तरीही माझ जीवन सुखाच होत || १६ ||
जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची - बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,
रेडीवो सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची - ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १७ ||
खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा - दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,
पानात टाकणार्याच्या पाठीत रट्टा बसायचा - हौटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १८ ||
मामाच्या गावाला कधी जाणं-येण होत - धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होत,
विहिरीत पोहायला तिथेच मिळत होत - भावूबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || १९ ||
घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे - बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,
पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचे - प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || २० ||
पाव्हणे रावळे इ चा घरात राबता असायचा - सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,
गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा - पंक्तीत श्लोक म्हणण मात्र सक्तीच होत,
तरीही माझ जीवन सुखाच होत || २१ ||
आज घराऐवजी लक्झुरीयस फ्लेट आहे - मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे,
टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दनदणाट आहे - फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,
कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे || २२ ||
आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत - दूध, बूस्ट, कोम्प्लानचा भरपूर मारा आहे,
क्लास, गाईड, कैल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे - कपडे, युनिफोर्म. क्रीडासाहित्य हवे तितके आहे,
बालकांच्या नशिबी मात्र पाळणाघर आहे || २३ ||
आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे - सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,
एक्स्ट्रा ऐक्टीविटीजना घरात सन्मान आहे - छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,
आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे || २४ ||
आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे - मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,
इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे - सध्या बायवान गेटवनचा जमाना आहे..
म्हणून
पैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे,
पैशावर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.. || २५ ||
September 15, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti