(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मंद गारवा हवेत…

    हृदयात वणवा होता
    नजरेत ती होती
    मंद गारवा हवेत
    मनात उब होती

    डोक्यात विचार होता
    ओठावर कविता होती
    मंद गारवा हवेत
    शब्दात उब होती

    भोवती प्रेम होते
    सुंदर ती होती
    मंद गारवा हवेत
    तिच्यात उब होती

    जगणे सुरू होते
    जीवनात मजा होती
    मंद गारवा हवेत
    जगण्यात उब होती

    जवळ ती नाही
    फक्त कल्पनेत होती
    मंद गारवा हवेत
    स्वप्नात उब होती

    © निलेश बामणे

      June 9, 2017


  • कीटकाचे ब्रह्मांड

    कीटक ते लहान असूनी
    रहात होते फळामध्यें
    विश्व तयाचे उंबर फळ
    जीवन घालवी आनंदे १

    ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती
    उंबराच्या नसे पलिकडे
    ज्यासी ते अथांग समजले
    बघूनी त्या एका फळाकडे २

    माहित नव्हते त्या कीटकाला
    झाडावरची अगणित फळे
    सृष्टीतील असंख्य झाडे
    कशी मग ती त्यास कळे ३

    आपण देखील रहात असतो
    अशाच एका फळावरी
    हीच फळे असंख्य असूनी
    असंख्य झाडे विश्वावरी ४

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 29, 2019


  • जीवन मरणाची शर्यत

    शोभिवंत घर केले, आधुनिक बनलो मी

    विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी

    शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी

    झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी

    काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला

    रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला

    रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती

    नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती

    खेळून भूक लागली, हा विचार आला मनी

    जीवंत किडे सोडले जली, खाण्यासाठी माशांना

    शर्यत किडे माशांची, बघून वाटली गम्मत

    भक्ष्ये पकडूनी किड्यांची, मासे असती जिंकत

    मनी निराशा आली अवचित, विचार येता ध्यानीं

    जीवन मरणाची ही शर्यत, जगे एक दुसऱ्यास मारुनी

    परि निसर्गाची रीत निराळी, संधी देई जगण्याते

    बंदीत टाकूनी किडे सगळी, वंचित केले त्या संधीते

    निराश होऊनी जातां, काढून घेतले माशांना

    जलाशांत सोडूनी देतां, आनंद झाला मनां

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 7, 2020


  • निश्चिंत

    तूच अशीच निश्चिंत
    रमलीस इथे क्षणभर

    वृक्षातळी हे वृंदावन
    लोचनी याच निरंतर

    पानोपानी झुळझुळ
    गंधसुगंधा ती अनावर

    धुंदला शीतल गारवा
    स्पर्श रेशमी, अलवार

    प्रचिती सारी आल्हादी
    आसमंत सारे मनोहर

    भावप्रीती मिठीत घ्यावे
    ही ईछ्या मनी आजवर

    --वि.ग.सातपुते.( भावकवी )

    9766544908

    रचना क्र.१८१

    २९/७/२०२२

      August 31, 2022


  • कळेना कसे जडले रे मन (गीत)

    कळेना कसे जडले रे मन
    आज हरपले माझे रे भान।।धृ।।

    फुलात दिसतो,मनी हसतो
    क्षणात जीव उगाच
    फसतो
    मन अजुनही आहे रे सान
    आज हरपले माझे रे भान।।१।।

    घरात होतसे तुझाच भास
    दिलवरा श्वासात तुझी आस
    साद ऐकण्या आतुरले कान
    आज हरपले माझे रे भान।।२।।

    तळमळ वाढे उगाच जीवा
    हळहळ दाटे मनात प्रिया
    कंठात दाटूनी आले रे प्राण
    आज हरपले माझे रे भान।।२।।

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      February 17, 2020


  • तुझा चेहरा

    मित्रांनो, "तुझा चेहरा" ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका.
    "माझी डायरी " या आपल्या चॅनलला अवश्य Subscribe करा. "माझी डायरी" आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.

    https://youtu.be/8s4BlfJ1-5U

      June 14, 2018


  • जीवन परिघ

    एक परिघ ते आंखले आहे
    विधात्याने विश्वाभोवतीं
    जीवन सारे फिरत असते
    एक दिशेनें त्या वरती १

    वाहण्याची क्रिया चालली
    युगानुयुगें या जगतीं
    कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा
    एकांच परिघात सारे फिरती २

    जेंव्हां कुणीतरी थकून जाई
    दुजा उठोनी मदत करी
    जीवन मरणाची शर्यत
    जिंकण्यासाठीं तो लक्ष्य धरी ३

    मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी
    नियंत्रित कुणी करी जगाला
    परिघ सोडूनी जाण्यासाठीं
    दिसत नसे मार्ग कुणाला ४

    प्रयत्न तुमचा सदा असावा
    मध्यबिंदूकडे तो सरकण्याचा
    शक्तिरुप तेथेंच असूनी
    त्याच्यांत सामावून जाण्याचा ५

    भिती तुमच्या मनीं वसते
    कसे जाऊं त्या आंसाकडे
    तुकडे होतील या देहाचे
    जेव्हां त्या आसांत पडे ६

    सोडूनी देण्या तो सारा खेळ
    केंद्रस्थानी जाणे, मार्ग असे
    विसरुन जाता या देहाला
    प्रभू समर्पण करण्यांत असे ७

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      August 25, 2015


  • जखम

    खरंच रे वेड्या,तुला कळला नाही, माझ्या मनीचा भाव,
    नकळत कोरून गेलास,न भरलेल्या जखमेचा घाव...
    गळून पडेल का ही जखम? की जाईल ती पण सुखून,
    की चीघळून जाईल पुन्हा,सोसेल का हे तळपतं ऊन?
    तू दिली आहेस म्हणून खरंच का हिला जपून ठेवू?
    सांगना,सजवून धजवून अंगावरचं टपोरं गोंदण मानून घेवू ?
    मलम नाही रे हिला,असा कसा रे केलास वार?
    उसळणाऱ्या तलवारीतही नव्हती,तुझ्या जिभे एवढी धार...
    उफाळून आलंय बघ हे हृदय, स्वत:स मर्यादा घालून,
    अश्रूंनाही ठेवतंय मुठीत, भावनांची करपलेली खपली सोलून...

    -- कु. श्र्वेता काशिनाथ संकपाळ.

      May 7, 2019


  • ये जरा आणखी जवळ माझ्या फुला

      April 19, 2010


  • हवीहवीशी मनास शांती

    हळूच पाऊली येते संध्या
    जाते बिलगत यामिनिला
    विलोभनिय ते प्रहर सारे
    चाहुल निरवतेची सांजेला....

    हवीहवीशी मनास शांती
    मिठित घेते काळोखाला
    अनाहत अबोली एकरूपता
    कुरवाळीते जीवाजीवाला...

    भावगंधल्या त्या प्रीतभावनां
    सजवुनी जाती मनामनाला
    आत्मानंदी साक्षात्कार सुंदर
    अंतरी उधाण येते आनंदाला....
    *********

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    (9766544908)

    रचना क्र. ३२६

    ९/१२/२०२२

      December 21, 2022