(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जीवन एक “जाते”

    जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा ।

    दोन चाकांत येईल, मोडेल त्याचा कणा ।।

    जीवन मृत्यूची चाके, सतत फिरत राही ।

    येई जो मध्ये त्याच्या, मागे न उरेल काही ।।

    मध्यभागी राही स्थिर, आंस त्यास म्हणती ।

    वरचे चाक फिरे, त्याच्या भोवती ।।

    आंसाजवळील दाणा, दूर तो चाकापासूनी ।

    परिणाम चाकाचा तो होईल, मग कोठूनी ।।

    जन्म मृत्यूची चाके, ईश्वर हा फिरवतो ।

    जवळीक त्याची मिळता, दु:खातून मुक्त होतो ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      December 13, 2016


  • मुखवटा

    माझा चेहरा पाहून मला 
    जाणून घेण केवळ अशक्य…
    निलेश बामणे यांची कविता

      May 16, 2014


  • पावित्र्य

    सांगु कसे मनांतरीचे
    अव्यक्त, ते गुज मी

    तुझ्या साऱ्या आठवांचे
    क्षण स्मरतो सदैव मी

    श्वासात या भास तुझा
    स्वप्नातही जागतो मी

    छळते मज रात्र सारी
    विरघळतो तुझ्यात मी

    जाहलाच सराव आता
    तुजवीणही जगतो मी

    घायाळ अंतरीचे उसासे
    तवस्मृतीत, सावरतो मी

    नि:शब्दी जरी भावप्रीती
    जाणतो मौनी पावित्र्य मी

    -- वि.ग.सातपुते ( भावकवी )

    9766544908

    रचना क्र.१७५

    २१ /७ /२०२२

      August 26, 2022


  • पंख

     

      November 29, 2013


  • गुदमरलेला श्वास

    आज मी कां कुणां दोष द्यावा
    भोग माझ्या प्राक्तनाचाच आहे
    पुण्यही माझे, ते पापही माझे
    भोगणारा, मीच एकटा आहे
    वात्सल्य, केवळ जन्मदात्यांचे
    आशीर्वाद तोच जगवितो आहे
    ऋणानुबंधी नाती सारी मृगजळी
    या कलियुगाचा नग्न दृष्टांत आहे
    प्रीतभावनांचे भास सारे बेगडी
    जीव स्वार्थी सुखात गुंतला आहे
    ना लळा, जिव्हाळा, प्रेम माया
    निर्जीवी भावनांचाच स्पर्श आहे
    सांगा, जगी आज कोण कुणाचे
    श्वास मोकळा गुदमरलेला आहे
    केवळ, जगण्यासाठी धडपड
    जगणेच केविलवाणे झाले आहे
    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. १२७.
    ३० - ४ - २०२२

      May 28, 2022


  • तूच सख्या रे

    तूच सख्या रे
    माझ्या आठवातील प्रीत
    माझ्या ओठी चे गीत..

    तुच सख्या रे
    सांजेस वाहता वारा
    ग्रीष्मात बरसत्या धारा

    तूच सख्या रे
    माझे नक्षत्रांचे देणे
    स्वप्न सुखाचे येणे

    तूच सख्या रे
    माझा श्वास निःश्वास
    देहात विरलेला वास

    तूच सख्या रे
    माझ्या रूपाचे कोंदण
    आत्मीयतेचे अतूट बंधन

      July 16, 2026


  • खेळ उन सावल्यांचा

    जन्म दान त्या विधात्याचे
    दृष्टांत सुखदु:ख वेदनांचा
    खेळ जणु उन सावल्यांचा
    साराच भोग तो प्राक्तनाचा।।

    ऋतुऋतुंचे, खेळ मनोहर
    नभी सडा चंदेरी नक्षत्रांचा
    नित्य लपंडाव उषानिशाचा
    खेळ, जणु उनसावल्यांचा।।

    जन्मासंगे मृत्युचीच सावली
    हा साक्षात्कार जीवसृष्टिचा
    कधी शांतता, कधी तप्तता
    खेळ, जणु उनसावल्यांचा।।

    जगणे असते आपुल्या हाती
    धरूनी हात विवेकी बुद्धिचा
    प्रत्येकाच्याच जीवनी असतो
    हा खेळ नित्य उनसावल्याचा।।

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ११७.

    १६ - ४ - २०२२

      May 1, 2022


  • लाटांच्या साक्षीने

    नदीच्या शांत तीरावर तू अलगद बोलली होतीस,
    लाटांच्या मंद गाण्यात एक प्रतिज्ञा ठेवली होतीस.

    संध्येच्या फिक्या उजेडात वेळ जरा थांबला होता,
    तुझ्या त्या साध्या शब्दांनी जीव माझा भरला होता.

    वारा साक्षीदार झाला, आकाशही ऐकत होतं,
    दोन मनांच्या त्या गाठीला विश्व जणू पाहत होतं.

    आज प्रवाह बदलले,
    घाटही मागे राहिले,
    पण तुझ्या त्या बोलण्याचे स्पंदन मनात राहिले.

    कधी नदीकाठ आठवला की हसू नकळत उमलतं,
    कारण तिथेच आयुष्याने एक स्वप्न हळूच जपलं होतं.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 13, 2026


  • टॉकटाईमचा बॅलन्स

    जो तो आपल्या कामात…..

      June 7, 2010


  • धन्य ती महाराष्ट्र माऊली !

    कृष्ण कमळ-

      August 24, 2014