(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मोहमाया दलदल

    दलदल होता चिखल मातीची, पाय जाती खोलांत

    प्रयत्न तुमचे व्यर्थ जाऊनी , न होई त्यावर मात...१,

    सावध होवूनी प्रथम पावूली, टाळावे ते संकट

    मध्यभागी तुम्ही शिरल्यानंतर, दिसत नाही वाट....२,

    मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली

    चुकूनी पडतां पाऊल तुमचे, खेचला जातो खाली...३,

    जागृतपणाचा अभाव असतां, गुरफूटूनी जातो

    मोहमायेच्या आकर्षक गुणाला, बळी तोच पडतो....४,

    वेगवान त्या जीवन प्रवाही, खिळ बसे मोहाने

    क्षणीक सुखाच्या मागे जातां, दु:खी होई जीवने....५

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 30, 2020


  • घाशीराम कोतवाल या नाटकाचा पहिला प्रयोग

    विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं. १६ डिसेंबर १९७२ रोजी पुण्याच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.

      February 27, 2019


  • सांसारिक प्रवास

    भातुकलीच्या डावांत मांडला, संसार राजा राणीचा,---
    इवल्याशा घरात चालला,
    सांसारिक प्रवास त्यांचा,--!!!

    छोटी छोटी भांडी कुंडी,
    छोटे छोटे सामान,
    इवली इवली सामुग्री,
    करत सुख-रसपान, --!!!

    हळूहळू संसार वाढला,
    आले सोनुले बाळ,
    कळले नाही कधीच,
    किती निघून गेला काळ,---!!!

    राजाराणी मग्न आपुल्या,
    छोट्या चिमुकल्या विश्वात,
    बाळ बालीश,वाढे निरंतर,
    त्याला तारुण्य आले झोंकात,-!!

    नादातच तो आपल्या राही,
    वाहन वेगात चालवे,
    करता करता पंचविशी,
    गाठली बघा बाळाने,--!!!

    बाळ कसले तरुण आता,
    कर्ता पुरुष होतकरू,
    आई-बाबा थकून जाती,
    न ऐके त्यांचे लेकरू,--!!!

    एक दिवस आक्रीत घडले, नियतीने तोंड फिरविले,
    जाताजाता बघता-बघता, वाघिणीने कोकरू नेले,--!!!!

    आईबापांचे जग कोसळले,
    सारे विश्व उद्ध्वस्त झाले,
    कोणते बाळ, कसला संसार,?
    सारे सारे वाऱ्यावर गेले--!!!

    भातुकलीचा डाव उधळे,
    प्राक्तन त्याचे नाव,
    आई बापाला पोरके केले,
    बुडली संसाराची नाव,--!!!

    हिमगौरी कर्वे©

      August 8, 2019


  • यशासाठी प्रयत्नाची दिशा

    प्रयत्न करिता जीव तोडून, जेव्हा यश तुम्हा न येई

    सोडून देता त्याला तुम्ही, नशिबास दोष देत राही..१

    दोष नका देवू नशिबाला, मार्ग निवडले तुम्ही चुकीचे

    का न मिळाले यश तुम्हा, मूल्यमापन करा प्रयत्नाचे...२

    चूक दिशेने प्रयत्न होता, वाहून जातो सदा आपण

    यश जेव्हा मिळत नसते, निराश होवून जाते मन...३

    पुनः पुन्हा प्रयत्न करूनी, यश न आले तुमचे हाती

    प्रयत्नाची दिशा बदलता, जुळून सहजच सारे येती...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      August 18, 2020


  • मातृभूमीच्या शूर जवाना तुला सलाम !

    मातृभूमीच्या शूर जवाना

    स्वातंत्र्या आधी आणि नंतर

    आमच्यासाठी किती खस्ता खाल्यास

    याचा इतिहास विसरलो नाही आम्हीं !

    मातृभूमीच्या शूर जवाना आप्तांसाठी

    ऊन, पाऊस, बर्फाच्या वादळात

    सीमारेषेचे डोळ्यात तेल घालून

    चोवीस तास राक्षण करतोस !

    शत्रूने केलेल्या मातृभूमीवरील भेकड हल्याचे

    सर्जिकल स्ट्राईकने चोख उत्तर देतोस

    आपल्या आप्तांचे रक्षणकरण्या

    वीर मरण पतकरतोस !

    मातृभूमीच्या शूर जवाना

    तुझा जागता पाहारा आहे सीमेवर

    म्हणून दैनंदिन व्यवहार सुरळीत होतात

    आणि रात्री आप्त निश्चिंत झोपतात !

    मातृभूमीच्या शूर जवाना

    उत्सव आणि सणवाराला कुटुंबियांसमवेत नसतोस,

    कारण तू सीमेवर मातृभूमीच्या रक्षणाचे

    कर्तव्य पार पाडत असतोस !

    मातृभूमीच्या शूर जवाना

    आम्हीं काय करावे अशी तुझी अपेक्षा आहे?

    मातृभूमीचा शूर जवान म्हणतो

    करण्यासारखे बरेच आहे !

    आपल्या आजूबाजूला काही

    संशयास्पद वाटले तर

    कायदा हातात न घेता

    पोलिसांना कळवा !

    मेल, फेसबुक, ट्वीटर, वॅाटसप

    सोशल मिडियाचा वापर करण्यास शिका,

    पण त्याचा गैरवापर होणार नाही

    याकडेही लक्ष असू द्या !

    डिझास्टर मॅनेजमेंटचे शिक्षण घ्या,

    आपल्या बहादूर जवानांवर विश्वास ठेवा,

    वीरमरण आलेल्या जवानांच्या

    कुटुंबियांना आधार द्या !

    देशाच्या अखंडतेला कुठे तडा जाईल

    असे एकमेकांशी वागू नका

    युद्ध प्रसंगी अफवा पसरवू नका

    अफवांवर विश्वास ठेऊ नका !

    -- जगदीश पटवर्धन

      November 5, 2016


  • रात्रीस खेळ चाले…

    रात्रीस खेळ चाले...स्वप्नांचा
    स्वप्नातील आशा-आकांक्षांचा
    रात्रीस खेळ चाले... विचारांचा
    विचारातील प्रेम भावनांचा
    रात्रीस खेळ चाले...शांततेचा
    शांततेत लपलेल्या समाधानाचा
    रात्रीस खेळ चाले...क्षणांचा
    क्षणात घडलेल्या गोष्टींचा
    रात्रीस खेळ चाले...उद्याचा
    उद्या उगवणाऱ्या दिवसाचा
    रात्रीस खेळ चाले...झोपेचा
    झोपेत होणाऱ्या भासांचा
    रात्रीस खेळ चाले... कल्पनेचा
    कल्पनेत होणाऱ्या जन्मांचा
    रात्रीस खेळ चाले...रात्रीचा
    रात्रीच घेऊ या आनंद रात्रीचा
    शुभ रात्री...
    --- कवी - निलेश बामणे ---

      December 5, 2016


  • प्रिय आईस

    जीवनातल्या मंगलकलशा नाव तुझे आई असू दे
    स्तोत्र तुझे गाण्यासाठी माझी गीतगंगा वाहू दे ॥

    जगातील महानता आकारावी का आई म्हणूनी
    का साकारावी उदात्तता मायेचे लेणे लेवूनी
    परिसीमा त्यागाची एकवटाया नि : स्पृह प्रेमाची मूर्ती होऊनी
    का यावे उदयास भाग्य जन्मींचे हे आईरुपानी ,
    छत्र तुझे , दैव माझे , आई पुण्याई माझी सदैव राहूदे ॥ १ ॥

    आविष्कार त विधात्याच्या भारावल्या स्थितीचा
    मन दिले आभाळाचे सडा शिंपूनी अमृताचा
    बांधिले काळीज तुझे गुंफून धागा दुर्मिळाचा
    भावनांचा दिला श्वास नि स्पर्श तुला परीसाचा
    तेज आहे सूर्याचे नि चांदण्याची तुला स्निग्धता दे ॥ २ ॥

    आकारले मातीला या तू रक्ताचे शिंपण करुनी
    मायेच्या उधळणींमधूनी नि पंखांच्या पखरणींखालूनी
    नित्य उगवली नवी क्षितीजे माझी तुझ्या कुशीतूनी
    नित्य उभे पाठीशी केले सामर्थ्य तुझ्या अमृतस्पर्शानी
    तुझ्याच अन् आशांचा दीप हृदयी माझ्या तेवू दे ॥ ३ ॥

    जीवनाच्या मंगलक्षणी पूजण्याचा शब्द तू
    समर्थतेच्या अंतकाळी जपण्याचा मंत्र तू
    आकांक्षांच्या पूर्ततेची अविरत प्रेरणा नि ध्यास तू
    आभाळातल्या मांगल्याच्या दिव्यत्त्वाचा आभास तू
    तू श्वास , आश्वास भविष्याचा तूच विश्वास राहू दे ॥ ४ ॥

    ऋणांतून तुझ्या व्हावे उतराई कसे या तोकड्या हातांनी
    वसा तुझ्या मायेचा वाह्न पिढ्यांसाठी का व्रतस्थ होऊनी
    ओठांतील कृतज्ञता कशी ही न कळे ओघळे डोळ्यांकाठी
    सरले , नुरले शब्द काही तरीही फिरुनी येतो ओठी
    आई , आई म्हणूनी हृदयाचा माझ्या झंकार असू दे ॥ ५ ॥

    –यतीन सामंत

      November 8, 2022


  • मृत्युंजय

    अज्ञात दिवा मी मिणमिणणारा
    संकटाचे येऊ देत वादळी वारे
    वावटळही ती येऊ दे
    आणि अंगावर येऊ देत सारे
    पण मी विझणार नाही
    मी जागृत रहाणार आहे

    पेटूनऽ....
    पेटून, पेटवून मी प्रज्वलित होणार आहे
    जरी मला ज्ञात आहे
    गेल्यावर मी, फक्त....
    दप्तरी नोंद होणार आहे
    विस्मृती मला घेरणार आहे
    पण कर्तव्य माझे मी पार पाडणार आहे
    जन्म-जीवन माझे मरण्यासाठी
    मरण माझे माझ्या देशासाठी
    खेचून विजयश्री मी आणणार आहे
    रणधुमाळीतच मी विसावणार आहे

    नसेन मी....
    नसेन मी भव्य स्मारकावर
    जागृत जनस्मृतीवर
    फळ्या-फलकांवर
    इतिहासाच्या अन्
    भव्य - सोनेरी पानांवर

    बलिदानातच मला
    मान माझा गवसणार आहे

    धडाडणाऱ्या तोफांना मी धडकणार आहे
    मातीसाठी माझ्याच, मी मरणार आहे
    या मातीची, या देशाची आणि विजयाची
    इमारत जेव्हा उभी रहाणार आहे
    लक्षात ठेवा.
    पाया तिचा तो मीच असणार आहे
    तो पाया मीच, मजबूतीही मीच
    आणि पहा
    पसरलेला तो... गडद लाल रंग
    शाईचा-इतिहासाच्या पानापानातील
    त्यातही तर मीच असणार आहे
    मातेच्या विजयाचा कणन्-कण
    मीच तर तो असणार आहे

    नाही...
    नाही मी विसरला जाणार....
    मी मरणार नाही
    मी अमर होणार आहे
    देशभक्तीचे प्रिय अमृत प्राशून
    मी मृत्युंजय होणार आहे

    -- यतीन सामंत

      October 18, 2022


  • जग

    मी म्हणालो जगाला
    मला फक्त तुझ्यासाठी
    आणि स्वतःसाठी जगायचयं...
    जग म्हणालं मला
    माझ्यासाठी जगं पण
    टाळं स्वतःसाठी जगायचं...
    मी बदललो
    जगाच्या कल्याणासाठी
    पण आता जगचं मला बदलतयं...
    जगात बदल घडवणं
    आता अशक्य आहे
    कारण जग आता पाषाण झालयं...

    © कवी – निलेश बामणे

      June 6, 2017


  • चिमणीची निद्रा मोड

    चिंगी

    'पहाट झाली,
    चिव चिवते चिमणी
    उमज येईना,
    उठविले तिजला कोणी.....१,

    आई आहे कां ?
    जी उठवी शाळेसाठी,
    गुदगुदल्या करूनी
    कुरवाळिते हळूंच पाठी....२,

    घड्याळ उठवी
    घण घण करूनी नाद
    घरट्यामधुनी,
    नाही ऐकला असा निनाद.'..३,

    चिमणी

    ' उषाराणी येते,
    साऱ्यांची आई बनूनी
    प्रेमानें मोडी झोंप,
    नाजूक करकमलांनी.....४,

    घड्याळ आमचे,
    दवबिंदू पडतां पानावरूनी
    चाळविती निद्रा,
    टपटप आवाज करूनी' .....५

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      September 4, 2017