(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दिलासा

    ज्योतिष्याची चढूनी पायरी,

    जन्म कुंडली दाखवी त्याला ।

    अडले घोडे नशिबाचे,

    कोणते अनिष्ट ग्रह राशीला ।।

    नशिबाची चौकट जाणूनी,

    आशा त्याची द्विगुणित झाली ।

    मनांत येतां खात्रीं यशाची,

    जीव तोडूनी प्रयत्ने केली ।।

    प्रयत्नांती असतो ईश्वर,

    म्हणूनी मिळाले यश त्याला ।

    आत्मविश्वास जागृत करण्या,

    'भविष्य' शब्द कामी आला ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      October 22, 2016


  • मोहमाया दलदल

    दलदल होता चिखल मातीची, पाय जाती खोलांत
    प्रयत्न तुमचे व्यर्थ जाऊनी , न होई त्यावर मात...१,

    सावध होवूनी प्रथम पावूली, टाळावे ते संकट
    मध्यभागी तुम्ही शिरल्यानंतर, दिसत नाही वाट....२,

    मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली
    चुकूनी पडतां पाऊल तुमचे, खेचला जातो खाली...३,

    जागृतपणाचा अभाव असतां, गुरफूटूनी जातो
    मोहमायेच्या आकर्षक गुणाला, बळी तोच पडतो....४,

    वेगवान त्या जीवन प्रवाही, खिळ बसे मोहाने
    क्षणीक सुखाच्या मागे जातां, दु:खी होई जीवने....५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      May 27, 2019


  • कर्ममुक्ती

    न राही तुमचे ते कर्म, ज्यात प्रभू इच्छा अंतीम....१,

    प्रत्येक घटनेचे अंग, त्यात मुख्य ईश्वरी भाग....२

    तुमच्या मार्फतच होई त्याचा इशारा कोण पाही....३,

    सर्व समजे मीच केले अहंकाराने मन भरले....४,

    षडरिपू असे साधन खेळविता यावे म्हणून...५,

    राग,लोभ, मोह मायादी ठेवती वाटते आनंदी....६,

    परि याच्याच शक्तीने प्रभू खेळ चाले युक्तीने....७,

    षडरिपू सारे टाळून मुक्ती मिळेल खेळातून.....८

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 31, 2020


  • सुदाम्याला ऐश्वर्य

    गरिब सुदामा बालमित्र तो, आला हरीच्या भेटीला

    बालपणातील मित्रत्वाची, ओढ येवूनी मनाला....।।

    छोटी पिशवी घेवूनी हाती, पोहे घेतले त्यात

    फूल ना फुलाची पाकळी घ्यावी, हीच भावना मनांत....।।

    काय दिले वहीनींनी मजला, चौकशी केली कृष्णाने

    झडप घालूनी पिशवी घेई, खाई पोहे आवडीने....।।

    बालपणातील अतूट होते, मित्रत्वाचे त्यांचे नाते

    मूल्यमापन कसे करावे, उमगले नाही कृष्णाते....।।

    समोर असता सुदामा, काही न दिले त्याते

    द्विधा होऊनी मन:स्थिती, परत पाठवी रिक्त हस्ते...।।

    देवूनी ऐश्वर्याच्या राशी, सुदाम्याच्या माघारी

    मित्रत्वाच्या प्रेमभावाची, भेट देई श्री हरी....।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 10, 2019


  • ऋणमुक्त जीवन

    जीवन होते गर्दी मधले,
    मुंबापुरीचे त्याचे,
    खडतर असती मार्ग सारे,
    येथील जगण्याचे ।।१।।

    दिवस होता त्याचेसाठी,
    तारेवरची कसरत,
    धावपळ करीत असता,
    सावध ठेवी चित्त ।।२।।

    जाण होती एकची त्याला,
    मृत्यू आहे स्वस्त इथे,
    सज्ज राही सदैव मनी,
    स्वागत करण्या त्याते ।।३।।

    ठेवीत होता धन थोडेसे,
    स्वत:चे जवळी,
    उपयोगी ते पडेल केंव्हां,
    येत्या संकटकाळी ।।४।।

    लिहून ठेविले पत्र एक ते,
    त्याने खिशामाजी,
    “ऋणमुक्त जीवन व्हावे,
    अंतीम इच्छा माझी” ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 7, 2016


  • जीवन गुंता

    दोन रिळाचे दोन धागे, एकत्र ते आले
    एकमेकांत दोन्हीही, गुंफून परि गेले....१,

    गुंता झाला होता सारा, निर्मित नात्याचा
    शक्य होईल कसे आता, वेगळे होण्याचा....२,

    खेच बसता वाढत गेला, होता गुंता
    उकलून सुटणे शक्य नव्हते, त्याला आता.....३,

    दोनच पर्याय होते, त्याचे पुढती
    तुटणे वा एकत्र राहणे, ह्या जगती....४,

    वेगळे होतील दोन धागे, तुटून जाणारे
    अवशेष राहतील परि काही, जे न सुटणारे ...५,

    दोन मनांचा असाच होतो, गुंता ह्या जीवनी
    राग-लोभ प्रेमादी भावना, जाती गुंतूनी.....६

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 8, 2019


  • पिल्लू

    जाय जाय केलत्
    जात पण नाय
    कुतल्याच पिल्लू
    दुधकाला खाय

    लेशमाचं त्याच
    मऊ मऊ अंग
    तुटतच नाय
    त्याचा माहा संग

    कानाला धलून
    खेलं गाल्या गाल्या
    उगल्यात त्याला
    मिशा काल्या काल्या

    हातभल जीभ कसं
    कालतय् बाहेल
    बाबाला पाह्यलं त्
    चय धूम पलंल

    हाय हाय केलं त्
    गुयं गुयं कलल्
    युव युव केलं त्
    गोंदा घोलंल

    छोव छोव केलं त्
    भोव भोव कलल्
    मनीला पाह्यलं त्
    तिच्या मागं पलल्

    नजल् जली पलल्
    माणुसबी दचकत्
    गल्लीत मंग माहा
    वट जातो वाल्हत्

    © विठ्ठल जाधव
    @शिरूरकासार, जि.बीड
    मो.9421442995

      March 9, 2017


  • खरी पूजा

    गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती ।
    श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती ।१।

    भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी ।
    शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई ।२।

    प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती ।
    विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती ।३।

    भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर ।
    पवित्रता भासे तेथे, बघता बाह्य परिसर ।४।

    गर्दी होती भाविकांची दर्शन घेण्या तेथे
    साडी चोळी नेसवूनी अभिषेक करीत होते ।५।

    सामील झाला तोही इतर भक्त मंडळीत ।
    मनी इच्छीले कमी न पडावे तिच्या सेवेत ।६।

    साडी चोळी बांगड्या आणि पक्वान्नाचे ताट ।
    अर्पण केले जगदंबेला म्हणून स्तोत्र पाठ ।७।

    पूजा अर्चा संपवूनी डोंगर पायथी आला ।
    यथासांग विधीने मनी तोषला ।८।

    संपत असता यात्रा घटना एक घडली ।
    एक दुर्बल भिकारी, चक्कर येऊनी पडली ।९।

    धावून गेला मदत करण्या हा तिजला ।
    औषधोपचार करूनी, अन्न देई पोटाला ।१०।

    आशीर्वाद घेऊनी गेला, त्या दुर्बल बाईचे ।
    समाधान देई आनंद, त्याला या घटनेचे ।११।

    यात्रेमधला खरा आनंद तो यातच मिळाला ।
    श्री देवीच्या पूजेहूनी क्षण हा श्रेष्ठ तो ठरला ।१२।

    केली होती पूजा सेवा जीवंत आईची ।
    अंतर्मनाने पोच दिली खऱ्या समाधानाची ।१३।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      March 13, 2019


  • ऑफिसातले माणिकमोती -२

    तमाम पब्लिक धावतं
    उगवत्या सूर्याला नमन करायला.
    शेठच्या मुलानं बोलावतांच,
    सिद्ध, कुल्ल्याला पाय लावून पळायला. -

    तोंड घट्ट मिटून
    किती गूढ गुपितं
    आंत दडवून ठेवतं
    ऑफिसचं भलंमोठं सेफ. -

    प्रवास बोरीवली ते फोर्ट
    डोंबिवली ते कोर्ट.
    लोकलमधें डुलक्या-पत्ते-भजनं
    ऑफिसमधें टिवल्याबावल्या करणं.

    - सुभाष स. नाईक

      December 29, 2017


  • सत्य असत्य संभ्रमात

    जन्म हा सुखाचा की दुःखाचा..
    कां ? कुठला अक्षम्य गुन्हा आहे..
    जरी गतजन्मांचेच ऋणानुबंध सारे
    कुणाची कुणाला आज ओढ आहे..
    बेगडी नात्यांचेच स्वार्थी भावबंध
    खरे कोण कुणासाठी जगतो आहे..
    ऐश्वर्याचे रांजण ,जरी स्वर्गीयसुखी
    सांगा , आज मनःशांती कुठे आहे..
    ऐश्वर्यासाठी नात्यांचीही पायमल्ली
    नि:स्पृह प्रेम जिव्हाळा संपला आहे..
    बिलोरी प्रतिबिंबही कितीही देखणे
    तरी इथे सत्य, असत्य संभ्रमात आहे..
    वास्तव ! जे पेरावे तेच जगी उगवते
    हे सत्य कुणा केंव्हा कळणार आहे..
    कां ? जगण्याचीच हीच रित जगती
    जन्म कलियुगी , जीवाला सजा आहे..

    ©️ वि.ग.सातपुते (भावकवी)

    रचना क्र. ३८

    दिनांक :- १३-३-२०२१

      June 6, 2021