(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वाह्यात रुबाईयात

    ध्यानामधिं राहूं दे दोस्ता, नश्वर ही सगळी मत्ता
    क्षणार्धात जाईल संपुनी, हातीं जें आहे आत्तां
    चंचल आहे लक्ष्मी, जाते निसटुन ती कळण्यांआधी
    कशास मग मागसी गड्या तूं वाढवून महागाईभत्ता ?

    फक्त ती मजला हवी, बाकी मला कांहीं नको
    अधिर मी, पुसलें तिला, ‘होशील माझी बायको?’
    ‘चालेल’ ऐकुन हर्षलो मी, ती असें वदली पुढें –
    ‘चालेल मज पेद्रू कुणीही, फक्त तूं मजला नको’ ।।

    मन तिचें वळवायला युक्ती अशी मी काढली
    रोज तिजला काव्यमय मी प्रेमपत्रें धाडली
    शेवटी फळलीच की गंधित गुलाबी शृंखला
    दूत वरला पोरिनें, जो पोचवी पत्रें तिला !

    होऊनिया आतूर मी गेलो तिला भेटायला
    तात्काळ दरवाजा तिनें लावून की हो घेतला
    लावला होता तिनें कां, टाळण्यांसाठी मला ?
    लावला होता तिनें, कवटाळण्यांसाठी मला !!

    जातांच मी, ती मजकडे आतूर होउन धावली
    लागलिच मजला मिठी सर्वांसमोरच मारली
    चुंबनें कांहीं भराभर वर्षवी ती मजवरी
    गोड मोठी तीन वर्षांची असे ती छोकरी !

    हात त्यानें लावला सर्वांपुढे अंगा तिच्या
    लागला सोडूं निर्‍या त्या सुंदरीच्या साडिच्या
    तो ज़रा ना लाजला, तीही मुळी ना लाजली
    स्टाफ तो शोरूममधला, ती “डमी” काचेतली ।।

    आंत ती जातांच, आतुर तिजकडे तो धावला
    लागलिच लगटुन, तिच्या पदरास झोंबूं लागला
    हर्षली तीही, तयाला थांबवी नच मुळिच ती
    पाळला-कुत्रा असे तो सुंदरीला प्रिय अती ।।

    दिसतसे कित्येक वेळां ती मला टीव्हीवरी
    प्रथम कुतुहल, ध्यास नंतर लागला मज अंतरीं
    राहवेना, पोचलो स्टुडिओमधे मी टीव्हीच्या
    समजलें, टीव्हीतली माशी असे अगदी खरी !

    शांत रात्रीं सुंदरी ती दिसतसे कधिकधि मला
    धाडसानें एकदा मी ‘जवळ ये’ म्हटलें तिला
    हांसली, आली पुढे, मी रूप जवळुन पाहिलें
    घाम फुटला दरदरुन मज, बघुन उलटी पावलें ।।

    - सुभाष स. नाईक

      January 1, 2018


  • अनंतात नाम तुझे

    अनंतात नाम तुझे
    तुझ्या चरणी माथा,
    कानडा विठ्ठल तू
    उभ्या पंढरीचा राजा
    धाव घेतो तू सत्वरी
    भोळा भाव भक्तीचा,
    नामदेवाची खातो खीर
    काय वर्णावा तुझा सोहळा
    जनीचे दळतो दळण
    सावत्या माळ्याचा पिकवी मळा,
    श्रीखंडया बनून पाणी
    भरले एकनाथांच्या घरा
    चंद्रभागेच्या तिरी जमला
    साऱ्या वैष्णवांचा मळा,
    तुझ्या नामात तल्लीन
    होतो भक्तांचा हा मेळा
    ज्ञानदेवांनी सुरु केली
    वारीचा अनमोल हा ठेवा,
    नतमस्तक तुझ्या चरणी
    माझा नमस्कार पांडुरंगा सदा
    -- स्वाती ठोंबरे.

      March 11, 2022


  • गर्भातील आत्मा

    मातेच्या उदरांत असतां,

    जाण असते त्या जीवाला,

    प्रभूचाच मी अंश आहे,

    सांगत असतो तो सर्वाला ।।१।।

    सो s हं चा निनाद सतत,

    कानास आमच्या ऐकूं येतो,

    'तो' मीच आहे शब्दाने,

    आत्म्याचेच अस्तित्व सांगतो ।।२।।

    मातेच्या उदरांतूनी बाहेरी,

    पडतां स्वतंत्र जन्म मिळे,

    नाश पावूनी साऱ्या स्मृति,

    स्वत:सहित विसरे सगळे ।।३।।

    आतां त्याचा निनाद ‘को..हं’,

    प्रश्न युक्त तो भरला असे,

    “मी कोण आहे ?” विचारी सर्वां,

    उलघडा त्यास होत नसे ।।४।।

    जाणून घेण्या स्वत: विषयीं,

    सारे आयुष्य खर्च करती

    पुनरपि येतां स्मृति त्याला,

    प्रभूमय हे सारे भासती ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      October 18, 2016


  • दुष्टाचा मृत्यु

    सारे दुर्गुण अंगी असूनी, गुंड होता तो

    इतर जनांना त्रास देत, तुच्छ लेखितो

    शक्ति सामर्थ्य त्यांत असतां, फार मातला

    आया बहिणीना अपमानुनी, त्रासू लागला

    बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता

    हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता

    केवळ त्याच्या अस्तित्वाने, सारे घाबरती

    पिसाट संबोधूनी तयाला, दुर्लक्ष करिती

    एके दिवशीं अवचित ती, दुर्घटना झाली

    उंचावरनी त्याची स्कूटर, खाली कोसळली

    त्याच्या देहा भोवती जमले, सारे गांवकरी

    आज शब्द जे बाहेर पडती, स्तुती त्याची करी

    निच वृत्तीची पकड होती, त्याच्या देहाला

    देहाबरोबर दुष्टपणा तो, नाश पावला

    सुटका झाली आत्म्याची, त्याच्या हीन देहातूनी

    स्तुति सुमनें उधळली गेली, हेच जाणोनी

    जेव्हां कुणाचा मृत्यु होई, गुण गातो त्याचे

    रुप ईश्वरी उरते जातां, वेष्टन देहाचे

    डॉ. भगवान नागापूरकर

    9004079850

      June 23, 2019


  • झीज

    रात्रंदिनी कष्ट करूनी,

    झिजवत होता आपले हात,

    जीवनांतल्या धडपडीमध्यें,

    दिसे त्याची स्थितीवर मात ।।१।।

    पर्वा नव्हती स्व-देहाची,

    झिजवत असता हात ते,

    जाण होती परि ती त्याला,

    हेच कष्ट जगवित होते ।।२।।

    श्रम आणि भाकरी मिळूनी,

    ऊर्जा देई तिच शरीराला,

    ऊर्जेनेच तो देह वाढवी,

    समाधान जे मिळे त्याला ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      August 23, 2016


  • बघता तुला प्रिया रे

    बघता तुला प्रिया रे ,--जिवा बेचैनी येते,
    कासाविशी होता हृदयी,
    आत मोरपीस हलते,--!!!

    विलक्षण ओढ तुझी,
    काळजाला किती छळते,
    मूर्त माझ्या अंतरीची,
    अढळ अढळ होतं जाते,--!!!

    स्पर्श होता तुझा सख्या,
    माझी न मी असते,
    बाहूंत तुझ्या विसावण्या,
    किती काळ मी तरसते,--!!!

    तुझ्यातच सारे विश्व माझे,
    जगही तोकडे भासे,
    तुझ्याचसाठी राजसा,
    मन्मनीचा चकोर तरसे,--!!!

    उषा आणि संध्या,
    आपले रंग उधळती,
    प्रेम रंगाचाच वर्षाव,
    भास्करावरती करिती,--!!!

    रात्र येते चंदेरी ती ,
    जेव्हा जवळ तू असशी,
    जिवापाड जाऊन तूही,
    प्रीत" माझ्यावर करशी,--!!!

    धुंद रात्रीची मदमस्त किमया,
    प्रेमात नखशिखांत नहाते,
    आभाळीची चटोर चांदणी,
    प्रेम--लीलेसाठी धडपडते'--!!!

    हिमगौरी कर्वे©

      April 26, 2019


  • कल्लोळ

    जगी भेटली माणसे
    अनभिज्ञ ती सारी...

    जोडली नाती
    निराशाच पदरी...

    नव्हता जिव्हाळा
    भावशून्य सारी...

    नाही कुणी कुणाचे
    छळे सत्य जिव्हारी...

    जखमांचे झिरपणे
    नि:शब्द वाहते अंतरी...

    असले कसले जगणे
    प्रीत उदास हृदयांतरी...

    हा कल्लोळ असह्य
    भावनांचे रुदन भीतरी...

    रचना क्र ७०

    १०/७/२०२३

    वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

      July 19, 2023


  • नाम घेण्याची वृत्ती दे

    सतत नाम घेण्यासाठीं, बुद्धी दे रे मजला
    आठवण तुझी ठेवण्याची, वृत्ती दे रे मनाला ......।।धृ।।

    श्वासात प्राण म्हणूनी, अस्तित्व तुझेच जाणी
    श्वास घेण्याची शक्ती, तुझ्याचमुळे असती

    जीवनातील चैतन्य, तुजमुळेच मिळते सर्वांना.....१
    सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला

    अन्नामधले जीवन सत्व, तूच ते महान तत्व
    सुंदर अशी सृष्टी, बघण्या ते दिली दृष्टी

    आस्वाद घेण्या जगताचा, जागृत ठेवी भावनेला...२
    सतत नाम घेण्यासाठी, बुद्धी दे रे मजला

    निनादाच्या लहरी, तन्मयतेने श्रवण करी
    आभार मान्यता मति, परि शब्दही कमी पडती

    जगणेच कठीण वाटते, क्षणभर तुजविण कुणाला...३
    सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला

    जाणून तव उपकार, मानावे सदैव आभार
    ही भावना येते मनी, जावे तुझ्यात समावूनी

    रोम रोमातूनी माझ्या, नामाच्या दे गतिला....४
    सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      June 21, 2017


  • व्यथेच्या कथा

    घराघरातील व्यथा सांगते तुमची नि माझी कथा.,
    व्यथा लहान असो वा कितीही मोठी.
    एकमेकांना देऊ या सांत्वनाची आधार काठी
    सगळ्यांचीच अर्जुनासारखी झाली आहे मनस्थिती
    कुणाचीही चालेनाशी झाली आहे कोणतीही मती.
    देऊ या मायेचे आपुलकीचे पंखातील बळ.
    तेव्हा नक्कीच. निराशेचे विचार काढतील पळ
    एक विनंती करते सर्वांना हात जोडून.
    चेहर्यावरचा खोटा मुखवटा द्या दूर फेकून
    खरं बोलून मोकळेपणाने घ्या मोकळा श्वास.
    फिटे व्यथेच्या अंधाराचे जाळे मोकळे होईल आकाश
    -- सौ कुमुद ढवळेकर.

      December 17, 2021


  • रे पर्वता…

    निळसर रंगाच्या दुलईत लपला
    अजून झोप सरली नाही
    पहाटेने हाक देऊनही
    जाग त्याला आलीच नाही!
    कोंबड्यांचा आरव
    पक्ष्यांचे कूजन
    त्याच्याच कुशीतल्या
    मधमाश्यांचं गुंजन
    उगवतीचा सूर्य माध्यावर आला
    अंगावरच्या कणखर घड्यांनी आळस दिला
    थकलो आहे आता ऊन पाऊस झेलून
    श्रांतावंसं वाटतं आता दिगंताकडे पाहून..

    -- आर्या आशुतोष जोशी

      April 25, 2019