(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • राधेचे मुरली प्रेम

      March 20, 2016


  • बाबाची आई

    एक होती म्हातारी, ती सर्वांना धारेवर धरी
    उपास तापास नी सोवळ ओवळ
    त्रस्त केल तीन घर सगळ
    तिच्यापुढे चालेना कुणाच काही
    कारण ती बाबांची होती आई.

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 24, 2019


  • आभाळ प्रीतभारले

    अलवार छेडित छेडित आठवांना

      August 28, 2021


  • मधुस्पर्श

    चंद्रमाच तो पौर्णिमेचा
    आभाळ ते चांदण्यांचे
    झोंबता शीत धुंद वारा
    हितगुज ते मनामनांचे...

    आसमंत गंधाळलेला
    नाचती मयुर भावनांचे
    गुंतती अधर पाकळ्या
    मधुस्पर्श, प्रीतभावनांचे...

    श्वासातुनी श्वास गुंतता
    नि:शब्दी गुंतणे प्रीतीचे
    सारेच, तृप्तीचे हिंदोळे
    शुभ्रचांदणे आत्मसुखाचे...

    शांतले तन मन निरागस
    पाझर निष्पाप लोचनांचे
    मुक्त मोकळे, रिक्त सारे
    हे बंध, या रम्य जीवनाचे...

    -- वि..सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २३०

    १०/९/२०२२

      October 7, 2022


  • संतुलन

    आकाशीं सुर्य तळपला तेजस्वी त्याची किरणें

    तप्त करुनी जमिनीला वाळून टाकी जीवने ।।

    नभीं मेघ आच्छादतां रोकती रविकिरणे

    तुफान पर्जन्य पडतां महापूर त्याचा बने ।।

    सुटतां भयंकर वारा निघून जाती ढग

    प्रचंड वादळाचा मारा पर्जन्य कसे होईल मग ।।

    वादळास अडविती पर्वत वलय त्याचे रोकूनी

    सारे करिती मदत आनंदी करण्या धरणी ।।

    एकाची शक्ती बनते दुसऱ्यास पुरक

    निसर्गचक्र शोधते संतुलन त्यांत एक ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

      November 5, 2018


  • जीवन आनंद

    ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे ।
    उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।।

    संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले ।
    समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।।

    खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे ।
    बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।।

    विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो ।
    यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ।।

    संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी ।
    प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ।।

    वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची ।
    आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ।।

    एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी ।
    शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ।।

    हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे ।
    गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ।।

    ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह ।
    संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ।।

    मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम ।
    कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण ।।

    आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला ।
    देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ।।

    हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही ।
    ‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 7, 2017


  • सुखाची १७ पाऊले

    जाग येता पहिल्या प्रहरी
    हळुवार डोळे उघडावे... १

    मग पाहून हातांकडे
    कुलदेवतेला स्मरावे... २

    अंथरुणातून उठताक्षणी
    धरतीला नमावे... ३

    ध्यानस्थ होऊ भगवंताला
    आठवावे... ४

    सर्व आन्हिके झाल्यावर
    देवाचरणी बसावे... ५

    काही न मागता
    त्यालाच सर्व अर्पावे... ६

    घरांतून निघता बाहेर
    आई वडिलांना नमावे... ७

    येतो असा निरोप घेऊन
    मगच घर सोडावे... ८

    क्षणभर दाराबाहेर थांबून
    वास्तूला स्मरावे... ९

    समाधानाचे भाव आणून
    मगच मार्गस्थ व्हावे... १०

    चेहऱ्यावर स्मित हास्य
    नेहमी बाळगून चालावे..११

    येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
    आनंदाने पहावे... १२

    जगात खूप भांडण तंटे
    आपण शांत राहावे... १३

    सतत तोंडात मध आणि
    मस्तकी बर्फ धरावे... १४

    जीवन हे मर्त्य आहे
    नेहमी लक्षात असावे... १५

    प्रत्येक क्षण हेच जीवन
    हेच मनी ठसवावे... १६

    सत्याने वागून नेहमी
    जीवन आपुले जगावे... १७

      September 19, 2017


  • पायांचे बिल

    मी थोडा चाललो
    तर पायानी बिल दिले लगेच
    फुटाप्रमाणे दर लावून

    आता मी हाताला
    आधीच विचारतो
    कविता लिहु का म्हणून ?

    -- श्रीकांत पेटकर

    कौशल

      March 14, 2019


  • तु जाताना

    आता तु मला सोड़ून निघून जाशिल.
    चुकुन का होईना मागे वळून पाहशिल.
    तुझी नजर मग क्षितीजाला भिड़ेल
    तीथ पर्यँत तुला माझीच स्मूती मिळेल.
    तुला आठवतील ते ओसरलेले क्षण
    सुरवातीची मौज अन तुटलेल माझ मन.
    घाबरुन तु परत वास्तवात येशिल.
    आणि क्षणभरासाठी माझ्या प्रेमात पड़शिल.
    गहिवरल्या ह्रदयात येक लांब श्वास घेशिल.
    अन ड़ोळे मिटुन मला प्रेमाचा होकार देशिल.

    -- आकाश

      June 8, 2010


  • बापू….

    बापू,
    आजही तु दिलेल्या टोपीच्या,
    झाकणाखालून सडलेल्या मेंदूतले,
    नासके विचार वाहू लागतात ना
    तव्हा मलं तुह्या अहिंसेतुन जन्मलेल्या
    मुक्त स्वातंत्र्याची किंमत कळते....!!!

    बापु,
    तुलं ते एकदा न कदा मारू शकतात रे,
    पण जव्हाबी तेह्यनं तुलं,
    मारायचा प्रयत्न केला नं,
    तव्हा तव्हा तु रक्तबीजासारखा
    पुनर्जिवीत झालास...!!!
    वांझुट्या विचारांच्या आडुन त्यांनी तुलं,
    मारायचा खुप प्रयत्न केला,
    टोप्यांना वेगवेगळे रंगही दिले,
    तरी पण त्या जहाल विखारांतुन तु,
    चकाकुनच निघालास....!!!

    बापु
    आजही तुह्या सत्य,अहिंसेच्या विचारावरच
    हि पृथ्वी तगुन आहे....!!!
    जव्हा तेह्यनं तुव्हा बापच काढला नं,
    तव्हा तं मव्हबी डोकं भनकु लागलं,
    पण तुह्याच विचारानं,
    मह्या डोक्यातीलं आग शांत केली...!!!
    बापु भलेही तेह्यनं तुही हत्या,
    बंदुकिच्या गोळीनं केली असेल
    पण तुह्या विचारांची हत्या,
    ते कोणत्या बंदुकीनं करतीलं...?

    बापु,
    तेह्यनं धर्माची अफु लोकांना चारली,
    तुह्या सत्याच्या प्रयोगावरही टिका केली,
    तुव्ह लंगोट काढुन वस्त्रहरण करू पाह्यलं,
    तुव्हा बापबी काढला अन विचारांचा,
    विखारी सापबी तुह्यावरं सोडला,
    तरी तु टस का मस झाला नाहीस,
    भलेही तेह्यनं कपटानं तुह्या शरीरावर
    गोळ्या झाडल्या असतीलं रे,
    अन तुही “हे राम!” म्हणत,
    धारातीर्थी पडला असशीलं...
    पण तुह्या विचारांतला “राम”
    ते कव्हाच मारू शकणार नाहीतं.....!!!

    ©गोडाती बबनराव काळे
    9405807079

      August 5, 2023