पेराल ते घ्याल

शत्रु तुमचा तुम्हींच असूनी तुम्हींच कारण दुःखाचे

सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं हात असती केवळ तुमचे

बी पेरतां तसेंच उगवते साधे तत्व निसर्गाचे

निर्मित असतो वातावरण क्रोध अहंकार मोहमायाचे

कसे मिळेल प्रेम तुम्हांला घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता

क्रोध करुन इतरांवरी मिळेल तुम्हांस कशी शांतता

शिवीगाळ तो स्वभाव असतां आदरभाव तो कसा मिळे

शत्रुत्वाचे नाते ठेवतां सलोख्याचा सांधा ढळे

इच्छा मात्र असते सुखाची सदैव मिळावा तो आनंद

शक्य होण्या वातावरणी हवा प्रेमळ सुसंवाद

आवलंबून ते सारे असते वागतां कसे तुम्हीं ह्या वरती

वाईट वागण्याचे बी पेरुनी चांगले मग कसे उगवती

डॉ. भगवान नागापूरकर

9004079850

bknagapurkar@gmail.com

Author