नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे ।
टकमक पाहात हांसत होत्या, चोहीकडे ।।
झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती ।
हातवारे करुन त्या, माना डोलावती ।।
जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना ।
सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना ।।
सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं ।
कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी ।।
अज्ञानी गरीब बिचाऱ्या, जेंव्हा संकल्प करती ।
कळसूत्री बाहुल्या त्या, दोर इतरां हातीं ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 11, 2017
आई, बघ ना कसा हा दादा?
मला चिडवायचं हाच याचा धंदा ! ।। धृ. ।।
लग्न बाहुलीचं लावतां आम्ही
म्हणतो, नवरदेव आहे मी
आतां मलाच मुंडावळि बांधा !' ।। १।।
कधीं मोठमोठे करतो डोळे
कधीं उगाच विदूषकि चाळे
भारी खट्याळ, नाहि मुळि साधा ! ।। २।।
दादा भलताच द्वाड आहे आई !
खोड्या करून छळतो बाई
याला ओवाळायचि नाहि मी यंदा ।। ३।।
June 17, 2026
सावळा विठ्ठल! कर कटावरी!
भेटला पंढरी! भक्ती भावें!!१!!
पाहून श्रीमुख! वारकरी डोले!
पांडुरंग बोले! वाणी सदा!!२!!
हरी नाम घेता! सुख लागे जीवा!
नयनी पहावा! विश्वंभर!!३!!
तुळशीची माळ! शोभिवंत गळा!
विश्वाचा सोहळा! तुझ्या ठायी!!४!!
उभा विटेवरी! माझा पांडुरंग!
मन होई दंग! पाहताच!!५!!
आत्म्याचे रिंगण! भक्तीने योजावे!
होऊंन पहावे! वारकरी!!६!!
टाळ मृदंगाचा! ताल धरताना!!
माळ जपताना! मनोभावे!!७!!
विठ्ठला विठ्ठल! तुझी आळवणी!
घ्यावे सांभाळूनी! भोळे भक्त!!८!!
माझ्या अंतरीचे! दोष निवारण!
घडो पारायण! पांडुरंगा!!९!!
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
June 13, 2026
उपास तापास करुनी, शिणवित होतो देहाला,
भजन पूजन करुनी, पूजीत होतो देवाला ।
कथा कीर्तनें ऐकूनी, पुराण मी जाणिले,
माळ जप जपूनी, प्रभू नामस्मरण केले ।
वेचूनी सुमनें सुंदर, वाही प्रभूचे चरणीं,
फुलांचे गुंफूनी हार, अर्पण केले कंठमणीं ।
जाऊनी तीर्थ यात्रेत, दर्शन घेतले तीर्थांचे,
प्रसिद्ध देवालयांत, चरण स्पर्षिले मूर्तीचे ।
मनामध्यें ठेऊन शांती, मूल्यमापन केले जीवनाचे,
कांहीं न मिळाले हातीं, व्यर्थ दवडिले क्षण वेळेचे ।
संसारातील प्रेम व राग, ह्यातच मन गुरफटले,
कर्तव्यातील एक भाग, प्रभू भक्तीसी संबोधले ।
परमार्थ आणि संसार, भिन्न नाहींत दोन,
प्रभूचाच आहे संसार, मनी तूं हे जाण ।
कर्म फळ आशा, बाळगूं नको मनीं,
तेंव्हा न येईल निराशा, कर्म करीता क्षणीं ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 22, 2016
आयुष्यात काही लोकांना एक जाणीव करून
देना खूप महत्वाचे असते....
कि त्यांच्या असण्याने काही फरक नाही पडत,
तेव्हा त्यांच्या नसण्याने तर कदापिही
फरक पडणार नाही....!!
-- मयुरी राम विखे
December 14, 2019
January 18, 2014
तूं गेलिस, मी उरलो मागे सखा तुझा अनुरागी
जोवर मी, तोंवर राहीलच तुझी आठवण जागी ।।
रात्र पसरतां, भवतालीं निद्रिस्त सर्व दुनिया
मीच फक्त असतो जागा अन् तुझी आठवण जागी ।।
चुकुनी आली झोप कधी मज, तरि मी निजूं कसा ?
ठेवायची असे दिनरातीं तुझी आठवण जागी।।
भाग्य झोपलें माझें, कायमचीच झोपलिस तूं
मी कायम झोपेतों, कायम तुझी आठवण जागी ।।
आज असे मी, परंतु सखये, उद्या नसेन इथें
चिंता ही, नंतर राहिल कां तुझी आठवण जागी ?
- - -
११.०८.२०१६
(दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या स्मृतीत)
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
August 14, 2016
आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.
आई म्हणायची संध्याकाळची,
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात
होत नाहीत पुढे.
आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.
आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.
आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.
आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.
आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.
आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची
पाया पडायला भाग.
दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.
आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.
आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!
आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.
अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.
जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.
मरण यातना सोसत
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.
बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतात
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतात.
त्यांना कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतात
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतात .
तुमचा शब्द ते कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.
तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
पेलत सगळी आव्हाने
घडवतात तुमचा भविष्यकाळ..
तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबाही खचत असतात
आधार देता तरी
मन मारून हसत असतात..
तुमच्याकडूनं तसं त्यांना
खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्यांचं
अवघं पोट भरत असतं.
त्यांच्या वेदना कुणालाही
कधीसुद्धा दिसत नाहीत
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाहीत.”
त्यांच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.
एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल
तेव्हा म्हणाल, “ आपले बाबा
खरंच कधी चुकत नव्हते
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होते.”
तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.
आपल्या आई-वडिलांवर
खरोखर प्रेम करा..
आजच्या जागतिक कुटुंब दिवसाला सुंदर सलामी...
September 22, 2016
रुजला पाहीजे विचार मनांत
सारेच प्रभुचे असे ह्या जगांत
जो वरी आहे मी माझे येथे असे
त्या क्षणापर्यंत स्वार्थ मनीं वसे
स्वार्थयुक्त मन मुक्त होत नसे
मुक्ती येई पर्यंत पुनर्जन्म असे
बिंबता मनांत माझे नाहीं कांहीं
प्रभूचे समजता आत्मा मुक्त होई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 2, 2017
June 1, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti