(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विश्वास

    कधी मनाच्या फुलती पाकळ्या

    काट्यांचाही डंख जिव्हारी

    अदृष्टाच्या पानावरती

    कशी लिहावी मौनडायरी

    धूळमाखल्या आयुष्याला

    प्रश्न विचारू नये फुकाचे

    काजळकाळ्या रात्री तरीही

    उघड्या डोळी स्वप्न सुखाचे

    रुणझुणत्या इच्छांची माया

    खुणावितो शुक्राचा तारा

    जागवितो विश्वास आतला

    पहाटचा प्राजक्ती वारा

    पैलपार त्या अंधाराच्या

    जाईन उडुनी पंख पालवित

    आभाळाच्या माथी लाविन

    या मातीचा टिळा सुगंधित

    पाचोळ्यातून फुलवित राहिन

    हिरवा अंकुर नव्या दमाचा

    अभीष्टचिंतन करा दिशांनी

    क्षण जपतो त्या अंतःस्थाचा

    - वृंदा भांबुरे

    (व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

      April 6, 2023


  • आरसा

    दाखवितोस हूबेहूब रुप आरशामध्ये मला
    मीच माझे रुप बघूनी चमत्कार वाटला
    सत्य स्थितीचे द्दष्य करुनी दाखविलेस सर्वाला
    उणें अधिक न करितां तसाच दिसे आम्हाला
    गुणदोष बघूनी देहाचे मुल्य मापन करितो आम्हीं
    चांगले राहण्या शिकवी हीच युक्ती नामी
    कांचेच्या आरशापरीं असे मनाचा अरसा
    आत्म्याची मलीनता दाखवुनी चांगला बनवी माणसा

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 7, 2017


  • करून बघ !

    फुलेल नातं तुझं माझं
    करून बघ एक उपाय
    नको विचारुस पुन्हा पुन्हा
    खरं काय? खोटं काय?------!!

    तोलू नकोस ताजव्यात
    आल्या गेल्या क्षणांना
    काठावरच बसून रहा
    सोडून फक्त पाण्यात पाय
    नको विचारुस पुन्हा पुन्हा
    खरं काय? खोटं काय?------!!१

    माझ्या मनात तूच आहेस
    चाचपडणं सोडून दे
    खदखदतंय मनात जे
    अलगद त्यावर धरेल साय
    नको विचारुस पुन्हा पुन्हा
    खरं काय? खोटं काय?------!!२

    मोजु नकोस वळणं वेडी
    घालु नकोस अवघड कोडी
    वळून बघ तुझ्यामागे
    पाऊल माझं पडत जाय
    नको विचारुस पुन्हा पुन्हा
    खरं काय? खोटं काय?------!!३

    ………. मी मानसी

      October 12, 2019


  • तूच अवीट सुगंधा

    तुझ्यात, मीच कधी गुंतलो
    आज मलाच आठवत नाही
    पण श्वासातला गंधाळ तुझा
    दरवळणे कधीच थांबले नाही
    तू कस्तूरी, तू बकुळी सुगंधा
    तुज मी कधीच भुललो नाही
    चराचरातुनी, तुझीच सुरावट
    गुंजारवी गुणगुण संपली नाही
    जिथे, तिथे सारेच भास तुझे
    स्मृतीगंघ कधीच विरला नाही
    भेटलो तू अन मी ज्या राऊळी
    ती दीपमाळ मी विसरलो नाही
    दान, अमरत्वाचे सत्यप्रीतीला
    याचे विस्मरण कधी झाले नाही
    लोचनी विलसलेले ते रूप तुझे
    मी कधीच विसरु शकलो नाही
    आजही तुझ्याच स्मरणात जगतो
    त्याविण जीवा दूजी शांतता नाही
    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908
    रचना क्र. १३१.
    ७ - ५ - २०२२.

      May 31, 2022


  • तूच माझी राधिका

    तूच माझी राधिका,
    तूच माझी प्रेमिका,
    मोहिनी माझी तू ,
    तूच माझी सारिका, --!!!

    मुसमुसते प्रेम तू ,
    सौंदर्य ओसंडून वाहे,
    मदनाची रती तू ,
    भित्र्या डोळ्यांनीच पाहे ,--!!!

    कमनीय सिंहकटी तुझी,
    बाहूत माझ्या सामावे,
    लाल कोवळे ओष्ठद्वज,
    डाळिंबीची जणू फुले,--!!!

    मोहक बांधा तुझा,
    जाता-येता खुणावे ,
    कुंतलाचे मानेवर ओझे,
    पाठीवरचा तीळ झाके, --!!!

    आरस्पानी रंग-गोरा,
    काळजां घायाळ करतो,
    गोड गुलाबी कायेवर,
    लज्जेचा गेंदा फुलतो,--!!!

    मिटून घेशी शृंगारात,
    संकोची तू कासवी,
    मदनाची बाधा होता,
    फुलून येते रातराणी,--!!!

    *ऐहिक तू भोगिनी,
    मजसाठी मात्र योगिनी,
    भोग--योगाच्या संयोगी,
    अलौकिक तू कामिनी*,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 21, 2019


  • कधी हसावे कधी रडावे

    कधी हसावे कधी रडावे
    जीवन गाणे गात रहावे
    आयुष्याच्या वेलीवर मग
    चार माणसे हसत जोडावे
    कोण न कुणाचा असा इथे
    दुःखाचे थेंब हास्यात बुडावे
    रडता रडता पटकन हसावे
    हसता हसता मरणं यावे
    औट घटकेचा खेळ सारा
    जमतील सगे सोयरे सारे
    मरणं येईल कधी समोर
    शब्दांतून हास्य अलगद खुलावे
    असतील आपले नाते कुठले
    काव्यांत ओळख उरेल जराशी
    हसता हसता उलगडे बंध
    मरणं यावे अलगद पाऊली
    उरतील खुणा अलगद काही
    स्मरतील चांदण शब्द अबोली
    हसत हसत दुःखात भिजतील
    तुमच्या माझ्या ओळख गाठी
    -- स्वाती ठोंबरे.

      January 30, 2022


  • पाहण्या तुला चंद्रमा उत्सुक

    पाहण्या तुला चंद्रमा उत्सुक, माजला मनात कोलाहल,अशी कुठली बरे चांदणी,
    जिच्याशी रंगतो प्रेम- खेळ?

    सुंदर सुरेख कोमलांगी,
    भासतेस, चाफ्याचे फूल,
    सुंदर सोनसळी रंग त्याचा,
    ज्याची दुनियेला पडे भूल,--!!

    त्या चंद्रम्यासारखा,
    मीही, तुझा प्रेमवेडा,
    प्रेमाच्या रजतकिरणी,
    न्हाऊन निघतो केवढा,--!!

    हात तुझा हाती येता ,
    बघ कसा जळतो बिचारा,
    प्रेम दिवस त्याला न मिळे,
    कधी करण्यास साजरा,!!

    आभाळीचा चांद आज,
    माझ्यासाठी खाली उतरला,
    महत्व प्रेमाचे जाणत जाणत अलगद ओंजळीत आला,!!

    © हिमगौरी कर्वे.

      February 14, 2020


  • दिन ढळला सखया, कधी येणार तू ?

    दिन ढळला सखया, कधी येणार तू ,-?
    नयनांची ही निरांजने,
    आता लागली रे विझू,--||१||

    वाट तुझी पहावी किती,
    भासते तुझीच कमी,
    मलमलीची गादीही,
    टोचू लागली अंतर्यामी,--||२||

    भोवताली सारी सुखे,
    एक विरह त्यांना मारे,
    आजुबाजूस सगळे,
    इहलोकीचे पसारे,--||३||

    असा कुठे गेलास तू ,
    परतण्याची वाट नाही,
    आभाळ तारे वारे,
    दशदिशा झाल्या स्तब्धही,--||४||

    चातकाची अवस्था माझी,
    चंद्रम्यास आम्ही तरसतो,
    मी असे काय वेगळी,
    तुझा विरह मला छळतो,--||५||

    तू तर सर्वस्व माझे,
    दूर माझ्यापासून रे,
    तुझ्यावाचून पुरी दुनिया,
    वाटते मज शून्य रे,--||६||

    आयुष्य माझे असूनही,
    तुझे ते किती झाले,
    जरा दुरावा येता थोडा,
    माझी न मी राहिले,--||७||

    पार ज्याच्या सूर्य जातो,
    अशा त्या रम्य क्षितिजी,
    हळूहळू अंधार येई,
    रात्र उगवे उजेडामाजि,--! ||८||

    विरहाच्या अंधारात,
    बुडालेली सर्वस्वी मी,
    सूर्यराजा सोडून गेला,
    किती कासावीस धरणी,--||९||

    एक तुझ्या स्पर्शे रविकरा,
    ती बघ रे ,- धन्य होई,
    तन-मन चमकून उठे,
    धरती प्रकाशमानी होई,--||१०||

    चांदण्याही आता बघा,
    आभाळी उगवू लागल्या,
    चंद्रसाजणाची वाट पाहत,
    कशा लाज लाजून गेल्या,--||११||

    चांदण्याचा जथा ठेवून मागे,
    चंद्रमा निघे पुढे पुढे,
    सर्व पुरुष कसे सारखे,
    नेहमीच मज पडते कोडे,--||१२||

    दिनमणी उगवला तरी,
    तू मात्र दूरस्थ,
    मी दिशाहीन झाले,
    राहू कशी संन्यस्त,--! ||१३||

    © हिमगौरी कर्वे.

      January 6, 2020


  • हे परमेश्वरा.. हे परमेश्वरा

    (मुक्तछंदात्मक)

    थोडा वाकून पहा खाली,
    काय चाललंय या पृथ्वीतली,
    सत्ता, लत्ता, अधिकार, पैसा, यामधून एवढा माततो का कुणी,-? जनावरे बरी म्हणायची पाळी, संकेत, भाषा, सभ्यता, निष्ठा,
    कशी पाळतात ती सारी,--!!!
    समूहनियम, कर्तव्येही माहित,
    अधिकाराचे बडगे दाखवत नाहीत,
    नुसतीच माणुसकीचा आंव आणून,----
    पैसा इतका प्रिय असावा की, म्हाताऱ्या आई-बापांनी जावे वृद्धाश्रमी,
    खस्ता जराही आठवत नाहीत, त्यांनी भोगलेल्या; केवळ लेकरांसाठी,--!!!
    स्त्रीचे स्त्रीत्व शालीनतेत,
    कुठे उडली रे लाज,--?
    किती किती असभ्य बनल्या आहेत त्या, ---
    आज स्वतःच्या हाताने घेतलंय करून,----
    समाजातली स्त्री फक्त भोगवस्तू स्त्री शक्तीचा आदर सन्मान,ते, करतो तरी कोण,--?
    वासनांनी बरबटलेले डोळे,
    बाकी काय बोलतील,--?
    नीती प्रीती भक्ती कशाशी खातात,--?
    जन्म-मृत्यूही इतके स्वस्त इथे,जीवनच महागडं झालंय,
    अशा दुनियेत जगवतोस, ही, आम्हाला दिलेली शिक्षा का मोठी,--?

    -- © हिमगौरी कर्वे.

      October 21, 2019


  • देह देव

    हाडे, मांस, रक्ताने,

    शरीर बनविले छान,

    सौंदर्य खुलते त्या देहाचे,

    जर असेल तेथे प्राण ।।१।।

    प्राण नसे कुणी दुजा हा,

    परि आत्मा हेची अंग,

    विश्वाचा जो चालक,

    त्या परमात्म्याचा भाग ।।२।।

    ईश्वरी सेवा, संकल्प मनीं,

    प्रेमभरे देह भजावा,

    अंतर बाह्य शुद्धता राखी,

    समर्पणाचा भाव असावा ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      December 12, 2017