(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सूर्योदय

    प्रभात झाली रवी उगवला

    दाही दिशा उजळल्या

    रात्रीचा अंधार जावूनी

    नवीन आशा अंकूरल्या १

    बरसत आहे सूर्यकिरणे

    पृथ्वीच्या भूतली

    आनंदाने पुलकित होवून

    धरणीमाता शहारली २

    निघूनी गेला रात्रीचा गारवा

    त्याच्या आगमानाने

    उल्हासीत होवून प्राणी जीवन

    नाचत राही ऊबेने ३

    पुनरपि आता झाले सुरु

    चक्र जीवनाचे

    मिळवू आज काही तरी

    किरण चमकती आशेचे ४

    काळोखाची भयाणता

    आता गेली निघूनी

    प्रकाशाच्या मदतीने

    कामास लागती जोमानी ५

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      June 3, 2020


  • उगवलेला दिवस

    उगवलेला दिवस
    सावलीसह सरकतो
    जगंलात गेली गुरढोर
    रस्ता घराचा धुंडतो

    ओढ लागुन पिल्याची
    चिमणी ही परतते
    काटा रूतयो पायी तरी
    अलगद असा काढते

    गाय हंबरते मनात
    दुधाचा ओवा पान्हावते
    थांब रे बाला थोडं
    लवकरच मी पोहोचते

    पावले झपाझप पडती
    घराच्या लागल्या ओढीन
    दिस गेला दुराव्याचा
    हाक दिली लेकरानं

    -- शरद शहारे

      November 18, 2019


  • आमचे ध्येय व दिशा

    कोठे चाललो आम्ही, जसे वाहती वारे,

    दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे ।।१।।

    धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा,

    कोठे चाललास? विचारतां हासत राहतो बावळा ।।२।।

    नाही कुणा ध्येय निश्चित असे एक,

    परिस्थितीच्या ओघांत, वाहत चाललो अनेक ।।३।।

    जीवन कशासाठीं कळले नाही कुणां

    जन्मलो म्हणून जगावे हेच वाटते सर्वांना ।।४।।

    तशातच तरले कांहीं उध्दरुन ही गेले

    मार्ग त्यांचे अनुसरुनी तसेंच मिळवा सगळे ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

      March 9, 2015


  • आम आदमी

     

      February 26, 2014


  • वेळेचे मूल्य

    मूल्य नाही कुणा,
    तूं दिल्या वेळेचे,
    गमावून टाकी,
    जाणूनी फुकाचे ।।१।।

    लागत नसते,
    दाम वेळेसाठीं,
    म्हणून दवडे,
    अकारणा पोटीं ।।२।।

    वस्तूचे मूल्य ते,
    पैशांनीच ठरते,
    परी वेळेची किंमत,
    कुणा न समजते ।।३।।

    वेडे आहोत सारे,
    कसे होई मूल्य
    वेळ जातां मग,
    आयुष्य जाईल ।।४।।

    आयुष्य खर्चणे,
    हेच वेळेचे मुल्य ठरते,
    जीवनांतील यश,
    त्यावरुन कळते ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 17, 2015


  • गर्भावस्थेतील आनंद

    जीवनातील परमानंद, केंव्हां लाभतो त्या जीवना ?

    मातेच्या त्या उदरामध्ये, शांत झोपला असताना....१,

    असीम ‘आनंद’ अनुभव, घेत असे तो जीवात्मा

    सोsहं निनाद करूनी, सांगतो मीच परमात्मा....२,

    आनंदाने नाचू लागतो, मनांत येता केंव्हां तरी

    मातेलाही सुखी करती, त्याच्याच आनंदी लहरी....३,

    पुढे त्याचे प्रयत्न होती, मिळवण्या तोच आनंद

    सुख, दु:खाच्या चक्रामध्ये, विसरूनी जातो तो नाद.....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 5, 2018


  • चारोळ्या

    काळी बायको (वात्रटिका)

    काळी तिरळी बायको लाभून, मिळाले खूप समाधान.
    कसे काय बुआ ? असे विचाराल
    तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून

    सारेच चोर (वात्रटिका)

    हासतात तुला वेड्या ते, पकडला गेलास समजून
    परि सहानूभूती आहे त्यांच्यात, चोर आहेस म्हणून

    माझी नोकरी (वात्रटिका)

    नकार देत होती माझ्या प्रेमाला, बघून, मी आहे एक बेकार
    जळत होते, जळत होते तिच्या विणा माझे शरिर
    सर्व शांत झाले आता, फायर ब्रिगेड नोकरी मिळता

    गर्दी पांगविण्याची कला (वात्रटिका)

    गर्दी गर्दी गर्दी, सर्वत्र त्रस्त करून टाकणारी गर्दी.
    गर्दीला पांगविण्याची, कला सापडली
    वही घेवून संग्रहातील कविता मी वाचली

    सिनेमाला चला (वात्रटिका)

    नको जाणे सिनेमाला, गर्दीचा आहे पहिलाच दिवस
    याच विचाराने थिएटर पडले ओस
    चला जावू सिनेमाला, आजच्या दिवशी शेवटी.
    निराशली मंडळी, बघूनी हाऊस फूल पाटी

    असंबधता (वात्रटिका)

    त्याला तपासण्यासाठी, नेले मेंटल हॉस्पीटलला
    की तो आजकाल असंबद्ध बोलू लागला
    पण डॉक्टर संतापून म्हणाले
    तुम्हाला त्याची समज असावी,
    की तो आहे एक ‘नवकवी’

    चिंगीचे ज्ञान (वात्रटिका)

    बाई शिकवी चिंगीला ‘त’ ला काना ‘ता’
    चिंगीचे सामान्य ज्ञान तीक्ष्ण,
    म्हणते कशी ‘तांबीतला ता’ न बाई

    चिठ्ठीवरला मजकूर (वात्रटिका)

    टेबलावर ठेवले होते बॉसने काहीतरी लिहून
    हाताखालच्या लोकांनी निरनिराळे अर्थ काढले त्यातून
    कुणास काहीच समजेना, म्हणून असिस्टटने केली विचारणा
    चिठ्ठी वाचून बॉस म्हणाले
    मला काय म्हणावयाच होत तेव्हा,
    समजत नाही आता, ती आहे एक नवकविता

    मॉर्डन तरूण (वात्रटिका)

    अगदी मॉर्डन कॉलेज कुमारांचे बसले एक टोळके गाडीत समोर
    हासत होते, खिदळत होते, गप्पा मारीत होते,
    ऐकण्यासारखे होते परंतु सांगण्यासारखे नव्हते.
    स्टेशन येताच सारे उतरले तेव्हा मी एकास विचारले
    “आपल नाव सांगता ?”
    उतरता उतरता ऐकू आले “ मी आहे मिस निता ”

    एक सुंदरी (वात्रटिका)

    बस मधून चाललो होतो मी, शेजारी होती जागा रिकामी
    येवून बसली जवळ एक सुंदर, चंचल तरूण बालीका
    तिला बघून मनाची खुलली कलीका
    तरीही मी एका क्षणांत माझी जागा बदलली बरका
    कारण ती हासत मुरकत म्हणाली
    “ थोडस, सरकत का तिकडे काका ? ”

    बाबाची आई

    एक होती म्हातारी, ती सर्वांना धारेवर धरी
    उपास तापास नी सोवळ ओवळ
    त्रस्त केल तीन घर सगळ
    तिच्यापुढे चालेना कुणाच काही
    कारण ती बाबांची होती आई.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 7, 2017


  • तुझ्यासाठी

    कवितेच्या तलम पडद्याआडून
    माझ्या भावना तुला सागतात
    माझ्या विरहव्यथा
    शकुंतलेची व्यथा सांगावी
    दुष्यंताला तिच्या सखींनी तशी
    क्वचित दुर्लक्षिल्यासारखं
    क्वचित दाद देत तू म्हणतोस
    वा ।’
    आणि निघून जातोन
    कसं सांगू तुला कवितेतून?
    माझ्या कविता तुझ्यासाठी असतात!

    -सौ. राजलक्ष्मी देशपांडे

      March 29, 2023


  • बेताल स्वछंदीपणा

    काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं
    स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं ।।१।।

    नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा चोहींकडे
    सुसंस्कृतीची जाण येतां स्वच्छंदाला बाधा पडे ।।२।।

    स्वतंत्र असूनी देखील पडते परिघ भोवती
    जीवन जगण्या करितां बंधने ती कांहीं लागती ।।३।।

    स्वांतत्र्याची तुमची व्याप्ती असावी दुजांना जाणूनी
    दिव्य करण्याच्या ईर्षेने संस्कृतीस होइल हानी ।।४।।

    ओंगळपणाचे चित्रण करती जे लेखक- कवि
    आगळेपणाची भूमिका मनांत त्याच्या असावी ।।५।।

    बाध न येतां बंधनाला भव्य असे करुं शकतात
    चाकोरी मध्येंच राहूनी आकाशाला भिडूं शकतात ।।६।।।

    निर्माण करुन गीतेला हजारों वर्ष ती झाली
    तोच विषय पुन्हां घेउनी ज्ञानोबांनी बाजी मारली ।।७।।

    सोडा तुम्हीं वेडा विचार स्वचछंदी त्या जगण्याचा
    गढूळ होता वातावरण गुदमरेल जीव तुमचा ।।८।।

    जेव्हां कुणी स्वातंत्र्य मागे त्याच्याही मर्यादा असती
    दुजे त्याच्या पाठीमागचे एक पाऊल पुढे टाकती ।।९।।

    दुसऱ्याचे हेच पाऊल पहिल्यास ठरे घातक
    दुष्टचक्र स्वच्छंदाचे पोखरुन टाकील कित्येक ।।१०।।

    तयार करित आहात बेतालपणाचा भस्मासूर
    तुम्हांलाही नष्ट करील हात ठेउनी शिरावर ।।११।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 10, 2017


  • दुर्बल मन नको

    सारेच आहेत दुबळे कुणाते नसे शक्ति

    वेळ येतां दुर्बल ठरे जे सबळ समजती ।।१।।

    विचार मनी येतां दुसरा शक्तिशाली

    समजोनी जावे तेव्हां हार तुमची झाली ।।२।।

    मनाची सबलता हेच शक्तीचे मापन

    काय कामाचा देह दुर्बल असतां मन ।।३।।

    सुदृढ देह व मन यांची मिळून जोडी

    जीवनातील यश तुमच्या पदरीं पाडी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      September 2, 2018