(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गोरी गोरीपान, फुलासारखी छान

    गोरी गोरीपान, फुलासारखी छान
    दादा, मला एक वहिनी आण । धृ. ।।

    गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी
    अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
    चांदण्याच्या पदराला बिजलीचा बाण ! ।॥१॥।

    वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
    चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
    हरणांची गाडी तुडवी गुलाबाचें रान ! ।।1२॥।

    वहिनीशी गटद्टि होता तुला दोन थापा
    तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
    बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान ! ।।1३।।

      June 13, 2026


  • मी तुझी शाई बनू इच्छिते

    मी तुझी शाई बनू इच्छिते
    मी शब्दांच्या त्या गल्लीत जाऊ इच्छिते
    जिथे कविता कथेच्या गळ्यात गळा घालून
    चालत असते,
    माझ्या तमाम दुःखाच्या,
    पराभवाचे विष प्राशन करणाऱ्या
    नीलकंठ लेखणीला
    सृजन करण्याचे सौंदर्य मला बहाल कर,

    मी या शाईने लिहू शकेल
    या प्रकाशमान विश्वाचे सफेद अक्षर
    मला सांभाळून घे लेखणी
    मी तुझी शाई बनू इच्छिते.

    मी कागदाच्या देहावर गोंदण होऊ इच्छिते
    मी जगाशी व्यक्त होऊ इच्छिते की
    कागदाच्या संगमरवरी देहावर
    लिहीन मी एक प्रार्थना
    जी ताजमहल पेक्षा अधिक सुंदर असेल,

    मला घडवण्याची ताकद दे ब्रह्मा !
    मी तो हातोडा होऊ इच्छिते
    माझा मान अपमान
    माझा संघर्ष
    माझी ओळख
    या सर्वांना ओलांडून गुंजत राहू इच्छिते
    मी शब्द नाद होऊ इच्छिते

    मूळ हिंदी कविता - " मैं तेरी रोशनाई होना चाहती हूँ "

    - अलका सिन्हा

    मराठी अनुवाद - विजय नगरकर

      November 14, 2023


  • विधी लिखीत

    विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित
    कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत ।।१।।

    राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी
    राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं ।।२।।

    नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे
    परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे ।।३।।

    आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं
    काळाने त्या झडप घातली प्रयत्न त्याचे निष्फळ करुनी ।।४।।

    दुर्दैवी होते विधी विधान हरिश्चंद्र तारामती यांचे
    राजा राणी असूनी दोघे जीवन गेले परि कष्टाचे ।।५।।

    सुख दुःखानें भरले असे प्रत्येकाचे व्यक्ती जीवन
    सहज लीलेने घ्यावे सारे प्रभूचेच आहे समजून ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 26, 2017


  • सोनं येचितो मातीत….

    सोनं येचीतो मातीतं....

    सोनं येचतो मातीतं...
    संगणीच्या संगतीतं...
    मोती घामाचे पिकवितो...
    काळी मायच्या कुशीतं....

    पशु पक्षी वृक्षवल्ली
    काळ्या मायची लेकरं
    सार तिच गणगोतं
    तिलं सृष्टीचा संसारं....

    पिकं शेतात डोलते
    पाना फुलांनी सजते
    फुले काळीज बळीचं
    मनं हारखुन जाते.....

    मका पोटुशी पोटुशी...
    डोकं जवारी काढते...
    गहु मिशांना ताविते...
    फुलं सुर्याच डोलते...

    पक्षी झाडाशी बोलती,
    गाय गोठ्यात हंबरी,
    मह्या शेतातली शाळा,
    मलं ईथच पंढरी........!!!

    ©गोडाती बबनराव काळे
    लातुर
    ९४०५८०७०७९

      May 11, 2024


  • खुणा गतस्मृतींच्या

    जगता जगता किती , कसा मी जगलो

      October 1, 2021


  • मनात दडले बरेच काही…

    माझी पहिली कविता … अजुन खुप कविता आहेत पण ही कविता मनाच्या खुप जवळ आहे.

      March 22, 2010


  • अंतरंगात उभा विठ्ठल

    बघ उघडूनी दार अंतरी, उभा कटीवर हात,
    माझ्या श्वासांच्या तालावर, विठ्ठल धरितो नाद।
    ना पंढरीची वाट इथे, ना चंद्रभागेचा घाट,
    हृदयाच्या त्या वाळवंटी, उमलतो भक्तीचा थाट॥१॥

    डोळे मिटता सावळा तो, तेजोमय भासे,
    अश्रूंच्या त्या ओवाळीने, चरणी मन हे वसे।
    नाही मागणे काही आता, नाही इच्छा ठायी,
    तुझ्या नामाच्या गजरात, देहभान हरपून जाई॥२॥

    अहंकाराची वीट काढुनी, रचिले अंत:करण,
    त्या भक्तीच्या रांगोळीत, उमटले तुझे चरण।
    लोभ-मोहाची धूळ झटकुनी, स्वच्छ केले द्वार,
    ये रे माझ्या अंतरी आता, पांडुरंगा आधार॥३॥

    वादळ येवो दुःखांचे, काळोख दाटो भोवती,
    नाम तुझे दीप बनूनी, उजळे माझी प्रीती।
    तूच दाता, तूच माता, तूच जीवाचा श्वास,
    तुझ्या कृपेच्या सावलीत, संपतो जन्मांचा त्रास॥४॥

    बघ उघडूनी दार अंतरी, पंढरपूर हेच झाले,
    भक्त आणि भगवंतामध्ये, अंतर काहीच न राहिले।
    कटीवर हात ठेवुनी म्हणे, “भिऊ नको रे जिवा”,
    मीच तुझ्यात, तूच माझ्यात हा अनुभव चिरंतन नवा॥५॥

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      June 12, 2026


  • भान हरपले विठ्ठला

    भान हरपले विठ्ठला
    तुझ्या चरणी देह माझा,
    भोळ्या भक्तीचा तू भुकेला
    धाव घेई तू भक्तांच्या साह्याला
    रुप तुझे सावळे
    कटीवरी हात असे,
    मुखी विलसे हास्य सदा
    सावळ्या तू हरी विठ्ठला
    पंढरपुरी असे वास
    वर्णावे काय तुझे चरित्र,
    धन्य धन्य होतो जीव तुझ्या
    दर्शनाची आस हृदयी सदा
    -- स्वाती ठोंबरे.

      June 3, 2022


  • बहिणीची एक इच्छा

    विसरू नकोस मजला माझ्या भाऊराया
    नाते अतूट असते घे, हे समजुनिया
    आठव सारे बालपण कसे गेले खेळांत
    भांडत होतो, रुसत होतो सारे केले प्रेमांत
    ओवाळणीची तुझी सुपारी ठेवली मी जपुनी
    आठवण होता तुझी मजला काढून बघते पेटीतुनी
    जाणीव आहे मजला संसार जीवनाची
    कर्तव्ये पडली शिरावरी तुझाच संसाराची
    खूप प्रेम दे वाहिनीला संसार कर सुखाने
    काढून ठेव अल्पसे प्रेम देण्या मज त्या साठ्यातुनी
    वर्षातून एके दिवशी बांध राखी प्रेमाची
    स्वार्थी आहे रे मी काढते तुझाच आठवणी

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 8, 2016


  • आठव

    शांत व्हावे, आठवांचे मोहोळ
    साठव जागवित काळीज थकले

    जगायचे ते सारे जगुनी झाले
    भोगण्यासारखे काही न उरले

    स्मरणी दिव्यत्वाचे स्पर्श ममत्वी
    ते भाग्य कृपाळू जगवित राहिले

    ऋतुऋतु भारले दृष्टांत निसर्गी
    स्थित्यंतरे सृष्टित घडवित राहिले

    भौतिक सुखाला, विटुनी जाता
    ध्यास परमार्थाचे जीवास लागले

    अंतर्मुख झालो जेंव्हा हॄदयांतरी
    सत्यार्थ जीवनाचे उलगडुनी गेले

    --वि.ग.सातपुते. (भावकवी)

    (9766544908)

    रचना क्र. २७४

    २८/१०/२०२२

      November 3, 2022