(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चक्रव्यूह

    ठोका खोकी
    बनवा खोपी
    ही झोपडपट्टी

    गटारावरी
    भटारखाना
    आणि हातभट्टी. ||१||

    ओसंडे घन
    दुर्गंधि-घाण
    कचरा सडला

    तिथेच भ्रामक
    जीवन नामक
    खेळ मांडला. ||२||

    रोज ठणाणा
    नविन घोषणा
    सुधारणांच्या.

    शून्यें असतीं
    नांवावरती
    सरकारांच्या. ||३||

    मंत्री येतां
    जिवंत प्रेतां
    बघुन न बघती

    गोठ्यामधली
    ढोरें सगळी
    तशीच ज़गती. ||४||

    चक्रव्यूह रणिं
    रचला कोणी
    मुळी न ठाउक

    अभिमन्यूंची
    भेट मृत्युशी
    इथेंच घाउक. ||५||

    -- सुभाष स. नाईक

      June 23, 2016


  • रिक्तपण

    परवलीचाच शब्द आता
    हे माझे अन तेही माझे

    स्वार्थाचा हव्यास आगळा
    जे आहे ते सारे माझे

    खरे कुणाचे काही नसते
    तसे जगणेच ठरते ओझे

    प्रेमभाव एक बाजार आता
    नाते एक कर्तव्याचे ओझे

    सत्य केवळ श्वास क्षणाचा
    अंती कळते रिक्तपण माझे

    जेंव्हा होई जीव कासाविस
    विसरूनी जाते तुझे माझे
    ********

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    (9766544908)

    रचना क्र. ३०८

    २७/११/२०२२

      December 7, 2022


  • भान हरपले विठ्ठला

    भान हरपले विठ्ठला
    तुझ्या चरणी देह माझा,
    भोळ्या भक्तीचा तू भुकेला
    धाव घेई तू भक्तांच्या साह्याला
    रुप तुझे सावळे
    कटीवरी हात असे,
    मुखी विलसे हास्य सदा
    सावळ्या तू हरी विठ्ठला
    पंढरपुरी असे वास
    वर्णावे काय तुझे चरित्र,
    धन्य धन्य होतो जीव तुझ्या
    दर्शनाची आस हृदयी सदा
    -- स्वाती ठोंबरे.

      June 3, 2022


  • नवीन वर्ष

     

      December 27, 2013


  • अरे माणसा माणसा

    अरे माणसा माणसा ,नको असा अंत पाहू ,
    जीवसृष्टी ज्यावर जगे,
    त्या निसर्गा नको तोडू ,--!!!

    अरे माणसा माणसा,
    जगू देत वल्ली तरु,
    प्राणांसाठी संजीवन असे,
    नको त्यास दुर्लक्षित करू,--!!!

    अरे माणसा माणसा,
    पाणियाला चल वाचवू ,
    जलस्त्रोत जगातले सारे,
    वाया नको असे घालवू ,--!!!

    अरे माणसा माणसा,
    धरणीवर घाव नको घालू ,
    काळी आई पिकवे सोने,
    बेकदर इतका नको होऊ,--!!!

    अरे माणसा माणसा,
    वने सारी चल जगवू ,
    आपमतलबासाठी तू ,
    उगीच मस्ती नको दाखवू ,--!!!

    अरे माणसा माणसा,
    प्राणी बळी नको देऊ ,
    शाप मूक त्या जीवांचे,
    नको ओढवून घेऊ ,--!!!

    अरे माणसा माणसा,
    नसते उद्योग नको करू,
    वाढवण्यासाठी सारी पिके,
    रसायने नको ओतू ,--!!!

    अरे माणसा माणसा,
    निसर्ग आहे *श्रेष्ठ गुरु ,
    विज्ञानाच्या लागून मागे,
    नको विनाशाची कांस धरू ,--!!!

    अरे माणसा माणसा,
    नको निसर्गास कोप देऊ,
    कल्याण करत जगाचे ,
    चल त्यास आपण *विनवू ,--!!!

    © हिमगौरी कर्वे

      February 17, 2020


  • फूलपाखरे नि फुले

    रंगबिरंगी सुंदर ठिपके, पंखावरी
    आकर्षक छटा त्या, मनास मोहीत करी...१,

    नृत्य पहा कसे चालते, तालबद्ध होवूनी
    फूलपाखरे बागडती, फुलाफुला वरूनी...२,

    नृत्याचे आंगण त्यांचे, ते ही सुंदर नि मोहक
    मखमालीच्या पाय घड्या, दरवाळताती सुवासिक...३,

    दोघांमधली चढाओढ, नर्तक आणि नृत्यांगणा
    कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?....४

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 4, 2017


  • मद, मोह, क्रोध, वासना

    मद, मोह, क्रोध, वासना शरीरांतर्गत किती भावना,माणूस नावाची जादू भारते,
    नेहमीच मज हे दयाघना,--!!!

    लोभ मत्सर इर्ष्या नीचता, माणसातही आढळते क्रूरता,
    संपून माणुसकी, वृत्ती दानवी, दाखवतो आपली बा हीनता,--!!

    तरीही माणूसपण असते,
    एखाद्या सज्जन हृदयात,
    माणुसकीचे महत्व जाणे,
    कितीही असेल संकटात,--!!
    असा सज्जन प्रेम मानतो जगातील मोठी शक्ती,
    हेच प्रेम असे त्याचे,
    जगण्याची विशाल उक्ती,--!!!

    मुके प्राणी वृक्षलता,
    सारेच त्यापुढे झुकतात,
    प्रेमळ बाळकडू मिळतां,
    अधिक जीवन जगतात,--!!!

    याच माणसात आढळते,
    परमेश्वरावर अढळ भक्ती,
    तीच तारक बनते,
    जीवन सुसह्य सरतेशेवटी,---!!!

    करुणा भाके तो भक्त,
    लीन दीन ईश्वरापुढे,
    जगाच्या कल्याणाकरिता,
    ज्ञानेश्वरही घालती साकडे,--!!!!

    हिमगौरी कर्वे
    ©

      May 27, 2019


  • १ मे

      May 1, 2014


  • सतत बरसणारी दया

    प्रभू दयेची बरसात,
    चालू असते सतत,
    ज्ञानाची गंगोत्री वाहते,
    पिणाऱ्यालाच मिळते ।।१।।

    प्रत्येक क्षण दयेचा,
    टिपणारा ठरे नशीबाचा,
    जलात राहूनी कोरडे,
    म्हणावे त्यास काय वेडे ।।२।।

    फळे पडतां रोज पाही,
    त्याची कुणा उमज न येई,
    परि न्यूटन एक निघाला,
    बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला ।।३।।

    चहा किटलीचे झाकण हाले,
    स्टिफनसनने इंजीन शोधले,
    जीवनातील साधे प्रसंग,
    शास्त्रज्ञांची बनले अंग ।।४।।

    प्रभू असतो सतत तयार,
    ठरवा दया कशी घेणार,
    प्रयत्न होता अंतःकरणी,
    यश लाभेल घ्यावे समजोनी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 23, 2016


  • कर्मकांड

    संथ झुळझुळणारी सरिता

      August 25, 2021