March 8, 2022
आशीर्वाद दे ग आई मजला, विनवितो मी तुझाच पूत्र ।
बाबा माझे नसती हयात, कोण मजला ह्या जगतात ।।
'केशव' माझे वडील असता, 'केवशसूत' हा ठरतो मी ।
तसाच बनता 'केशवकुमार', मोठे होण्याची युक्ती नामी ।।
जगावयाचे जर मोठ्या नामी, तूच मजला महान आहे ।
'लक्ष्मी' तुझे नाव असता, ‘लक्ष्मीसूत’ होण्यात पाहे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 24, 2020
-- स्वाती ठोंबरे.
November 27, 2021
असे कसे विसरलास,आपुल्यातील गोड नाते,
माझे,होते ना तुझे,
तुझे असायचे रे माझे,--!!!
जीव तुझा कासावीस,
होई मला उलघाल,
मनाचे सोड, तनाचे,
मग सोसते हाल-हाल,--!!!
प्रीतीची हूल तुझ्या,
कशी गावीही नाही,---
बनशी असा रुक्ष की,
प्रेमाचा लवलेशही नाही,--!!!
तरल, मृदू, नाजूक,
प्रीत पुन्हा कधी फुलेल,
शेजेवरील मोगरा,
पुन्हा कधी बहरेल,-?
तारुण्याचा बहर आपुला, ओसरला नाही पुरता,
तरीही दाखवशी किती,
तू मात्र उदासीनता,--?
अजूनही, रात्र येतां,
मनचाफा दरवळतां,
आठवणींच्या झुल्यावर,
राहून राहून हिंदळता,--!!!
मुसमुसत्या तारुण्याला,
वाटे एकलेपणा,---
तुझे असे डोळे झाकणें,
लहर दुःखाची उन्मळता,--!!!
माझ्यासाठी संजीवन तू ,
तुझ्यासाठी मी दामिनी,
आकाशीची प्रेमल जादू,
बरसे मग, अमृतवाहिनी,--!!!
© हिमगौरी कर्वे.
March 6, 2020
इतकं सारं तुझं व्हावं की माझं काही उरूच नये
त्याहीपेक्षा खंत वाटते तुलाही हे कळू नये
फुलं सारी तुझीच होती, कधी फुलली कधी सुकली
वाईट एवढंच वाटतं, तुला त्यांचा गंध येऊ नये
किती किती विरहगीतं मी स्वत:शीच गात राहिले
एकसुध्दा सूर का रे तुझ्यापर्यंत पोचू नये?
शब्दाविनाच रंगते नेहमी खरी प्रेमकहाणी तरी
गोष्ट अर्धी राहून जाईल इतकं अबोल होऊ नये
एकच आहोत आपण मनानं हेही मान्य आहे मला
स्वप्नवर्खी स्पर्शानाही इतकं कमी लेखू नये
माझी कविता माझ्याचपाशी पाकळी पाकळी मिटत गेली
क्षण निसटून जातील इतकं लज्जे, आड येऊ नये !
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
May 8, 2023
काळ येतां वृद्धपणाचा, विरक्तींची येई भावना
निरोप घेण्या जगताचा, तयार करीत असे मना
वेड्यापरी आकर्षण होते, सर्व जगातील वस्तूंवरी
नाशवंत त्या, माहित असूनी, प्रेम करितो जीवन भरी
जीवनांतील ढळत्या वेळीं, जेव्हां वळूनी बघतो मागें
मृगजळासाठीं धावत होतो, जाणून घेण्या सुखाची अंगे
प्रयत्न केले जरी बहूत, हातीं न लागे काहीं
पूर्ण कल्पना येई मनीं, जगण्यात आंता तथ्य नाहीं
उर्वरीत आयुष्याची रेखा, मर्यादेतच आखूनी काढी
समज येतां प्रभूचे सारे, समर्पण करीत जग सोडी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 18, 2018
सहवास होता तुझा,
सदोदित साथ देणारा…!
संयम होता तुझा,
माझे बोल झेलनारा…!
जिद्द होती तुझी,
नितांत प्रेम करण्याची…!
तुझ माझ नातं कस्तुरीचं,
एक थेंब सागरात मिसळलेलं….!
एक थेंब सागरात मिसळलेलं….!
– श्र्वेता संकपाळ
August 22, 2018
बागेमधला निसर्ग सारा टिपत होतो मी
रात्र पडूनी चंद्र आकाशी बाग झाली रिकामी १
बाकावरती बसून एकटा मोजत होतो तारे
लुकलुकणारा प्रकाश तो अंक चुकवी सारे २
अगणित बघुनी संख्यावरी प्रसन्न झाले मन
किती वेळ तो निघूनी गेला राहिले नाहीं भान ३
शितलेतेच्या वातावरणीं शांत झोप लागली
नयन उघडतां बघितले मी पहांट ती झाली ४
गेल्या निघूनी सर्व तारका आकाशाला सोडूनी
शोधूं लागले नयन माझे त्यांना सर्व दिशांनी ५
चकित झालो फुले बघुनि मी सुंदर फुललेली
सुचवित होती मिष्कीलपणें का तारकांच खाली ? ६
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 9, 2016
महाराष्ट्राच्या मातीतल्या कणाकणात जपलेला स्वाभिमान,
आणि डोळ्यांत पेटलेला महाराष्ट्राचा अभिमान,
असं व्यक्तिमत्त्व जेव्हा उभं राहतं,
तेव्हा व्यासपीठच रणांगण होतं.
राज ठाकरे...
नावातच एक ठसका,
शब्दांत ज्वालामुखीचा ताप,
आणि विचारांत धारदार तलवारीची चमक.
तो बोलतो तेव्हा
हवेचाही श्वास थांबतो,
कारण प्रत्येक वाक्य
थेट छातीत आदळतं.
भाषेचा प्रश्न असो,
मराठी माणसाचा स्वाभिमान असो,
किंवा व्यवस्थेवरची करडी टीका.
तो मांडतो मुद्दा
तडफेने, निर्विकारपणे,
कोणाच्याही भीतीशिवाय.
त्याच्या शैलीत आहे वारसा,
पण त्याची वाट मात्र स्वतःची.
रेषांच्या व्यंगचित्रांतून
तो उलगडतो सत्तेचं कुरूप सत्य, आणि
सभागृहात त्यांच्या विचारांनी हादरते सत्तेची भिंत.
वाद त्याच्या मागे धावतात,
टीका त्याच्यावर कोसळते,
पण तो उभाच राहतो.
डगमगत नाही,
वाकत नाही.
कारण काही नेते
फक्त राजकारण करत नाहीत,
ते घडवतात लाट
भावनांची, विचारांची, अस्मितेची.
आणि जेव्हा इतिहास
महाराष्ट्राच्या राजकीय पानांवर
ठळक अक्षरांनी नोंद करेल
एक निर्भीड, ठाम, वेगळा आवाज तेव्हा त्या ओळीत
गर्जत उभं असेल.
त्या आवाजाचे एकचं नाव...
राजसाहेब ठाकरे
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 13, 2026
मग्न राही सतत आपल्याच कामीं
अन्नासाठी तूं फिरे दाही दिशानी
जमवितेस कणकण एकत्र करुनी
दूर द्दष्टीचा स्वभाव दिला तुज कुणी
सुंदर तुझी वास्तूकला वारुळ केले छान
सहस्त्रांच्या संखे राहतेस आनंदानं
कष्ट करण्याचा गुण दाखवी साऱ्याना
कष्टाला पर्याय नसे ह्या जीवना
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 13, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti